बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ प्रीव्ह्यूः जिंकू किंवा मरू ft. टीम इंडिया
वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्या, स्लेज, धमाल आणि सगळ्याच गोष्टी...
या वर्षातील बहुप्रतीक्षित द्विसंघीय मालिका जवळ आलीय आणि या वेळी भारतीय क्रिकेट संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये ऑसीजचा बदला घेण्यासाठी प्रवास करून जाणार आहे.
टीम इंडियाला न्यूझीलंडविरूद्ध अलीकडेच झालेल्या मालिकेतील पराभवाचे दुःस्वप्न विसरण्याची आतुरता आहे. या सामन्यात ते घरच्या खेळपट्टीवर ३-० ने पराभूत झाले आणि द्विसंघीय कसोटी मालिकेत व्हाइटवॉश पराभवाचा अनुभव घेतला. याचा परिणाम म्हणून डब्ल्यूटीसी २०२३-२५ रँकिंगमध्ये त्यांचे पहिले स्थानदेखील हिरावले.
… आणि आता या पराभवातून स्वतःला सावरण्यासाठी दोन वेळा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीतील संघ मागच्या सामन्यांमधील काही गोष्टींची उजळणी करतील जिथे ते अनेक ठिकाणी सर्व परिस्थितींचा सामना करून विजयी ठरले. त्यांनी क्रिकेट समूहाला आश्चर्यचकितही केले.
ऑस्ट्रेलियन भूमीवरील या सर्वांत सुंदर विजयांपैकी एक विजय जानेवारी २०२१ मध्ये पाहायला मिळाला. या सामन्यात भारतीय संघ गब्बा, ब्रिस्बेन येथे तीन विकेट्सनी विजयी झाला. त्यांनी नोव्हेंबर १९८८ पासून त्यांच्या कसोटीतल्या बालेकिल्ल्यावर पराभवाची चव चाखली.
टीम इंडियाने मागच्या चार बीजीटी मालिका २-१ च्या फरकाने जिंकल्या आहेत. परंतु किवीजविरूद्ध मागच्या द्विसंघीय कसोटी मालिकेतील चिंताजनक फॉर्म पाहता भारतीय संघाला आपले वर्चस्व राखणे कठीण जाऊ शकते.
डब्ल्यूटीसी २०२३-२५ गुणतक्ता (आजच्या तारखेनुसार)
संघ |
सामने |
जिंकले |
हरले |
अनिर्णित |
गुण |
पीसीटी |
ऑस्ट्रेलिया |
12 |
8 |
3 |
1 |
90 |
62.50 |
भारत |
14 |
8 |
5 |
1 |
98 |
58.33 |
श्रीलंका |
9 |
5 |
4 |
0 |
60 |
55.56 |
न्यूझीलंड |
11 |
6 |
5 |
0 |
72 |
54.55 |
दक्षिण आफ्रिका |
8 |
4 |
3 |
1 |
52 |
54.17 |
इंग्लंड |
19 |
9 |
9 |
1 |
93 |
40.79 |
पाकिस्तान |
10 |
4 |
6 |
0 |
40 |
33.33 |
बांग्लादेश |
10 |
3 |
7 |
0 |
33 |
27.50 |
वेस्ट इंडिज |
9 |
1 |
6 |
2 |
20 |
18.52 |
टीम इंडिया डब्ल्यूटीसी २०२३-२५ च्या अंतिम सामन्यासाठी कशी पात्र होईल?
आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही डब्ल्यूटीसी २०२३-२५ चक्रातील भारताची शेवटची असाइनमेंट असेल.
पाच देश पहिल्या दोन स्थानांसाठी स्पर्धा करत असताना भारतीय क्रिकेट टीमसाठी गणित अगदी सोपे आहे- ऑस्ट्रेलियावर ४-० किंवा ५-० ने मात करणे जेणेकरून इतर टीम्सच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
टीम इंडियाने ४-१ ने विजय नोंदवला आणि श्रीलंका (४ कसोटी), न्यूझीलंड (३ कसोटी) किंवा दक्षिण आफ्रिका (४ कसोटी) यांनी याच चक्रात आपले सर्वच सामने जिंकले तर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.
