INDvENG, तिसरा टी२०आय: इंग्लंडचे पुनरामगन आणि चक्रवर्तीच्या पाच विकेट्स
इंग्लंडच्या २०२५ मधील भारतीय दौऱ्यातील तिसरा टी२०आय सामना पाहुण्या संघाला २६ धावांनी विजयी करून गेला. त्यामुळे त्यांची नौका या मालिकेत कायम राहिली आहे.
राजकोटमधील सामन्याला सुरूवात झाली तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवने सलग तिसऱ्या वेली टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय या सामन्यात जलदगती गोलंदाज मोहम्मद शामीने तब्बल १४ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
पहिल्या इनिंगमध्ये वरूण चक्रवर्तीने अक्षरशः धुरळा उडवला. त्याने पाच विकेट्स घेताना एकाही फलंदाजाला मोकळेपणी फटकेबाजी करण्याची मुभा दिली नाही.
Varun ka 𝐂𝐡𝐚𝐤𝐫𝐚𝐯𝐮𝐲 🖐️#INDvENG #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/7E0ihJEa3h
— Mumbai Indians (@mipaltan) January 28, 2025
आपल्यासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टी२०आय चॅम्पियन्सची फलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही. त्यामुळे आपल्याला विजय मिळवता आला नाही. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना कशा प्रकारे पार पडला ते पाहूया.
एचपीची पहिली विकेट, स्पिनर्सनी कित्ता गिरवला
अष्टपैलू हार्दिक पांड्याने फारसा वेळ वाया न घालवता दुसऱ्याच ओव्हरमध्ये फॉर्ममध्ये नसलेल्या फिल सॉल्टला बाद केले. याला म्हणतात सुरूवात.
परंतु कर्णधार जो बटलर आणि बेन डकेट यांनी मधल्या फळीत चांगला खेळ करून एक बऱ्यापैकी भागीदारी केली आणि पहिल्या विकेटचे दुःख दूर सारले.
परिस्थिती ८.५ ओव्हर्समध्ये ८३/१ वर असताना स्पिनर्सनी खेळ हातात घेतला आणि आपल्या स्टाइलमध्ये गाडी वळवली.
वरूणने इंग्लंडला चक्रव्यूहात अडकवले!
आपला जादुई वरूण चक्रवर्ती प्रत्येक सामन्यासोबत जास्तीत जास्त चांगला खेळ करत चाललाय. त्याने या सामन्यात केलेली कामगिरी अद्भुत होती.
या ३३ वर्षीय खेळाडूने संजू सॅम्सनच्या सुंदर विकेटच्या मदतीने जो बटलरच्या विकेटपासून सुरूवात करून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटर्न, ब्रायडन कार्से आणि जोफ्रा आर्चर यांना सिंगल डिजिट स्कोअरवर बाद करून टी२०आयमध्ये दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या.
Double-wicket over 👌
— BCCI (@BCCI) January 28, 2025
Completion of fifer for Varun Chakaravarthy 👌
Updates ▶️ https://t.co/amaTrbtzzJ#TeamIndia | #INDvENG | @chakaravarthy29 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ne0Ze0lppj
चक्रवर्ती आणि अक्षर पटेल, रवी बिष्णोई यांनी मिळून इंग्लंडला ८३/१ वरून १२७/८ वर आणले. त्यांनी भारतीय संघाला सामन्यात परत आणण्यासाठी एकही प्रयत्न सोडला नाही.
आपला पांड्याने ब्रिटिश इनिंग्समधली नववी आणि शेवटची विकेट घेतली. २० ओव्हर्सच्या शेवटी धावफलक १७१/९ वर होता.
पाठलागादरम्यान टीम इंडियाची दमछाक
सलामी फलंदाज अभिषेक शर्माने आपल्या संघाला १४ चेंडूंमध्ये २४ धावा करून एक चांगली सुरूवात करून दिली. त्याने पाच चौकार मारले. परंतु, इंग्लंडने नियमित अंतराने विकेट्स घेऊन खेळ आपल्या ताब्यात ठेवला.
आपला तरूण खेळाडू तिलक वर्मा सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. या वेळी त्याचेही फारसे काही चालले नाही. तो आदिल राशीदच्या चेंडूवर बाद झाला. १० ओव्हर्स संपल्या तेव्हा धावसंख्या ७८/४ वर होती.
हार्दिक पांड्याचे आटोकाट प्रयत्न पुरेसे पडले नाहीत...
विकेट्स पडत असल्यामुळे रनरेट कमी झाला. परंतु हार्दिक पांड्याने १९ व्या ओव्हरच्या सुरूवातीपर्यंत किल्ला हातात ठेवला. त्याने ३५ चेंडूंमध्ये केलेल्या ४० धावा पुरेशा ठरल्या नाहीत कारण इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवला.
आता हा निकाल हातात आल्यानंतर दोन्ही टीम्स चौथ्या टी२०आयसाठी पुण्याला जात असून हा सामना ३० जानेवारी रोजी होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला एमसीए स्टेडियवर खेळात पुनरागमन करून एक चांगली कामगिरी करण्याची आस असेल.
थोडक्यात धावसंख्या: इंग्लंड १७१/९ (बेन डकेट ५१, वरूण चक्रवर्ती ५/२४) कडून भारताचा २६ धावांनी पराभव. भारत १४५/९ (हार्दिक पांड्या ४०, जेमी ओव्हरटर ३/२४)