News

INDvENG, चौथा टी२०आय: एचपी दुबेच्या तोडफोडीमुळे मालिका भारताच्या खिशात

By Mumbai Indians

पाच सामन्यांच्या मालिकेत ३ विजय म्हणजे ट्रॉफी नक्की! 🏆

इंग्लंडचा कर्णधार जो बटलर टॉसबद्दल या वेळी लकी ठरला. त्याने अख्ख्या मालिकेत प्रथम टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय फलंदाजांना सुरूवातीलाच धक्का बसला. साकीब महमूदच्या उत्तम गोलंदाजीमुळे आपला संघ १२/३ ने पिछाडीवर होता. परंतु हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आपल्याला १८१/९ धावा करता आल्या.

दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांनी अप्रतिम खेळ करून सामना १५ धावांनी जिंकून दिला. चला तर मग मॅचचा रिपोर्ट पाहूया.

सुरूवातीलाच मोठा झटका बसला...

इंग्लिश जलदगती गोलंदाज साकीब महमूदने दुसऱ्याच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेतला आणि आपल्याला झटका दिला. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यावर इनिंग पुन्हा ट्रॅकवर आणण्याची जबाबदारी आली.

या दोघांनी दबावाला अजिबात बळी न पडता दणादण फटकेबाजी सुरू केली. त्यांनी सहा ओव्हर्समध्ये आपल्याला ४७/३ पर्यंत पोहोचवले.

परंतु, अभिषेक शर्मा पॉवर प्लेनंतर १९ चेंडूंमध्ये २९ धावा करून बाद झाला. जेकब बेथलने आदिल राशीदच्या चेंडूवर त्याला बाद केले.

दुबे, एचपी यांची अर्धशतके!

दोन ओव्हर्सनंतर रिंकू सिंगला ब्रायडन कार्सने बाद केले. या डावखुऱ्या फलंदाजाने अत्यंत कठीण परिस्थितीत ३० धावा नोंदवल्या.

त्यानंतर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी परिस्थिती हातात घेऊन ८७ धावांची भागीदारी केली आणि पाहुण्या संघावर दबाव आणला.

१६ व्या ओव्हरपासून आपल्या एचपीने अक्षरशः बेफाम फलंदाजी करत एकामागून एक सीमारेषांपलीकडे चेंडू टोलवला. हे एक दोन शॉट्स तर त्याच्या अर्धशतकादरम्यान त्याने काय धुमाकूळ घातला असेल याचे प्रतीक आहेत.

दरम्यान शिवम दुबेने मालिकेतल्या पहिल्या सामन्यात खेळताना या संधीचे सोने केले. त्याने १५.८८ च्या स्ट्राइक रेटने ५३ धावा ठोकताना सात चौकार आणि दोन षटकार मारले. शिवम भावा तू कमाल आहेस रे! 🙌

या सुंदर कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीमला बोर्डवर १८१/९ धावांची नोंद करता आली. जबरदस्त कमबॅक होता तो!

बिष्णोई, अक्षर यांनी पुन्हा कमाल दाखवली!

इंग्लंडचा संघ प्रति ओव्हर १० धावा दणकावत असताना रवी बिष्णोईने बेन डकेटची महत्त्वाची विकेट पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर घेऊन दणका दिला.

फिल सॉल्ट आणि जो बटलर यांनी आपल्या टीममेट्सची साथ दिली आणि अक्षर व बिष्णोई यांना बळी पडून एकामागून एक ओव्हरमध्ये बाद झाले.

मधल्या टप्प्यापर्यंत ब्रिटिशांचा संघ ८६/३ वर होता.

पहिल्याच सामन्यात हर्षित राणाची कमाल. स्पिनर्सची चमकदार कामगिरी!

शिवम दुबेला बदली म्हणून आलेल्या हर्षित भाऊने फक्त दोन चेंडूंमध्येच आपण काय चीज आहोत हे दाखवून दिले. त्याने लियाम लिव्हिंग्स्टनला १२ व्या ओव्हरमध्ये घरी पाठवले.

त्यानंतर मालिकेचा आघाडीचा विकेट टेकर वरूण चक्रवर्ती आपल्या फॉर्ममध्ये कायम राहिला. त्याने हॅरी ब्रूक आणि ब्रायडन कार्स यांना पॅव्हिलियनला पाठवले. ब्रूक तर इतका घातक होता की तो एकटाच इंग्लंडसाठी मालिका घेऊन जाऊ शकत होता.

शेवटी, पहिलाच सामना खेळणाऱ्या जलदगती गोलंदाजाने आणखी दोन विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाने एक सामना शिल्लक असताना संपूर्ण मालिकाच नावावर केली.

पलटन, सुपर संडेसाठी सज्ज राहा कारण २ फेब्रुवारी रोजी मालिकेचा फिनाले आमच्या वानखेडेवर होणार आहे. वीकेंडला कुठेही जाऊ नका🤩

 

थोडक्यात धावसंख्या: भारत १८१/९ (हार्दिक पांड्या ५३, शिवम दुबे ५३, साकीब महमूद ३/३५) कडून इंग्लंडचा १५ धावांनी पराभव इंग्लंड १६६/१० (हॅरी ब्रूक ५१, रवी बिष्णोई ३/२८, हर्षित राणा ३/३३).