News

AUSvIND, पहिली कसोटी: ऐतिहासिक विजय पक्का, कर्णधार म्हणून बूमचा पहिला विजय

By Mumbai Indians

परिस्थिती कठीण होते तेव्हा चिवट लोक पुढे जात राहतात

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या एक पाऊल जवळ आणण्यासाठी विजय मिळवलाच पाहिजे हे माहीत असताना जसप्रीत बुमरा आणि कंपनी या दोघांनी ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ ची सुरूवात केली. हा सामना ऑप्टस स्टेडियमवर झाला आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांनी प्रथमच इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

कर्णधाराच्या सुंदर पाच विकेट्स, वायबीजे आणि व्हीकेची सुंदर शतके, नितीश रेड्डी आणि हर्षित राणाचे अविस्मरणीय पहिले सामने आणि इतर बरेच काही... पर्थमधला आपला विजय कशा प्रकारे झाला हे पाहा!

पंत, नितीश रेड्डी यांनी नौका सावरली

आधी फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय टीमला अत्यंत घातक जलदगती गोलंदाजीचा सामना करावा लागला.

आपल्या फलंदाजांपैकी ऋषभ पंत (७८ चेंडूंमध्ये ३७ धावा) आणि प्रथमच खेळणाऱ्या नितीश रेड्डी (५९ चेंडूंमध्ये ४१ धावा) या दोघांनी पाहुण्या संघाला अडचणीतून बाहेर काढले.

त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला. त्यात त्याचा खास ऋषभ पंत शॉट होता. त्याचवेळी नितीशभाऊने आपला हल्ला कायम ठेवला. त्याने सहा चौकार आणि एक दणदणीत षटकार ठोकला.

ऑसीजने सीमर्ससाठी असलेल्या पिचचा पुरेपूर वापर केला. जो हेजलवूडने ४/२९ आणि मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिशेल मार्शने भारताला १५० वर सर्व बाद केले.

गोलंदाजांनी धडाका दाखवला

आमचा जस्सीभाईवर पूर्ण विश्वास आहे कारण तो गेम चेंजर खेळाडू आहे. तो आहे आपला एकमेव जसप्रीत बुमरा!!!

18-6-30-5 — बूमच्या सुंदर जलदगती गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना पुरते गारद केले. त्याने त्यांना १०४/१० वर थांबवले. ही भारताविरूद्ध त्यांची चौथ्या क्रमांकाची सर्वांत कमी धावसंख्या ठरली.

या वेळी डोक्याला त्रासही नव्हता कारण प्रथमच खेळणाऱ्या हर्षित राणानेही तीन विकेट्स घेतल्या. त्याने ट्राविस हेडला बाद करून आपली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट नोंदवली. त्याच्या टीम इंडियाच्या करियरची यापेक्षा चांगली सुरूवात काय असू शकते, नाही का?

मधल्या फळीत भारतीय फलंदाजांची धमाल!

दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला पिच फलंदाजांसाठी जरा चांगली झाली आणि आपले ओपनर्स यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी त्याचा पुरेपूर वापर केला. त्यांनी २०१ धावांची भागीदारी केली. भारतासाठी ऑस्ट्रेलियन मातीवर सर्वाधिक ओपनिंग धावसंख्या त्यांनी उभारली.

वायबीजेने आपला फॉर्म कायम ठेवला आणि आपल्या टीमला १६१ धावा करून चांगल्या स्थितीत आणून ठेवले. आपली आघाडी ३००+ ची झाली.  

विराट कोहलीने आपल्या क्लास आणि उद्दिष्ट या दोन्ही गोष्टी आपल्या खेळात दाखवून ८१ वे शतक झळकवले. या ३६ वर्षीय खेळाडूने नाबाद १०० धावा केल्यामुळे टीमची आघाडी ५३३ धावांची झाली. हे लक्ष्य बॅगी ग्रीन्ससाठी खूप जास्त ठरले.

मग आपण जिंकलो!!

तिसरा दिवस संपला तेव्हा धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ १२/३ वर धापा टाकत होता.

…मग अवघ्या काही वेळातच भारतीय क्रिकेट टीमने १-० ने आघाडी घेतली आणि सामना त्यांच्या हाताबाहेर नेऊन ठेवला.

मधल्या फळीच्या प्रतिकाराला टीम इंडियाने धुवून टाकले आणि ऑसीज बॅटिंग युनिटला चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात काढून टाकले. त्यांनी या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यापूर्वीच्या या डू-ऑर-डाय मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

 

थोडक्यात धावसंख्या: भारत १५०/१० (नितीश रेड्डी ४१; जो हेजलवूड ४/२९) आणि ४८७/६ दिवस (यशस्वी जैस्वाल १६१; नॅथन लिऑन २/९६) कडून ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव १०४/१० (मिशेल स्टार्क २६; जसप्रीत बुमरा ५/३०) आणि २३८/१० (ट्राविस हेड ८९; जसप्रीत बुमरा ३/४२).