News

“यालाच उधळलेल्या बैलाला वेसण घालणं म्हणतात”: ट्विटरवर ईशान किशनचा जयघोष

By Mumbai Indians

तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं. आपल्या खास पॉकेट डायनॅमोने मजेमजेत आपली बॅट सैल सोडली आणि पट्टा घुमवला. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतलं आज सर्वाधिक वेगवान द्विशतक पूर्ण केलं. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, रोहित शर्मा यांचा वारसा तो आता पुढे चालवतोय. ट्विटरवर क्रिकेट जगताने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.