News

बुमरागमन! (बूम, बूमचे पुनरामगन!)

By Mumbai Indians

या हू!!!! २०२३ या नववर्षाची सुरूवात यापेक्षा चांगल्या बातमीने होऊ शकली नसती.

स्टंप्सच्या चिथड्या उडवणारे यॉर्कर्स पाहून जवळपास चार महिने उलटलेत. त्याची ती गोलंदाजी करण्यापूर्वीची धाव. तो उत्साह. तो दमदारपणा, उंचावलेला सरळ हात. त्याचा तो कोपरातून मागे जाणारा हात, एक वेगळाच कोन आणि १४५ किलोमीटर वेगाने येणारा चेंडू. गरीब बिचाऱ्या फलंदाजांना तर काय करू आणि काय नको असे व्हायचे. खरंच, आम्हाला त्याची फार आठवण आली.

आपला लाडका बूम, जसप्रीत बुमरा श्रीलंकेविरूद्ध भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघात खेळणार आहे. बूमच्या पाठीत तणावामुळे फ्रॅक्चर झाले होते. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या टी२० मालिकेदरम्यान आणि टी२० वर्ल्डकपपूर्वी त्याची पाठ दुखावली. त्यानंतर त्याच्यावर उपचार झाले आणि त्याने बराचसा काळ एनसीएमध्ये घालवला. उपचार, बरे होणे, ताकद वाढवणे, धावणे, गोलंदाजी आणि सामन्यासाठी फिट होणे या सगळ्यासाठी तब्बल चार महिने गेलेत.

पण आता तो परतलाय. आणखी मजबूत, शक्तिशाली, विकेट्ससाठी आतूर... ** बूम, बूम, बुमरा.... ** हाच जयघोष ऐकायला स्टेडियमसुद्धा आतूर आहे.

भारताचा नवीन ओडीआय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, के एल राहुल (विकेट कीपर), ईशान किशन (विकेट कीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्झर पटेल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.