News

"बुमरा सर्व स्वरूपांमधला जगातला सर्वोत्तम जलदगती गोलंदाज आहे,": गौतम गंभीर

By Mumbai Indians

जसप्रीत बुमरा, महान खेळाडू, एक महान गोलंदाज, दि गोट!

ओडीआय विश्वचषक २०२३ आणि टी२० विश्वचषक २०२४ मध्ये उत्तम गोलंदाजी करून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडल्यानंतर बूम बूम विद्यमान २०२३-२५ चक्रात सलग तिसऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात पात्रतेसाठीच्या प्रयत्नात भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करण्यासाठी परतला आहे. त्याच्या या कामगिरीला डोळे भरून पाहण्यासाठी चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. 

या जादूगाराने दोन्ही विश्वचषक सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि अविश्वसनीय आकडेवारी पूर्ण केली. ११ सामन्यांमध्ये ४.०६ च्या सरासरीने २० विकेट्स ही त्याची ओडीआय वर्ल्ड कप २०२३ मधली कामगिरी होती. त्याचबरोबर ४.१७ च्या सरासरीने त्याने १५ विकेट्स घेतल्या. बूम बूमला प्रतिस्पर्धी खेळाडू का घाबरतात हे त्याचे उत्तर आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये आपल्या स्टार गोलंदाजासमोर कोणीही टिकू शकले नाही. 

कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज म्हणून स्थान मिळालेल्या बूम बूमची सर्वांत दीर्घ स्वरूपातली आकडेवारी तितकीच घातक आहे. त्याने प्रति विकेट ४५.१ या प्रभावी स्ट्राइक रेटने १५९ विकेट्स घेतल्या आहेत. स्पिनर्सची चलती असलेल्या इंग्लंडसारख्या उपखंडातही बूम बूमने स्वतःचा वेग, गोलंदाजीतील बदल आणि रिव्हर्स स्विंगसोबत स्वतःचे स्थान निश्चित केले.

रोला जेव्हा जेव्हा विकेटची गरज होती तेव्हा बूम बूम टीमच्या सेवेत उपस्थित होता. सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियाच्या जलदगती नेतृत्वाबद्दल कौतुकाने बोलतो ते उगाच नाही.

“जसप्रीत बुमरा हा सर्व स्वरूपांमधला जगातला सर्वोत्तम जलदगती गोलंदाज आहे. बुमरा ड्रेसिंग रूममध्ये असणे ही एक चांगली गोष्ट आहे. तो कोणत्याही टप्प्यावर खेळ पालटू शकतो," असे मत गंभीरने बुधवारी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. (१८ सप्टेंबर).

"भारतात सध्या फलंदाजीचे प्रचंड वेड आहे. परंतु बुमरा, अश्विन आणि जडेजा ही परिस्थिती बदलत आहेत. बुमरा कसोटी मालिकेत स्मार्ट आहे. हे सगळे मिळून ट्रेंड्स बदलतायत ही खूप आनंदाची बाब आहे.”

अगदी बरोबर. एक मोठा क्रिकेट सीझन येतोय आणि आम्ही स्टंप्स डावीकडे, उजवीकडे आणि सर्व ठिकाणी उडून पडताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत.