News

फक्त सहा दिवस बाकी!! सहावी ट्रॉफी, आयपीएल २०२५, CSKvMI, आम्ही आहोत तयार!

By Mumbai Indians

पलटन, आज सोमवार आहे. पण “अरे हो यार या आठवड्याच्या शेवटी आयपीएल सुरू होतेय” हा विचार तुमच्या मनात आलाच असेल ना?! 🤩

अवघ्या काही दिवसांपूर्वी आपल्या Women’s Team clinched their second WPL trophy दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध अंतिम सामन्यात रोमांचक विजय मिळवून दुसरी डब्ल्यूपीएल ट्रॉफी नावावर केली.

आपल्या चॅम्पियन्सकडून प्रेरणा घेऊन ब्लू अँड गोल्डमधले आपले खेळाडू २०२५ मोहिमेत मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत.

… आणि सहाव्या ट्रॉफीसाठी प्रयत्न सुरू करण्यासाठी फक्त सहा दिवस बाकी आहेत #6! 🏆 उत्साह? शिगेला पोहोचलाय. ऊर्जा? जबरदस्त. तयारी? फुल टू जोमात!

एमआय कॅम्प तर क्रिकेटचा सराव, धमाल मस्ती आणि वानखेडेवरची गंमत यात रमून गेलाय. मुलं जोरदार तयारी करतायत. नेट्समध्ये जबरदस्त हिट्स लागू लागलेत आणि आपले गोलंदाज आपल्या फिरकी आणि यॉर्कर्सनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचा वेध घेण्यासाठी तयारीत आहेत.🔥

आपली टीममागची टीम धोरणे ठरवण्यासाठी, गेम प्लॅन्स निश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक खेळाडू पहिल्या दिवसापासून खेळण्यास तयार असल्याची खात्री पटवण्यासाठी सज्ज आहे. तुमच्याकडे २३ स्टार्स प्रभाव टाकण्यासाठी आणि मैदानात आपला जीव ओतण्यासाठी तयार आहेत!

थोडक्यात सांगायचे तर आपला पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नईमध्ये एल क्लासिको आहे.

2013 • 2015 • 2019 – आयपीएलमध्ये आपला एकास एक रेकॉर्ड २०-१७ असला तरी या अप्रतिम सामन्याच्या आठवणी जागवण्यासाठी फक्त या सीझन्सचा उल्लेख पुरेसा आहे. 😉

तर चला मुंबईकरांनो तयार व्हा! तुमचा दिवस आता रोज सकाळी ताजा ताजा दैनिक एमआय MI Daily वाचन करून सुरू होईल आणि तडाखेबाज आयपीएल स्पर्धांनी संपेल!!!

थोडीशी प्रतीक्षा करा