News

सीटी25 ग्रुप टप्पा | PAKvIND: २०१७ चा बदला पूर्ण

By Mumbai Indians

पलटन, आता कसं वाटतंय?? लई भारी वाटतंय! 🔥

भारतीयांसाठी रविवार खऱ्या अर्थाने सार्थकी लागला कारण तो सुपर संडे होता. टीम इंडियाने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना सहा विकेट्सनी हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सेमी फायनल्सच्या दिशेने एक पाऊल टाकलं.

सुंदर, शिस्तबद्ध गोलंदाजी आणि पाठोपाठ दणकेबाज फलंदाजी. विराट कोहलीने ५१ वे ओडीआय शतकही पूर्ण केले. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमला स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवता आला.

सोन्याच्या शहरात जगातले सर्वांत कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आले तेव्हा काय घडले हे पाहूया.

2 गुज्जू बॉइजचा जलसा... #PAKvIND एडिशन!

पॉवर प्लेच्या सुरूवातीच्या टप्प्यात मो. शामी आणि हर्षित राणा यांनी अत्यंत अचूक गोलंदाजी करून पाकिस्तानी ओपनर्सवर दबाव आणला.

… आणि त्याचा परिणाम लगेच दिसला. आपल्या एचपीने पहिली विकेट घेताना बाबर आझमला (२६ चेंडूंमध्ये २३ धावा) नवव्या ओव्हरमध्ये घरी पाठवले. वाह रे पठ्ठ्या! 👏

त्यानंतरच्या लगेचच्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलच्या रॉकेट थ्रोने इमाम हकला मधल्या मध्येच मागे पाठवले. पॉवर प्लेच्या शेवटी पाकिस्तानचा धावफलक ५२/२ वर होता.

१०४ धावांची महत्त्वाची भीगादारी

खेळपट्टी संथ झाल्यामुळे शकील-रिझवान या जोडीने अत्यंत सावधगिरीने खेळून एक आणि दोन धावा काढत धावफलक हलता ठेवला आणि धावसंख्या वाढवली.

सौद शकीलने ३१ व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केले तर त्यांच्या कर्णधाराने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी ४६ धावा नोंदवल्या.

या दोघांनी धावसंख्या ४७/२ वरून १५९/४ वर नेली. त्यानंतर कुंग फू पांड्याने ३५ व्या ओव्हरमध्ये शकीलच्या नावाने दुसरी विकेट घेतली. या दरम्यान या अष्टपैलू खेळाडूने आपल्या प्रेरणादायी करियरमधला आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला.

विकेट्सची धूम = भारताची धमाल!

मधल्या ओव्हर्समध्ये भारतीय क्रिकेट टीमला मधल्या ओव्हरमध्ये कंटाळा आला होता असे वाटत होते … 😉

आमच्या स्पिनर्सनी आपला मार्ग काढला. कुलदीप यादवने आणखी दोन विकेट्स घेतल्या तर रवींद्र जडेजा म्हणजे जफ्फाने तय्यब ताहिरला बाहेरचा रस्ता दाखवला.

मो. रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने २४१/१० वर इनिंग संपवली. हर्षित राणाने शेवटच्या ओव्हरमध्ये खुशदिल शाहला बाद करून त्यांचा खेळ थांबवला.

शुभमनचा राडा!

शुभमनच्या अप्रतिम फॉर्मचं वर्णन करायला शब्द अपुरे पडणार आहेत. 💥

हिटमॅनने आपल्या स्टाइलमध्ये तोडफोड करत इनिंगला सुरूवात केली. त्यानंतर शुभमनचे क्लासिक ड्राइव्ह्स आणि त्याचे अप्रतिम टायमिंग दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भर दिवसा तारे चमकवत होते.

या २५ वर्षीय खेळाडूला आपले अर्धशतक पूर्ण करायला फक्त चार धावा कमी पडल्या. परंतु त्याच्या खेळाने धावांच्या पाठलागात टीम इंडियाला एका चांगल्या स्थितीत आणून ठेवले.

विराट कोहलीला चेज मास्टर उगाच म्हणत नाहीत!

आपला महान खेळाडू पाकिस्तानविरूद्ध पूर्ण फॉर्ममध्ये होता. अर्थात आपण हे यापूर्वीही पाहिलेले आहे … 💪

सात चौकारांसह १११ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा. प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या डोळ्यांचे पारणे फिटवणारा हा क्षण. त्याने आपल्या दमदार करियरमध्ये आणखी एक टप्पा पार केला. ओडीआयमध्ये १४,००० धावा करणारा तो फक्त तिसराच फलंदाज ठरलाय.

त्याचा विचारपूर्वक केलेला खेळ आणि दमदार क्लास. त्यामुळे तो टीमला विजयाच्या मार्गावर सहजपणे घेऊन गेला.

अय्यरचे अर्धशतक!

आपल्या मुंबईचा मधल्या फळीतला फलंदाज अप्रतिम फॉर्ममध्ये होता. त्याने आपल्या धावांमध्ये आणखी एका अर्धशतकाची भर घातली.

भारतीय संघ १००/२ वर असताना हा उजव्या हाताने खेळणारा फलंदाज मैदानात आला. त्याने काही सुंदर शॉट्स तसेच हा 👇 सणसणीत षट्कार मारला आणि २०१३ च्या चॅम्पियन्सना विजयाच्या जवळ नेले.

आणि शेवटी जिंकलो

आपण ४० ओव्हर्समध्ये २२३/४ वर होतो. त्यामुळे सामना आता कधीही गुंडाळता येईल अशी स्थिती होती. विराट कोहलीने आपला आवडता चौकार मारत शतक तर पूर्ण केलेच आणि सामनाही जिंकला. 🥳

या विजयासह भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात एकास एक रेकॉर्डच्या संदर्भात (३-३) साध्य केले  आहेत. पार्टी करायची ना मग? 🎉

 

थोडक्यात धावसंख्या: पाकिस्तानचा भारताकडून सहा विकेट्सनी पराभव पाकिस्तान ४९.४ ओव्हर्समध्ये २४१/१० (सौद शकील ६२; कुलदीप यादव ३/४०) भारत ४२.३ ओव्हर्समध्ये २४४/४ (विराट कोहली १००*; शाहीन आफ्रिदी २/७४).