News

ब्लू अँड गोल्ड रंगात एक तप रंगला बूमः या महान खेळाडूचे कौतुक

By Mumbai Indians

आज ३ फेब्रुवारी आहे पलटन – २०१३ मध्ये #OnThisDay आपण दि जसप्रीत बुमराला आपल्यासोबत आणले. तो आपल्या #OneFamily मध्ये आला आणि मग कुठेच नाही गेला.

ही प्रेमकहाणी १२ वर्षे, ५ ट्रॉफीज आणि अगणित चढउतारांसह दरवर्षी बहरतच चालली आहे.

या महत्त्वाच्या दिवशी मुंबई इंडियन्सने आपल्या टीमसाठी बूमने जे काही केले आहे त्या सर्वांसाठी त्याचा गौरव करायचे ठरवले. आज एक तप उलटत असताना त्याचा उत्साह तसाच कायम आहे जसा पहिल्या दिवशी होता.

सगळ्यात पहिल्यांदा आपला ख्रिस मार्टिन भाऊ आहे ना. त्याच्या स्टाइलमध्ये... पण त्याला बंबय्या टच हवाच ना! 😉

🎶

Jasprit… Our beautiful brother,

The best bowler in the whole of cricket,

We 𝘢𝘣𝘴𝘰𝘭𝘶𝘵𝘦𝘭𝘺 𝘦𝘯𝘫𝘰𝘺 watching you destroy 𝘰𝘱𝘱𝘰𝘯𝘦𝘯𝘵𝘴,

With wicket after wicket after wicket!!!

🎶

**********

आमचा लाडका राष्ट्रीय खजिना,

तु २०१३ कॅम्पेनच्या सुरूवातीला आपल्या वानखेडेवर कशी दमदार पावलं टाकत आलास ते आम्हाला अजूनही लक्षात आहे. एक उगवता स्टार ज्याच्या गोलंदाजीत जग जिंकण्याची शक्ती होती. ती आजही कायम आहे.

तू मुंबई इंडियन्ससाठी पहिला सामना खेळलास तेव्हा फक्त १९ वर्षांचा किशोर होतास. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध एक झणझणीत सामना आणि तू पहिल्याच सामन्यात विराट कोहलीला बाद केलेस.

अगदी त्या क्षणापासून तू आमच्या काळजाचा तुकडा बनलास. हा हिरा दिवसेंदिवस चमकणार हे आम्हाला माहीत होते. आपल्या मार्गात येणाऱ्या फलंदाजांना तू पाणी चाखवणार याची चुणूक तेव्हाच दिसली होती. 🔥

त्या सीझनमध्ये अनेक गोष्टी प्रथमच घडल्या. आपण पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकलो. आता आपण त्याकडे वळून बघतोय तेव्हा अत्यंत उत्साहाने, आनंदाने ओथंबणारा तू... जसा पावसाळ्यात किनाऱ्यावरून रस्त्यावर झेप घेणारा मरीन ड्राइव्हचा अरबी समुद्रच...

२०१५ मध्ये आणखी एक यशस्वी स्पर्धा पार पाडल्यानंतर तू स्वतःचा एक नवीनच अवतार दाखवलास. क्रिकेट टीम्स त्याला तयार नव्हत्या हे तर दिसतच होतं.

आयपीएल २०१६ मध्ये तू प्रथमच एकाच स्पर्धेत १०+ विकेट्स घेतल्यास आणि तेव्हापासून अक्षरशः फटकेबाजी सुरू आहे. जसप्रीत बुमरा या क्रिकेट जगताचा राजा झालाय आणि आम्ही त्याच्या राज्यात खूप आनंदी आहोत.

मग आले २०२०-२१. आपण तोपर्यंत ४ ट्रॉफी नावावर केल्या होत्या. मग ट्रेंट बोल्टसोबत तू भागीदारी करून जलदगती गोलंदाजीचा दर्जा खूप उंचावला. आपल्या फेमस फाइव्हसोबत तुम्ही १५ इनिंगमध्ये तब्बल ५२ विकेट्स घेतल्यात. जबरदस्त हवा केली होती तुम्ही!

मग २०२३ मध्ये तू दुखापतग्रस्त झालास. पण २०२४ मध्ये सगळी कसर भरून काढलीस तू. अत्यंत आव्हानात्मक सीझनमध्ये तू १३ सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्यास. तणाव, थकवा हे शब्द त्याच्या डिक्शनरीत नाहीतच की काय असे वाटू लागले!!! 💪

थोडक्यात सांगायचे तर शून्यातून तुझा सुरू झालेला हा प्रवास आता राष्ट्रीय खजिना होण्यापर्यंत आला आहे. तू सर्वांना प्रेरणा देत प्रगतीची उंच उंच शिखरे गाठू लागला आहेस. आता दर दिवशी तुझा खेळ आणखी बहरत जावो आणि आम्हाला तुझ्या नवनवीन विक्रमांचा आनंद मिळो, याच तुला शुभेच्छा.

 

तुमच्या,

MI Family