
गोलंदाजांनी रचला पाया, तिलक आणि हृतिकने रचला विजयी कळस
डॅनियल सॅम्सकडून सुरूवातीलाच घेतलेली विकेट, आमच्या गोलंदाजांकडून घेतल्या गेलेल्या सातत्यपूर्ण विकेट्स आणि तिलक वर्मा आणि हृतिक शौकीन यांच्याकडून उत्तम खेळ यामुळे आम्हाला सीएसकेविरूद्ध वानखेडे स्टेडियमवर पहिला विजय प्राप्त करणे शक्य झाले.
रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा अत्यंत योग्य निर्णय घेतला. ट्रिस्टन स्टब्सने पोलार्डच्या जागी आपला पहिला सामना खेळला आणि हृतिक शौकीन एम. अश्विनच्या जागेवर खेळायला आला.
डॅन सॅम्सने नवीन बॉल घेतला आणि आम्हाला एक चांगली सुरूवात करून दिली. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये स्विंगद्वारे डेव्हन कॉन्वेची विकेट घेतली आणि बाऊन्सर टाकून मोईन अलीला बाद केले.
त्यानंतर बूमने रॉबिन उत्थप्पाला एलबीडब्ल्यूवर बाद करण्यापूर्वी जेरीला आणले. सॅम्स आणि रायली मेरेडिथ यांनी त्यानंतर अनुक्रमे ऋतुराज गायकवाड आणि अंबाटी रायादू यांना बाद करून पॉवर प्लेमध्ये सीएसकेला २९/५ वर आणले.
मेरेडिथने त्यानंतर एक जोरदार बाऊन्सर टाकून शिवम दुबेला बाद केले. ईशान किशनने स्टंपच्या मागे जबरदस्त उडी मारून ही कॅच घेतली.
त्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी आणि डीजे ब्रावो यांनी इनिंग्स पुन्हा सावरण्यासाठी ३९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कार्तिकेयने फुलटॉस टाकून ब्रावोला बाद करताना तिलक वर्माने शॉर्ट कव्हरवर हा चेंडू कॅच केला.
कार्तिकेयने याच ओव्हरमध्ये सिमरजीत सिंगलाही एलबीडब्ल्यू केले आणि त्यानंतर रमणदीप सिंगने महीश ठीक्शना याला बाद करून आपली पहिली विकेट घेतली.
त्यानंतर ईशानने मुकेश चौधरीला एमएस धोनीने एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला असताना डायरेक्ट हिट करून बाद केले. त्यामुळे सीएसकेची इनिंग ९७ वर संपली.
पाठलाग करताना ईशान किशनने चेंडू सीमापार टोलवून सुरूवात केली. पण पहिल्याच ओव्हरमध्ये मुकेश चौधरीने त्याला बाद केले. त्यानंतर आम्ही डॅन सॅम्सला तिसऱ्या क्रमांकावर स्विंग्सचा सामना करण्यासाठी पाठवले.
कर्णधार रोने अत्यंत आक्रमक खेळ करण्याचा निर्णय घेतला. त्याने तीनवेळा चेंडू सीमापार नेला. सिमरजीतसिंग आणि मुकेश चौधरी यांच्या गोलंदाजीवर ऑफसाइड आणि स्ट्रेट बॅक डाऊनवर चौकार मारण्यात आला.
परंतु सिमरजीतने रोला बाद केले आणि मुकेशने एकाच ओव्हरमध्ये दोघांच्या म्हणजे डॅन सॅम्स आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या ट्रिस्टन स्टब्सला बाद केले.
तरूण खेळाडू हृतिक शौकीला त्यानंतर तिलक वर्माला साथ देण्यासाठी वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले. या दोघांनी कोणताही धोका न पत्करता इनिंग पुन्हा बांधून एक चांगली भागीदारी करण्यावर भर दिला.
विशेषतः तिलक टोलवण्यासाठी खराब चेंडूंच्या प्रतीक्षेत होता. त्याने हृतिकसोबत ४८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर हृतिकला मोईन अलीच्या चेंडूवर एक मोठा फटका मारताना १८ धावांवर पॅव्हिलियनला परतावे लागले.
परंतु आम्हाला त्या टप्प्यावर फक्त १७ धावांची गरज होती आणि आमच्या बिग मॅन टिम डेव्हडने हा खेळ दोन जोरदार सिक्स मारून संपवला.
सुरूवातीलाच धक्का बसल्यानंतरही टीमने आपला संयम सोडला नाही त्याबद्दल कर्णधार हिटमॅनने खूप कौतुक केले आणणि त्याने तिलकबद्दल गौरवोद्गारही काढले.
“या वेळी थोडे तणावपूर्ण क्षण होते. पण आम्ही संयम ठेवून चांगला खेळ केला ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तिलकने सुंदर कामगिरी केली आहे. आपल्या पहिल्याच सीझनमध्ये इतका शांत डोक्याने खेळ करणे सोपे नाही. त्याच्याकडे तंत्र आहे आणि बुद्धिमत्ता आहे, चांगली कामगिरी करून सामना संपवण्याची ऊर्जाही आहे. तो अगदी योग्य मार्गावर आहे. त्याला फक्त प्रयत्न करत राहायला हवेत,” त्याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जलदगती गोलंदाजांकडून सुरूवातीच्या टप्प्यात केलेल्या तूफान गोलंदाजीबद्दल रो म्हणाला की, पिचचे ज्ञान असल्यामुळे त्यांना फायदा झाला.
“आम्ही इथे खूप क्रिकेट खेळलो आहोत. त्यामुळे आम्हाला अशा पिचेसचा अनुभव आहे. गोलंदाजांना उत्तम खेळ करण्याची संधी मिळणे ही चांगली गोष्ट होती. इथे बाऊन्स आणि स्विंग्स बघतानाही मजा आली. बूमला आपल्याला काय करायचे आहे आणि टीमची त्याच्याकडून काय अपेक्षा आहे हे नीट माहीत आहे. तो हे समजून घेतो आणणि त्याने आज खूपच अप्रतिम गोलंदाजी केली आहे,” तो म्हणाला.
आज खेळाडूंमध्ये केलेल्या बदलांबद्दल बोलताना कर्णधाराने सांगितले की काही नवीन चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे होते म्हणजे विशिष्ट परिस्थितीत ते कशी कामगिरी करतात हे कळू शकेल.
“आम्हाला सामने जिंकायचे आहेत पण काही खेळाडू विशिष्ट जबाबदाऱ्यांवरही पाहायचे आहेत आणि ते ती कामगिरी करू शकतात का हे पाहणेही गरजेचे आहे. त्यामुळे पुढच्या सीझनमध्ये आम्हाला चांगली टीम तयार करता येईल,” तो शेवटी म्हणाला.
टीमची एक अचूक कामगिरी आणि प्रत्येकाने दिलेले काम योग्य प्रकारे पार पाडल्यामुळे आम्हाला वानखेडेवर परतल्यावर अप्रतिम विजय मिळाला आहे आणि आणखी अशा खेळांसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत!