टीमसाठी सर्वोत्तम ते सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न करतोः रोहित शर्मा
लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध १८ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने सामन्यानंतरच्या मुलाखतीत काही प्रश्नांची उत्तरे दिली.
सामना नेमका कुठे हरला असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर रोहितने कोणत्याही विशिष्ट कारणामुळे सामना हरला असे वाटत नाही असे सांगितले.
“एका विशिष्ट परिस्थितीला कारण बनवणे कठीण आहे. मला वाटले की १९९ धावा इथे काढता येतील. परंतु आम्हाला चांगली भागीदारी करता आली नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता तेव्हा हे खूप महत्त्वाचे असते,” रोहित म्हणाला.
जसप्रीत बुमरा हा आमचा त्या दिवसातल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. त्याने पॉवर प्लेमध्ये फक्त एकच ओव्हर गोलंदाजी केली. रोहितच्या मते एलएसजीच्या फलंदाजीचा क्रम लक्षात घेता त्याला डेथ ओव्हर्ससाठी ठेवणे योग्य ठरणार होते.
“आम्हाला टीम म्हणून जे योग्य वाटते ते आम्ही करतो. आम्ही व्यक्तीच्या पुढे टीमला ठेवतो. एलएसजी खूप सुंदर फलंदाजी करतात. त्यामुळे महत्त्वाच्या गोलंदाजांना मागे ठेवणे महत्त्वाचे ठरते. इथे किती धावा काढल्या हे आम्हाला माहीत आहे. आम्ही बुमराला मागे ठेवले. त्याने खूप सुंदर गोलंदाजी केली. परंतु इतरांना थोडी जास्त मेहनत करायची गरज आहे,” असे तो म्हणाला.
टीमच्या खेळणाऱ्या ११ खेळाडूंमधील बदलाबाबत बोलताना रोहितने हे मान्य केले की आम्ही सर्वोत्तम कॉम्बिनेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
“आम्ही विरोधक आणि परिस्थितीसाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही सामने जिंकत नसता तेव्हा त्याच त्याच ११ खेळाडूंना खेळवता येत नाही. आम्ही योग्य कॉम्बिनेशन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही हरता तेव्हा बदल केले जात आहेत हे सांगणे सोपे असते,” रोहित म्हणाला.
आणि त्याने विरोधी कर्णधार केएल राहुललाही श्रेय दिले. त्याने या सामन्यात शतकी खेळी केली.
“कधीकधी तुम्हाला विरोधी खेळाडूंचेही कौतुक करावे लागते. केएलने शेवटपर्यंत अत्यंत सुंदर फलंदाजी केली. ही गोष्ट आमच्याकडे कमी पडते आहे. आम्हाला आमचे पहिले ४ फलंदाज दीर्घकाळ खेळायला हवे आहेत. आम्ही खूप विचार करत नाही आहोत. परंतु मान कायम वर ठेवणे गरजेचे आहे,” असे तो म्हणाला.
कर्णधाराने आपला फॉर्म सध्या सर्वोत्तम नसल्याचेही मान्य केले. परंतु त्याने स्वतःची पाठराखणही केली.
“मी प्रत्येक सामन्यासाठी ज्या प्रकारे तयार होतो त्या प्रकारे तयार व्हायचा प्रयत्न करतोय. टीमला माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण न केल्याबद्दलची पूर्ण जबाबदारी मी घेतो आहे. मी एक खेळाडू म्हणून माझी जबाबदारी समजतो आणि मी स्वतःच्या पाठीशी राहून खेळाचा आनंद लुटण्याचा आणि मी जे काही करतोय ते करण्याचा प्रयत्न करतो. पुढे बघत राहणे महत्त्वाचे आहे. आम्ही यापूर्वीही पुन्हा खेळात आलो आहोत. आम्ही नक्कीच प्रयत्न करून पुनरागमन करू,” रोहितने सांगितले.
ही कर्णधाराची खूप प्रामाणिक मुलाखत होती. आता आगामी सामन्यांमध्ये आम्ही जोरदार प्रयत्न करून पुनरागमन करू अशी आशा आहे.