News

सीटी२५ ग्रुप टप्पा | BANvIND: शामीची कमाल आणि गिलची धमाल!

By Mumbai Indians

पहिलीच मॅच, पहिलाच विजय... टीम इंडियाची परफेक्ट सुरूवात! 💙

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला दणदणीत सुरूवात केली असून त्यांनी सहा विकेट्सनी बांग्लादेशवर विजय मिळवला. मोहम्मद शामी आणि शुभमन गिल यांनी अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजी केली.

बांग्लादेशने पहिल्या इनिंगच्या मधल्या ओव्हर्समध्ये खेळ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्या गोलंदाजांनी पहिल्याच तासात पुरेसे नुकसान केले होते. आपल्या स्फोटक गोलंदाजांसमोर नक्की काय खेळायचे हा प्रश्न बांग्लादेशी फलंदाजांना पडला होता.

बघूया सामना कसा झाला ते...

/० ते ५/३५ दुबईत निस्ता राडा!

बांग्लादेश काय आम्हीसुद्धा अशा खेळासाठी तयार नव्हतो … 🤯

पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शामीने विकेट्सचे खाते उघडले. त्यानंतर त्याने मागे वळूनसुद्धा पाहिले नाही.

/१ /२ /२६ /३५ /३५

येस्स. तुम्ही बरोबर वाचताय. इतकी चांगली सुरूवात होईल असे आम्हालाही वाटले नव्हते. शामी आणि अक्षर यांनी हर्षित राणाच्या जबरदस्त खेळासोबतच प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीच्या चिंधड्या उडाल्या. 🔥

बांग्ला टायगर्स पुन्हा जोशात आले

सुरूवात चांगलीच धक्कादायक झाली. पण नंतर तौहिद हृदय यांनी जेकर अली यांनी खांद्यावर धुरा घेऊन बांग्लादेशी इनिंगला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी अतिशय संयमाने खेळ केला.

त्यांनी आक्रमक न खेळता एकल आणि दुहेरी धावा काढत बांग्लादेशची नौका सावरण्यावर भर दिला. त्यांनी १५४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेकर अली ११४ चेंडूंमध्ये ६८ धावा करून बाद झाला.

या दोघांनी ८.३ ओव्हर्समध्ये ५/३५ पासून आपल्या संघाला ४२.२ ओव्हर्समध्ये ६/१८९ पर्यंत नेले आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना बचाव करण्यासाठी पुरेशी धावसंख्या उभी राहील याची काळजी घेतली. 👏

शामीने जेकर अलीची विकेट घेताना आपली २०० वी ओडीआय विकेट पूर्ण केली. ही कामगिरी सर्वाधिक वेगाने करणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

बांग्लादेशचा संघ २२८/१० वर थांबला

तौहिद हृदोयच्या अप्रतिम शतकामुळे बांग्लादेशला २०० धावांचा टप्पा पार करणे शक्य झाले. त्याने या १०० धावा सहा चौकार आणि दोन षट्कारांच्या मदतीने पूर्ण केल्या.

त्यांची सुरूवात ज्या प्रकारे झाली ते पाहता आपण त्यांना खूप लवकर गुंडाळून टाकू असे भारतीय क्रिकेट टीमला वाटले होते. अर्थात, दुसऱ्या इनिंगमध्ये पाठलाग सुरू करण्यापूर्वी शामीच्या पाच विकेट्सनी आपल्याला आनंदाचे क्षण दिले.

RO आणि त्याचे आयसीसी स्पर्धांचे प्रेम

आपल्या हिटमॅनला आयसीसी स्पर्धेत आतषबाजी करताना पाहिले ना... हो, आधी अनेकदा पाहिले आहे!!! 🤩

या वेळी तो फक्त चौकार षट्कारांची भाषा बोलत होता. त्याने ३६ चेंडूंमध्ये ४१ धावा करून पाठलाग यशस्वी होणार याची हमी दिली. पॉवर प्लेच्या शेवटी टीम इंडिया ६९/१ वर होती.

याशिवाय, दि रोहित शर्माने आपल्या ११,००० ओडीआय धावा पूर्ण केल्या आणि ही कामगिरी करणारा फक्त चौथा भारतीय ठरला. 💙

शुभमनची फटकेबाजी सुरूच!

त्याच्या मागच्या तीन इनिंग्सकडे आपण जरा लक्ष देऊया- ११२, ६० आणि ८७!

… आणि आता या २५ वर्षीय खेळाडूने आणखी एक दिमाखदार शतक (१२९ चेंडूंमध्ये नाबाद १०१) पूर्ण करून आपला फॉर्म कायम असल्याचे जाहीर केले. त्याने आपल्या संघाला जिंकण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. कसलं भारी रे शुभ!

मधल्या फळीतल्या फलंदाजांनी टप्प्याटप्प्यात त्याला चांगलीच मदत केली. केएल राहुलने त्यात सर्वाधिक म्हणजे नाबाद ४१ धावा केल्या.

आता पुढचा ब्लॉकबस्टर सामना पाकिस्तान विरूद्ध भारत असा आहे. २०१७ चा बदला घेण्याची वेळ आलीय. तयारीत राहा! 

 

थोडक्यात धावसंख्या: बांग्लादेशचा भारताकडून सहा विकेट्सनी पराभव. बांग्लादेश ४९.४ ओव्हर्समध्ये २२८/१० (तौहित हृदोय १००; मो. शामी ५/५३) भारत ४६.३ ओव्हर्समध्ये २३१/४ in (शुभमन गिल १०१*; रिषाद होसेन२/३८).