News

आशिया कप २०२२- भारताला हाँगकाँगविरूद्ध विजय मिळवून सुपर ४ मध्ये स्थान मिळवण्याची उत्सुकता

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघाची आशिया कपची सुरूवात अत्यंत उत्तम झाली आहे. भारताने आपला पारंपरिक स्पर्धक असलेल्या पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव करून आपले या स्पर्धेतील वर्चस्व सिद्ध केले आहे.

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या सुंदर खेळीमुळे भारतीय संघाला दोन चेंडू शिल्लक असताना १४८ धावांचे लक्ष्य पूर्ण करणे शक्य झाले. भुवनेश्वर कुमारनेही २६ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या आणि सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक ठरला.

भारतीय विरोधक संघ हाँगकाँग आपला आशिया कपमधील पहिला सामना बुधवारी सुरू करणार आहे. निझाकत खानच्या नेतृत्वाखालील टीम या स्पर्धेसाठी निवडली केली आहे. त्यांनी आशिया कप २०२२ च्या पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीविरूद्ध आठ विकेटने विजय प्राप्त केला.

आशिया कप २०२२ पूर्वी भारत विरूद्ध हाँगकाँगच्या सामन्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

भारत विरूद्ध हाँगकाँग एकास एक संख्या

भारत आणि हाँगकाँगचा टी२०आयमध्ये आजपर्यंत एकदाही एकमेकांशी सामना झालेला नाही. परंतु त्यांनी ओडीआय स्वरूपात दोनदा भारताशी सामना केला आहे आणि दोन्ही सामने ते जिंकले आहेत.

या दोन्ही टीम्समधील शेवटचा सामना ५० ओव्हर्समध्ये २०१८ सालचा आशिया कप होता. त्यात भारताला अत्यंत अटीतटीच्या सामन्यात हाँगकाँगवर २६ धावांनी विजय मिळवता आला.

सर्वप्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २८५/७ ची धावसंख्या उभारली. धवनने या सामन्यात १२० चेंडूंमध्ये १२७ धावा केल्या. हाँगकाँगने त्याचे प्रत्युत्तर देत असताना पहिल्या विकेटसाठी निझाकत खान आणि अंशुमन रथ यांच्यादरम्यान १७४ धावांची भागीदारी केली.

परंतु निझाकत बाद झाल्यानंतर हाँगकाँगच्या फलंदाजीचा डोलारा कोसळला आणि भारत धक्कादायक पराभवापासून बालंबाल बचावला. अंतिमतः हाँगकाँगने आपली इनिंग २५९/८ वर संपवली.

या खेळाडूंवर असेल लक्ष

विराट कोहली आशिया कप २०२२ मधील एका महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असेल. त्याने ३४ चेंडूंमध्ये ३५ धावा फटकावून आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. कोहली हा पहिला भारतीय आणि एकूणातील दुसरा खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारांमध्ये १०० सामने खेळले आहेत. त्यांनी ४९.८९ च्या सरासरीने एकूण ३३४३ टी२०आय धावा काढल्या आणि तुलनेने नवीन स्पर्धक असलेल्या हाँगकाँगविरूद्ध खाते उघडण्यासाठी तो उत्सुक आहे.

भारताचा विरोधी संघ- हाँगकाँग- भारताविरूद्ध विजयासाठी एहसान खानच्या खेळावर विसंबून  आहे. स्पिनर असलेल्या या महान खेळाडूने ३१ सामन्यांमध्ये ३९ विकेट्स घेतल्या आहेत आणि मधल्या ओव्हर्समध्ये भारतीय फलंदाजांवर ताण टाकण्यासाठी उत्सुक असेल.

भारत विरूद्ध हाँगकाँग आशिया कप २०२२ ग्रुप ए सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार (आयएसटी) बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

पलटन, तुमच्या आवडत्या संघावर प्रेमाचा वर्षाव करायला विसरू नका!