भारताचा एकापेक्षा जास्त सामन्यात पराभव झाल्यास आणि दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी आपल्या सर्वच सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ अंतिम फेरीतून बाहेर फेकला जाईल.
काय: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५
कधी आणि कुठे:
पहिली कसोटी- शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०२४ (पर्थ | सकाळी ७.५० वाजता)
दुसरी कसोटी – शुक्रवार ६ डिसेंबर २०२४ (एडलेड | सकाळी ९.३० वाजता)
तिसरी कसोटी - शनिवार, १४ डिसेंबर २०२४ (ब्रिस्बेन | सकाळी ५.५० वाजता)
चौथी कसोटी – गुरूवार, २६ डिसेंबर २०२४ (मेलबर्न | सकाळी ५.०० वाजता)
पाचवी कसोटी – शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ (सिडनी | सकाळी ५.०० वाजता)
काय अपेक्षा आहे: पलटन, ऑस्ट्रेलियन उन्हाळ्याचा सामना करायला तयार राहा. कारण दोन दिग्गज संघांना आपल्या हक्कांसाठी लढताना पाहण्याइतकी मजा दुसरी कशातच नाही.
तुमच्या टीव्हीवर हीट जाणवेल, त्यालाही तयार राहा आणि पाहुण्या संघासाठी चूक करण्याची कोणतीही संधी नसल्यामुळे ते पूर्णपणे सज्ज असतीलच.
ते काय म्हणतात: “जस्सीने नेतृत्वासाठी आपली तयारी असल्याचे आधीच दाखवून दिले होते. तो यापूर्वीही खूप यशस्वी ठरला होता आणि ड्रेसिंग रूममध्ये त्याचे बोलणे सकारात्मक असते. तो आमचे नेतृत्व करेल आणि सगळे तरूण खेळाडू त्याचे अनुकरण करतील.” – असे मत गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मोर्केल यांनी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराबद्दल व्यक्त केले.
"आम्हाला भारतातील पराभवाचे ओझे जाणवत नाही. आम्हाला न्यूझीलंड मालिकेत बरेच काही शिकायला मिळाले परंतु तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आमचे निकाल आता वेगळे आहेत.” - बीजीटी एक नवीन सुरूवात असल्याचे जसप्रीत बुमराने सांगितले.
“मला या पदावर आल्याचा खूप आनंद आणि उत्साह वाटतोय कारण टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी क्वचितच मिळते." – आपले बालपणीचे स्वप्न अस्तित्वात आल्याबद्दल जसप्रीत बुमरा म्हणाला.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत: आकडेवारी
कसोटीमध्ये एकास एक आकडेवारी |
||
ऑस्ट्रेलिया |
संघ |
भारत |
107 |
सामने |
107 |
45 |
जिंकले |
32 |
32 |
हरले |
45 |
29 |
अनिर्णित |
29 |
1 |
बरोबरीत |
1 |
रिकी पॉन्टिंग (2,555) |
सर्वाधिक धावा |
सचिन तेंडुलकर (3,630) |
नॅथन लिऑन (121) |
सर्वाधिक विकेट्स |
रवीचंद्रन अश्विन (114) |
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 संघ
ऑस्ट्रेलिया (फक्त पहिली कसोटी): पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, एलेक्स केरी (विकेट कीपर), जो हेजलवूड, ट्राविस हेड, जो इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुसचेंज, नॅथन लिऑन, मिच मार्श, नॅशन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), *जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, ^शुभमन गिल, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेट कीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेट कीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मो. सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
* रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमरा कर्णधार असेल.
^ शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला पहिल्या कसोटीत खेळवले जाणार नाही.