News

वेळापत्रक, नियम, स्लॉट्स, पैसे - आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन दिनासाठी अल्टीमेट एमआय गाइड

By Mumbai Indians

सोल्डडड!!!

हा जादुई शब्द तुमच्या कानांत गुंजत असेल तर तुम्ही आता त्या खास दिवसाची तयारी करत आहात.

पलटन, आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनच्या तारखा आणि ठिकाण घोषित झाल्यापासून तुमचा उत्साह शिगेला पोहोचलाय हे आम्हाला माहीत आहे आणि अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आपल्या फ्रँचायझींच्या प्रतीक्षेत आहेत.

चला तर मग बघूया, चालेल ना? आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे आणि मग आपला ग्रँड इव्हेंट सुरू होईल.

तारखा बघूया का?

हा दोन दिवसांचा कार्यक्रम २४-२५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सौदी अरेबियातील अबादी अल जोहार अरेनामध्ये आयोजित केला जाईल. लिलावाची वेळ १.०० वाजता म्हणजे भारतात दुपारी ३.३० वाजता असेल.

मागच्या वर्षीच्या दुबईत झालेल्या मिनी ऑक्शननंतर परदेशात होणारा हा आयपीएलचा पहिलाच लिलाव आहे.

ऑक्शन रूममध्ये शोचे सूत्रसंचालक कोण असतील?

लिलावकर्त्या मल्लिका सागर या सलग दुसऱ्या वेळी लिलावाची सूत्रं आपल्या हातात घेणार आहेत.

मग किती खेळाडूंनी नोंदणी केली आहे?

सुरूवातीला १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

निवड समितीने निवड केल्यानंतर विविध फ्रँचायझींमध्ये उपलब्ध असलेल्या २०४ स्लॉट्ससाठी ५७७ खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:

तपशील

खेळाडूंची संख्या

कॅप्ड भारतीय

४८

अनकॅप्ड भारतीय

३१९

कॅप्ड परदेशी

१९४

अनकॅप्ड परदेशी

१२

सहयोगी देश

एकूण

५७७

आणि या खेळाडूंच्या पायाभूत किमती काय आहेत?

हे बघा पलटन!

पायाभूत किंमत (रूपये)

खेळाडूंची संख्या

२०० लाख

८२

१५० लाख

२७

१२५ लाख

१८

१०० लाख

२३

७५ लाख

९२

५० लाख

४० लाख

३० लाख

३२२

एकूण

५७७

२०२५ सीझनसाठी आपण कोणाला रिटेन केले आहे?

आगामी सीझनच्या सुरूवातीला आपल्या सध्याच्या संघात पाच रिटेन केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यात कर्णधार हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे आहेत.

आता आपल्याकडे किती रक्कम शिल्लक आहे?

प्रत्येक टीमला १२० कोटींची एकूण पर्स देण्यात आली आहे.

त्यामुळे या ब्लू अँड गोल्डमधल्या पाच खेळाडूंवर एकूण ७५ कोटी रूपये खर्च केल्यानंतर आपल्याकडे ४५ कोटी आहेत आणि आता आपण मेगा ऑक्शनमध्ये जाणार आहोत.

या वेळी आपली खरेदीची मर्यादा काय आहे?

नियमांनुसार सांगायचे झाल्यास टीमकडे १८-२५ खेळाडू असू शकतात. त्यातील १८ ही खेळाडूंची किमान मर्यादा आहे.

त्यामुळे आमचे थिंकटॅंक किमान १३ नवीन खेळाडू (१८ ची किमान मर्यादा पूर्ण करण्यासाठी) आणि कमाल २० नवीन खेळाडू (कमाल २५ खेळाडूंची मर्यादा पूर्ण करण्यासाठी) घेऊ शकतात.

परदेशी खेळाडूंच्या स्लॉटबद्दल बोलायचे झाल्यास आपला संघ सध्याच्या परिस्थितीनुसार आठ परदेशी खेळाडू ठेवू शकतो.

पलटनची भूमिका काय असेल?

तुमच्या टीव्हीला चिकटून राहा आणि जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू #OneFamily मध्ये येईल तेव्हा फक्त #AalaRe असं जोरात ओरडा.

ऑक्शन सुरू होण्यापूर्वी आमचा एमआय स्क्वाड सिलेक्टर गेम खेळायला विसरू नका. तुमच्या अचूक अंदाजांमुळे तुम्हाला कूल मुंबई इंडियन्स मर्चंटाइज जिंकण्याची संधी मिळू शकते.