
मुंबई इंडियन्सच्या संघात टायमल मिल्सऐवजी ट्रिस्टन स्टब्सचा समावेश
मुंबई इंडियन्सने दुखापतग्रस्त होऊन टाटा आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर गेलेल्या टायमल मिल्सऐवजी दक्षिण आफ्रिकन ट्रिस्टन स्टब्सला साइन केले आहे.
हा २१ वर्षीय टॅलेंटेड आणि मधल्या फळीत खेळणारा खेळाडू असून त्याने झिम्ब्बावेविरूद्ध दक्षिण आफ्रिकन ए स्क्वाडमध्ये पहिला सामना खेळला. ट्रिस्टन हा देशांतर्गत सीझनमध्ये खूप चांगला खेळत होता आणि त्याने अलीकडेच झालेल्या टी २० देशांतर्गत लीगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ट्रिस्टन उर्वरित सीझनमध्ये एमआयच्या संघात खेळणार आहे.