News

WTC अंतिम फेरी पूर्वावलोकनः हिटमॅनच्या नेतृत्वाखालील भारताला कसोटीमध्ये विजयाची आशा

By Mumbai Indians

शेवटी तो दिवस आला आहेः लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवण्याठी अटीतटीची लढाई आता सुरू होणार आहेः ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत. आता हा आयपीएलनंतरचा सीझन आहे.

आयसीसी कसोटी श्रेणीमध्ये पहिल्या दोन स्थानांवर असलेले ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांनी या वर्षाच्या सुरूवातीला २०२३ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकमेकांचा अंदाज घेतला आहे आणि आता ते लढण्यासाठी सुसज्ज आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सलग दुसऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पोहोचला आहे आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या मागच्या पाच सामन्यांमध्ये तीन वेळा विजय प्राप्त केला आहे. अनुभवी दिग्गज, तरूण आणि काही परतलेले खेळाडू यांच्यामुळे भारताचा संपूर्णपणे संघ सज्ज आहे. आयसीसी ट्रॉफीसाठी १० वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर आता ती आपल्यावर प्रसन्न होईल अशी आशाही आहे.

परंतु त्यांचा सामना दांडगट ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑसीज सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम आणि नऊ आयसीसी सामन्यांमध्ये सहा विजयांसोबत ते आपल्याला कठीण जातील.

अत्यंत अटीतटीचा आणि खेचाखेचीचा सामना होण्यासाठी तयारी सुरू झाली आहे, स्लेजिंग, चौकार आणि षटकार आणि ऑस विरूद्ध इंडिया यांच्यामधल्या सामन्यांमध्ये पाहायला मिळते ते सर्व पाहायला मिळेल. तेही प्रथमच जूनमध्ये सामना खेळवणाऱ्या ओव्हलमध्ये हे पाहायला मिळेल.

काय: ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत, आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ अंतिम सामना

कधी: बुधवार दिनांक ७ जून.

कुठे: ओव्हल, लंडन, इंग्लंड

काय अपेक्षा आहे: एक तगडी खेळपट्टी. तिथे तुम्हाला कितीतरी चढउतार पाहायला मिळतील, कोणत्याही एका बाजूसाठी दीर्घकाळ खेळण्याची संधी, भारताची ऑस्ट्रेलियन तोफखान्यासमोर फलंदाजी, नॅथन लिओनविरूद्ध किंग कोहलीचा तडका आणि अनपेक्षित हवामान.

तुम्ही काय करायचे आहे: थोडा वेळ ब्लू आणि गोल्ड बाजूला ठेवा. तुमच्या बॅटरीज तयार ठेवा कारण उत्साह वाढवायचा आहे. ब्लू कपडे घाला आणि पल्स मीटर जवळच ठेवा. प्रत्यक्ष सामना बघायला जाणार आहेत त्यांनी हवामानाचा सामना करण्यासाठी जास्तीचे कपडे सोबत ठेवावेत.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया: आकडेवारी

एकास एक नोंदी (सामने)

खेळले: १०६

भारताने जिंकले: ३२

ऑस्ट्रेलियाने जिंकलेः ४४

अनिर्णित: २९

बरोबरीत: १

ओव्हलवर फॉर्मबाबत माहिती

भारत: १४ कसोटी सामने खेळले, दोन जिंकले, पाच हरले आणि सात अनिर्णित.

ऑस्ट्रेलिया: ३८ कसोटी सामने खेळले, सात विजय, १७ पराभव आणि १४ अनिर्णित.

सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

भारत: सचिन तेंडुलकरः ३६३० धावा

ऑस्ट्रेलिया: रिकी पॉन्टिंगः २५५५ धावा.

सर्वाधिक विकेट्सः

ऑस्ट्रेलिया: नॅथन लिऑन- ११६ विकेट्स

भारत: रवीचंद्रन अश्विन- ११४ विकेट्स

संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), रवीचंद्रन अश्विन, केएस भरत, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, विराट कोहली, ईशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्झर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट, उमेश यादव.

राखीव: यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, एलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्राविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुसचांगने, नॅथन लिऑन, जोश इंग्लिस, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

राखीव: मिश मार्श, मॅट रेनशॉ