News

बीसीसीआय नमन एवॉर्ड्स २०२५ - बुमरा, तेंडुलकर यांना सर्वोच्च पुरस्कार प्रदान

By Mumbai Indians

ब्लू अँड गोल्डच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे… 💙

शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी बीसीसीआय नमन एवॉर्ड्स २०२५ चे आयोजन आमच्या मुंबईत करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अनेक क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरीसाठी गौरवण्यात आले.

आपल्या एमआयच्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराला पुरूषांच्या श्रेणीत सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या सन्मानाने गौरवण्यात आले. आम्हाला अर्थातच काही शंका नव्हतीच.

बूमच्या २०२४ मधल्या अप्रतिम कामगिरीबाबत जाणून घेण्यासाठी 👉 CLICK HERE!

याशिवाय जस्सीभाईला यंदा तिसऱ्या वेळी या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले. यापूर्वी त्याला २०१८-१९ आणि २०२१-२२ मध्ये गौरवण्यात आले होते.

दरम्यान सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटच्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी कर्नल सी. के. नायडू पुरस्काराने गौरवण्यात आले.

आता आपला “लिटिल मास्टर” कपिल देव, सुनील गावस्कर, रवी शाश्त्री, बिशन सिंग बेदी आणि दिलीप वेंगसरकर अशा या पुरस्काराने गौरवल्या गेलेल्या महान खेळाडूंच्या पंगतीत जाऊन बसला आहे.

खूप अभिनंदन जसप्रीत बुमरा आणि सचिन तेंडुलकर. पलटनला तुमचा खूप अभिमान वाटते.