News

आपल्याला फक्त टीमला पाठिंबा द्यायची गरज आहेः झॅकचे मिड सीझन सिंहावलोकन

By Mumbai Indians

आम्ही पहिले सहा सामने हरल्यामुळे टाटा आयपीएल २०२२ च्या पहिला अर्धा सीझन आमच्यासाठी नियोजनानुसार झालेला नाही.

आमचे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक झहीर खान यांनी आतापर्यंतच्या सीझनबाबत आपले विचार मांडले आणि आत्ता एकत्र राहणे खूप आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.

“हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे आम्ही एकत्र राहणे आवश्यक आहे. आम्हाला एकत्र राहणे आणि मग एक शक्ती होऊन काम करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत,” झॅक म्हणाले.

प्रत्येक सामना आणि प्रत्येक सीझन एकेक अडथळा समोर आणतो आणि झहीरच्या मते त्याचा सामना करण्यासाठी आम्हाला वचनबद्धता दाखवली पाहिजे.

“प्रत्येक सीझनची स्वतःची आव्हाने असतात आणि आत्ता ताण सर्वाधिक आहे. त्यामुळे आम्हाला आमची मेहनत, लढण्याची तयारी आणि निष्ठा दाखवणे आवश्यक आहे. तुम्हाला ही निराशा पार करूनच पुढे जावे लागते आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला हेच शिकवतो,” ते म्हणाले.

आमचे दोन नवीन खेळाडू- डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा हे टीममध्ये चांगली कामगिरी करत आहेत आणि झहीर त्यांच्या कामाबद्दल खूश होते.

“या तरूण खेळाडूंमधली भागीदारी- ते जातात आणि गोलंदाजांवर दबाव येईल अशी सुंदर कामगिरी करतात. यावर आम्ही भर दिला पाहिजे. आम्हाला हाच स्पार्क हवा आहे,” झहीर म्हणाले.

या कठीण परिस्थितीत झहीरच्या मते आता टीमला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे.

“खेळाडू परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नात आहेत आणि आम्हाला फक्त त्यांना पाठबळ द्यायची गरज आहे. प्रत्येक दिवस हा तुमचा दिवस असेलच असेत नाही. परंतु तुम्ही त्याकडे कसे बघता, तुम्ही त्यातून काय शिकता आणि तुम्ही त्याचा अंगीकार कसा करता हे महत्त्वाचे आहे. मी निराश चेहरे पाहिलेले आहेत. परंतु खेळाडू दृढनिश्चयीदेखील  आहेत. आम्ही या परिस्थितीतून कसे बाहेर येतो, आम्हाला काय प्रकारची कटिबद्धता दाखवणे आवश्यक आहे, हे महत्त्वाचे आहे,” ते म्हणाले.

आणि त्याने सर्वाधिक गरजेचे संतुलन राखण्याचे महत्त्वही सांगितले.

“तुम्ही जिंकला किंवा हरला तरी आणि सीझन कसाही असला तरी आमच्याकडे दूरदर्शी दृष्टीकोन आहे. आम्ही संपूर्ण वर्षभर योग्य प्रकारचे संतुलन ठेवतो,” झॅकने समारोप करताना सांगितले.

सीझनच्या दुसऱ्या अर्ध्या भागात धडाकेबाज पुनरागमनासाठी आम्ही उत्सुक असताना झॅकचे हे प्रोत्साहक शब्द संघाचा उत्साह कायम ठेवतील.