News

INDvENG, दुसरा ओडीआय: हिटमॅनचा कटकमध्ये दणका, मालिका आपल्या ताब्यात

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट टीम आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी स्टाइलमध्ये सज्ज होतेय असे म्हणायला हरकत नाही.

इंग्लंडच्या २०२५ मधील भारत दौऱ्याचा दुसरा ओडीआय सामना ४ विकेट्सनी रोहित शर्मा अँड कंपनीच्या नावावर झाला आणि एक सामना शिल्लक असताना त्यांनी मालिकाही खिशात टाकली.

आमच्या रोने धावांचा पाठलाग अक्षरशः सुसाट केला आणि विजयासाठी पाया रचला. तो दणक्यात फॉर्ममध्ये परत आलाय.

कटकमध्ये आपला दिवस कसा गेला हे पाहूया आता…

वरूणच्या पहिल्या ओडीआय सामन्यामागे काहीही रहस्य नाहीये!

टी२०आयमध्ये जबरदस्त फॉर्मचे प्रदर्शन केल्यानंतर वरूण चक्रवर्तीने ५० ओव्हर्सच्या स्वरूपातही आपला ठसा उमटवला. 🧢

चक्रवर्तीने भारताला सावरले

पॉवर प्लेच्या शेवटी इंग्लंडचा संघ ७५/० वर होता. या आपल्या ३३ वर्षीय खेळाडूने पहिल्याच सामन्यात पहिलीच ओडीआय विकेट फिल सॉल्टची घेतली. 💪

इंग्लंड – ८१/१ (१०.५ ओव्हर्स)

शुभमनमधला एसम्हणजे सणसणीत!

कसला कडक कॅच घेतला भावाने! आधीच्या सामन्यात जैसूने घेतलेल्या कॅचला तडका लावताना आपल्या उपकर्णधारानेही हॅरी ब्रुकचा कॅच पकडून त्याला घरी पाठवले. 🔥

इंग्लंड १६३/ (२९.४ ओव्हर्स)

जड्डू 𝕩

दुसऱ्या सामन्यात खेळताना रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या आणि धावांना खीळ घातली. त्याची दुसरी विकेट कशी होती ते बघा ना:

इंग्लंड – २५८/६ (४५ ओव्हर्स)

पाहुण्या संघाच्या ३०० धावा

इनिंगच्या शेवटी फलंदाज रन आऊट झाल्यामुळे इंग्लिश संघाला त्यांच्या अपेक्षेपेक्षा १५-२० धावा कमी पडल्या. परंतु त्यांनी एक भलीमोठी धावसंख्या उभारून भारतीय फलंदाजांसमोर आव्हान ठेवले.

इंग्लंड – ३०४/१० (४९.५ ओव्हर्स)

**********

फॉर्म येतो आणि जातो, क्लास कायम राहतो!!!

भावांनो आणि बहिणींनो, आपण याच रोहित शर्माला ओळखतो, नाही का?! 💥

आपल्या पहिल्या फळीचा दणदणीत खेळ आपल्या सर्वांनाच हवा होता आणि आपल्या हिटमॅनने आपल्याला त्याचीच मेजवानी दिली. त्याने फक्त ३० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवले. त्यात चार चौकार आणि षटकार होते.

पॉवर प्लेच्या शेवटी आपण ७७/० वर सहजपणे पोहोचलो होतो. गिलच्या ५२ चेंडूंमधील ६० धावा तर विस्मरणीय आहेत. त्याने सलामीच्या भागीदारीत महत्त्वाची भूमिका बजावली.

भारत १३६/(१६.४ ओव्हर्स)

आज आपण आनंदी होण्याची १०० कारणे!!!

प्रतीक्षा. आता. संपलेली. आहे. 💯

हे फक्त एक शतक नाहीये तर १.४ अब्ज भारतीयांचे स्वप्न पूर्ण होते आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना टोलवून लावत ९० चेंडूंमध्ये ११९ धावा. आपला तर रविवार सार्थकी लागला.

या उजव्या हाताच्या फलंदाजाने एक उत्तुंग षट्कार ठोकून हा महत्त्वाचा टप्पा पार केला आणि सर्वांनाच आनंदाचे भरते आले.

ही इनिंग अनेक बाबतीत खास होती. एक म्हणजे आपण इतक्यात बाहेर पडणारे नाही आहोत! 🧿

भारत२२०/(२९.४ ओव्हर्स)

अक्षर पटेलने कामगिरी पार पाडली

श्रेयस अय्यरच्या ४७ चेंडूंमधल्या ४४ धावांनी आपल्या टीमला विजयाच्या जवळ नेले. बापूच्या नाबाद ४१ धावांनी विजयाच्या मार्गात आणखी अडथळे येणार नाहीत याची काळजी घेतली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमने चार विकेट्स हातात ठेवून स्पर्धा आपल्या नावावर केली आणि भारतीय उपखंडात इंग्लंडविरूद्ध सातवी ओडीआय मालिका जिंकली.

 

थोडक्यात धावसंख्या: इंग्लंडचा भारताकडून चार विकेट्सनी पराभव. इंग्लंड ३०४/१० (जो रूट ६९; रवींद्र जडेजा ३/३५) भारत ३०८/६ (रोहित शर्मा ११९; जेमी ओव्हर्टन२/२७).