
नॉट आऊट १५० साठी चिअर्स – मुंबई इंडियन्सची उत्तुंग कामगिरी!
पलटन, आता जरा जोरात जल्लोष होऊद्या कारण तुमच्या आवडत्या टीमने <आणखी एक> विक्रम नोंदवला आहे! 🎉
मुंबई इंडियन्सच्या इतिहासात आपला IPL 2025 ESA Day success over LSG अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला कारण आता आयपीएलमध्ये १५० विजय मिळवणारी पहिली फ्रँचायझी ठरलो आहोत. कसं वाटतंय आता?!
Cheering on with our special guests on a special day in a special win. 💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2025
Mrs. Nita Ambani kept the spirit going with the kids at the @ril_foundation #ESADay ✨#EducationAndSportsForAll #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvLSG pic.twitter.com/9azm91TwMI
आपल्या स्पर्धकांशी ओळख करून घेण्याच्या सुरूवातीच्या काळापासून ते स्पर्धेतील सर्वांत विजयी फ्रँचायझी होण्यापर्यंत अनेक टप्पे, जादू आणि आठवणींची एक सुंदर रोलरकोस्टर राइड ठरली आहे! 💙
पाच किताब जिंकणाऱ्या सीझनमधून आपण वाटेवर अधूनमधून आलेले अडथळे पार केले आहेत. पण त्यातही एक गोष्ट सातत्यपूर्ण होती- एमआयचा उत्साह आणि कधीही हार न मानण्याचा दृष्टीकोन.
…आणि हा प्रवास आपण इतक्यात काही थांबवणार नाही आहोत! 💥 आमच्यासोबत या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप आभार पलटन. तुमचा उत्साह, विश्वास आणि सातत्यपूर्ण पाठिंबा यांच्यामुळेच हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे!
आता #PlayLikeMumbai स्टाइलमध्ये आणखी जादू विखुरण्यासाठी तयार राहा! 😎 चला आठवणींची उजळणी करूया आणि आयपीएलमध्ये आपला पहिला, ५०वा आणि १०० वा विजय नोंदवूया.
पहिला विजय | आयपीएल २००८ | ईडन गार्डन्सवर केकेआरविरूद्ध
एमआयने केकेआरचा सात विकेट्सनी पराभव केला. सनथ जयसूर्याला त्याच्या अष्टपैलू योगदानासाठी सामनापटूचा पुरस्कार देण्यात आला. 🙌 काहीतरी खास सुरू होत होते…

**********
५० वा विजय | आयपीएल २०१३ | वानखेडेवर सीएसकेविरूद्ध
एमआयने सीएसकेचा ६० धावांनी पराभव केला. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला फक्त ७९ धावांवर सर्वबाद केले. 💪 मुंबईत कोणाची वट चालते माहित्ये ना…

**********
१०० वा विजय | आयपीएल २०१९ | वानखेडेवर सीएसकेविरूद्ध
एकदम कॉपी पेस्ट परफॉर्मन्स होता की नाही! 🤗 हार्दिक पांड्याने केलेला खेळ (८ चेंडूंमध्ये २५* आणि ३/२०) सीएसकेविरूद्ध ३७ धावांनी विजय देऊन गेला.
