News

उत्कृष्ट कामगिरीमुळे एकदिवसीय मालिकेचा पहिला विजय दक्षिण आफ्रिकेच्या पारड्यात

By Mumbai Indians

दक्षिण आफ्रिकेने भारताला घरच्या खेळपट्टीवर खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला पराभव चाखवून १-० अशी आघाडी घेतली.

पावसामुळे कमी ओव्हरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात क्विंटन डे कॉक आणि जानेमन मालन यांनी पाहुण्या संघाला एक स्थिर सुरूवात करून दिली. त्यानंतर हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलत १३९ धावांची भागीदारी केली आणि दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २४९/४ वर नेली.

भारतीय संघाची पाठलागाची सुरूवात कठीण झाली. भारताचे दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्या सहा ओव्हर्समध्ये आणि फक्त १८ धावा फलकावर असताना बाद झाले. अय्यरच्या पन्नास धावा आणि सॅम्सनच्या नेत्रदीपक खेळामुळे भारताला शेवटपर्यंत सामन्यात टिकून राहता आले.

सामन्याची सुरूवात पावसामुळे दोन तास विलंबाने झाली.

भारताने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रभारी कर्णधार शिखर धवन याने सहा फलंदाज आणि पाच गोलंदाजांची घोषणा केल्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि रवी बिष्णोई यांना आपले एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतले पहिले सामने खेळता आले.

दक्षिण आफ्रिकेससाठी जानेमन मालन, हेन्रिच क्लासेन आणि तब्रेज शम्सी हे खेळाडू टी२०आय मालिकेत निराशाजनक कामगिरी करून पुन्हा ११ च्या संघात आले.

नवीन चेंडूने खेळायला सुरूवात केलेल्या मोहम्मद सिराजला लगेच यश मिळत होते. परंतु अंपायरनी जानेमन मालन याला नाबाद ठरवले.

प्रोटीआजचे सलामी फलंदाज सिराज आणि आवेश खानच्या स्विंग गोलंदाजीपुढे चाचपडत असल्यामुळे भारताची सुरूवात खूप चांगली झाली. पॉवर प्लेच्या आठ ओव्हर्सच्या शेवटी धावफलकावर २८/० धावा होत्या.

भारतीय संघाला पुन्हा एकदा आणखी एक विकेट दृष्टीपथात दिसली होती. परंतु शुभमन गिलने पॉवरप्लेनंतर लगेचच मालनला बाद करण्याच्या प्रयत्नात त्याची कॅच सोडली.

मालनचा धडाकेबाज ४२ चेंडूंमधील २२ धावांचा खेळ शेवटी १३ व्या ओव्हरमध्ये संपला. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्याला बाद घोषित करण्यात आले.

शार्दुल ठाकूरने आपली दुसरी विकेट १५ व्या ओव्हरमध्ये घेतली. दक्षिण आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाचा वाईट फॉर्म कायम राहिला. त्याच्या बॅटची जादू यावेळी फारशी चालली नाही.

कुलदीप यादवच्या पुढच्याच ओव्हरमध्ये एडन मार्क्रम बाद झाल्यामुळे विकेट्स पडू लागल्या होत्या. टीम इंडियाला त्यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे चांगला फायदा मिळाला.

इनिंग अर्ध्यावर आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर ९२/३ धावा होत्या.

त्यानंतर लवकरच रवी बिष्णोईने २३ व्या ओव्हरमध्ये आपली पहिली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील विकेट घेतली. फॉर्ममध्ये असलेल्या क्विंटन डे कॉकला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही.

हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी त्यानंतर रनरेट वाढवला. त्यांनी ५० धावांची भागीदारी केली आणि ३६ व्या ओव्हरमध्ये आपल्या प्रत्येकी ५० धावा पूर्ण केल्या. त्यामुळे त्यांच्या टीमला एक तगडी धावसंख्या उभारणे शक्य झाले.

भारतीय संघ सुरूवातीपासूनच चाचपडत राहिला. अनेकदा कॅच सोडल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गलथान क्षेत्ररक्षणामुळे या दोन फलंदाजांना नाबाद राहून आपल्या टीमला २४९/४ पर्यंत पोहोचवता आले.

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल तिसऱ्या ओव्हरमध्ये रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये वायने पारनेलच्या फलंदाजीवर १६ चेंडूंमध्ये फक्त ४ धावा करून शिखर धवनही बाद झाल्यामुळे भारतीय संघावर दडपण आले.

पॉवर प्लेचा टप्पा संपला तेव्हा भारतीय संघाने फक्त १८/२ धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाड आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज ईशान किशन हे दोघे पाहुण्या संघाच्या गोलंदाजीवर थोडक्यात बचावले.

या दोन्ही खेळाडूंनी भारताचा खेळ स्थिरावत ४० धावांची भागीदारी केली. परंतु ते १७ आणि १८ व्या ओव्हरमध्ये तंबूत परतले. यजमान संघ तेव्हा ५१/४ वर होता.

श्रेयस अय्यर आणि संजू सॅम्सन ही जोडी हल्ला करण्याच्या हेतूनेच मैदानात उतरली. त्यांनी फक्त ३१ चेंडूंमध्ये जोरदार पन्नास धावांची भागीदारी करून त्यांच्या टीमला एक आशेचा किरण दाखवला.

त्यानंतर लवकरच श्रेयस अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण करून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतील आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवले. भारताला या टप्प्यात ८४ चेंडूंमध्ये १३२ धावांची गरज होती.

त्यानंतर अय्यर २७ व्या ओव्हरमध्ये बाद झाल्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा अंधुक झाल्या.

शेवटच्या पॉवरप्लेमध्ये भारताला ८ ओव्हर्समध्ये ९६ धावांची गरज होती. भारताला प्रयत्न करून विजयापर्यंत पोहोचवण्याची धुरा ठाकूर आणि सॅम्सनवर होती.

सॅम्सनच्या ४९-चेंडूंमधील ५०* धावांमुळे रनरेट १६ वर असतानाही भारताच्या आशा कायम होत्या.

भारताने ३६ आणि ३७ व्या ओव्हरमध्ये एकूण २८ धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे भारताच्या सामना जिंकता येईल अशी आशा नव्याने निर्माण झाली. परंतु शार्दुल ठाकूरची साहसी ३१ चेंडूंमधील ३३ धावांची खेळी संपुष्टात आल्यामुळे पुन्हा निराशा आली.

शेवटच्या टप्प्यात विकेट्स घेऊन प्रोटीआजना आपल्या दिशेने सामना वळवता आला आणि नऊ धावांनी विजय मिळवणे शक्य झाले.

थोडक्यात धावसंख्या: दक्षिण आफ्रिकेकडून २४९/४ (डेव्हिड मिलर ७५*, शार्दुल ठाकूर २/३५) भारताचा नऊ धावांनी पराभव २४०-८ (संजू सॅम्सन ८६*, लुंगी गिडी ३/५२)

या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेची पुढील वर्षातल्या ५० ओव्हर विश्वचषक स्पर्धेत थेट निवड होण्याची शक्यता वाढली आहे. भारताबाबत सांगायचे झाल्यास येत्या ० ऑक्टोबरला रांची येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जोर लावावा लागेल.