News

बेवन जॉन जेकब्स: तोडफोडीचे दुसरे नाव!

By Mumbai Indians

आला आणि फोडायला सुरूवात केली याला काही नाव असेल तर बेवन जेकब्स हे अचूक नाव आहे!

बेवनला आपण “मॅन ऑफ डेब्यूज” म्हणू शकतो. तो आपल्या पहिल्याच सामन्यात लक्ष वेधून घेतो. आयपीएल २०२५ च्या अपेक्षेपासून सुरूवात करूया का!? 😉

कडक सुरूवात!

या मधल्या फळीतल्या फलंदाजाने २०२३-२४ च्या सुपर स्मॅश सामन्यात ऑकलंडविरुद्धच्या सामन्यात कॅन्टरबरीसाठी पदार्पण करताना २० चेंडूत ४२ धावा केल्या. त्या हंगामात त्याने सहा सामन्यांमध्ये १८८.७३ च्या स्ट्राइक रेटने १३४ धावा केल्या.

आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी म्हणजे नोव्हेंबर २०२४ मध्ये या २२ वर्षीय खेळाडूने प्लंकेट शील्डमध्ये ऑकलंडकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याने दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके (७५ आणि ७९) नोंदवली आणि आपल्या संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. 💥

टी२० शतक हवे आहे का? आहे ना.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड टी२० मॅक्सच्या २०२३-२४ मधल्या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बेव्हॉन जेकब्सने साऊथ ब्रिस्बेनकडून टूम्बलविरुद्ध ४० चेंडूत १०० धावा केल्या.

पहिला आंतरराष्ट्रीय कॉल, #AalaRe!

खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात खेळण्यासाठी बेव्हॉन-जॉन जेकब्सला कॉल येणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.

न्यूझीलंड इलेव्हन विरूद्ध श्रीलंका या सराव सामन्यात १६ चेंडूत ३९ धावा केल्याने बेव्हॉनला श्रीलंका टी२० मालिकेसाठी संघात स्थान मिळाले...⬇️

या उगवत्या ताऱ्याचे मनापासून कौतुक!

न्यूझीलंडचे निवडकर्ता सॅम वेल्स यांनी बेव्हॉन जेकब्सला प्रथमच संघात स्थान मिळाल्याबद्दल त्याचे कौतुक केले.👏

“तो एक प्रॉमिसिंग खेळाडू आहे. त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे आणि आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहोत.”

“त्याच्याकडे फलंदाजीत खूप ताकद आहे हे स्पष्ट आहे, पण त्याने दीर्घ स्वरूपातही आपल्याकडे चांगले तंत्र आणि संयम असल्याचे दाखवले आहे,” वेल्स म्हणाले.

न्यू इयर म्हणजे जबरदस्त कॉन्फिडन्स!

आतापर्यंतचे हे वर्ष या तरूण खेळाडूसाठी खूप चांगले ठरले आहे. तो सातत्याने धावा करतोय. आपल्यालाही हेच हवे आहे ना?!

मि. जेकब्सने सुपर स्मॅश २०२४-२५ मध्ये ऑकलंड एसेससाठी आघाडीचा फलंदाज म्हणून (आठ सामन्यांमध्ये २६३ धावा) स्थान मिळवले.

आगामी सीझनसाठी एमआय कॅम्पमध्ये प्रवेश करणार असतानाच, २०२४-२५ च्या प्लंकेट शील्डमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स विरुद्ध ऑकलंडसाठी १५७ धावांची धमाकेदार खेळी करून त्याने आपला इरादा स्पष्ट केला. #OneFamily मध्ये येण्याचा आनंद खेळाडूसाठी काय करू शकतो हे कळले ना 😎

आमच्या अपेक्षा? फक्त तोडफोड!!!

स्वाभाविकच, जेव्हा एखादा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असताना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी येतो तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा आकाशाला भिडलेल्या असतात.

पण आम्ही मुंबई इंडियन्स आहोत. खेळाडूंना स्वतःला मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी देणे हाच आमचा मंत्र आहे आणि बेव्हॉन काही वेगळा नाहीये. <तो दणदणत येणार याची खात्रीच आहे!>

बेव्हॉन भावा, आम्ही उत्सुक आहोत! राडा आणि धिंगाणा करायला तयार आहेस ना!!! 👊