News

आम्हाला या परिस्थितीवर स्वार होऊन टीम म्हणून एकमेकांसोबत राहणे गरजेचे आहेः सचिन तेंडुलकर

By Mumbai Indians

आमच्या सीएसकेविरूद्धच्या हृदयद्रावक पराभवानंतर टीमचे मार्गदर्शक सचिन तेंडुलकर यांनी स्टेडियमवर “सचिन..... सचिन” असा उदघोष सुरू असताना पत्रकारांशी संवाद साधला.

मास्टर ब्लास्टर यांनी हे मान्य केले की आतापर्यंतचा सीझन आमच्यासाठी कठीण होता. परंतु आता एक टीम म्हणून यातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

“परिस्थिती कठीण असतानाही मुलांनी शक्य तितकी जास्त मेहनत केली आहे. आम्ही एमआय म्हणून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. ही तरूण आणि नवीन टीम आहे. त्यांना स्थिर होण्यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु या परिस्थितीत सर्वांना एकत्र राहावे लागेल, टीम म्हणून साथसोबत करून उपाय शोधावा लागेल,” सचिनने सांगितले.

अनेक सामन्यांमध्ये यशाच्या अगदी जवळ पोहोचल्यावर काही क्षणांमध्येच फासा पालटतो हे मास्टरब्लास्टरचे मत होते.

“टी २० क्रिकेटमध्ये प्रत्येक टीमने या परिस्थितीचा सामना केला आहे. हे स्वरूप क्रूर आहे, मार्जिन खूप कमी आहे. तुम्ही अवघ्या २-३ धावांनी हरता आणि कधीकधी शेवटच्या चेंडूवर हरता. आम्हाला या कठीण परिस्थितीवर मात करणे गरजेचे आहे,” तो म्हणाला.

त्याने मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका आणि आदर्श प्रशिक्षक कसा असला पाहिजे याबाबतही चर्चा केली.

“मी त्यांना उपाय सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरूणांना मार्गदर्शन करणे म्हणजे कधी मार्गदर्शकच्या भूमिकेतून बाहेर पडून त्यांना व्यक्त होण्याची संधी द्यायची आणि आपण श्रोता व्हायचे हे ठरवावे लागते. ही टीम तरूण आहे. ते चुका करतील परंतु तसेच ते शिकतील. आम्हाला त्यांना त्यांच्याकडे असलेल्या ऊर्जा आणि मेहनतीसाठी दिशा देणे गरजेचे आहे,” असे त्याने शेवटी सांगितले.

एसआरटीसारखा मार्गदर्शक टीममध्ये असणे हे या कठीण परिस्थितीसाठी उपयुक्त आहे आणि टीमला त्याच्या अनुभवाचा खूप फायदा होईल.