News

INDvBAN कसोटी पूर्वावलोकन: रो-को- बूमचे पुनरागमन, आणि पांढरा गणवेश!

By Mumbai Indians

प्रतीक्षा संपली आहे! हिटमॅन आणि बूम बूम बार्बाडोसमध्ये ऐतिहासिक टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर परत एकत्र आलेत. पण या वेळी ते पांढरा गणवेश घालणार आहेत. भारतीय संघ घरच्या खेळपट्टीवर कसोटीमध्ये आपली घोडदौड कायम ठेवायला सज्ज आहे. या वर्षी इंग्लंडविरूद्ध ४-१ ने वर्चस्व गाजवल्यानंतर जिथे थांबले होते तिथूनच ते सुरूवात करणार आहेत.

कसोटी क्रिकेटचा सीझन सुरू होतोय. विराट कोहली, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे तिघेही क्रिकेटच्या सर्वांत मोठ्या स्वरूपात एकत्र आले आहेत. गौतम गंभीरदेखील गुरू म्हणून पहिलाच सामन्यात सहभागी होईल. विश्व कसोटी अजिंक्यपद २०२३-२५ च्या अंतिम फेरीतील जागा प्रतीक्षेत असल्यामुळे यापेक्षा चांगली सुरूवात असूच शकत नाही.

कर्णधार रोचा स्वॅग कायम तर आहेच पण बूम बूम आपल्या घोटा फोडणाऱ्या गोलंदाजीसह सज्ज झालाय. पलटन, १९ सप्टेंबर रोजी चेन्नईतल्या चिन्नास्वामी स्टेडियवर बांग्लादेशविरूद्ध दोन कसोटी सामन्यांपैकी पहिल्या सामन्याची एक्शन सुरू होतेय. तयार व्हा.

बांग्लादेशचा संघ पाकिस्तामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिकेतील २-० च्या  विजयाच्या वारूवर स्वार होऊन परतलाय. आपला शेजारी संघाचा आत्मविश्वास सध्या प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे भारताविरूद्ध कसोटी मालिकेत आपले खाते उघडण्यासाठी ते उत्सुक असतील. एकूणात सांगायचे तर या वेळी आपल्याला अत्यंत धमाल सामना पाहायला मिळेल.

काय: भारत विरूद्ध बांग्लादेश दोन कसोटी मालिका

कधी: पहिली कसोटी: १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, दुसरी कसोटीः २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर.

कुठे: पहिली कसोटी: एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, दुसरी कसोटीः ग्रीन पार्क, कानपूर

काय अपेक्षा आहे: टीम इंडिया घरच्या खेळपट्टीवर आणि कसोटीमध्ये आपल्या शेजाऱ्यांविरूद्ध नाबाद कामगिरी तसंच आपला प्रभावी खेळ कायम सुरू ठेवेल. रोहित आणि गंभीर यांची एक नजर विद्यमान डब्ल्यूटीसी २०२३-२५ मध्ये गुणतक्त्यावर असेल. ही मालिका जिंकल्याने त्यांचे स्थान मजबूत होईल आणि अंतिम सामन्यात सलग तिसरे स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल.

"आपण देशासाठी खेळतो तेव्हा प्रत्येक खेळ हा महत्त्वाचा असतो. कारण त्यात अनेक गोष्टी पणाला लागलेल्या असतात. डब्ल्यूटीसी टेबल अजूनही खुले आहे आणि आपल्याला प्रत्येक सामना जिंकायचाच आहे. चेन्नईमध्ये १२ सप्टेंबरपासून लावण्यात आलेला कॅम्प आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आम्हाला कसोटी मालिकेपूर्वी इथे थोडी तयारी करता आली. त्यामुळे तयारी आणि सज्जता यांच्याबाबत आम्ही या सामन्यासाठी बऱ्यापैकी तयार आहोत असे मला वाटते,” – कॅप्टन रो ने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भारत विरूद्ध बांग्लादेश- आकडेवारी

कसोटीमध्ये एकास एक आकडेवारी

भारत

संघ

बांग्लादेश

13

सामने

13

11

जिंकले

0

0

हरले

11

2

अनिर्णित

2

0

बरोबरीत

0

 

भारत

संघ

बांग्लादेश

सचिन तेंडुलकर - 820 धावा

सर्वाधिक धावा

मुश्फिकुर रहीम- 604 धावा

झहीर खान - 31 विकेट्स

सर्वाधिक विकेट्स

शाकीब अल हसन- 21 विकेट्स

पहिल्या कसोटीसाठी संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेट कीपर), ध्रुव जुरेल (विकेट कीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, यश दयाल

बांग्लादेश: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शदमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुश्तफिकुर रहीम (विकेट कीपर), शाकीब अल हसन, लिट्टन दास, मेहदी हसन मिराज, झारक अली, तास्किन अहमद, हसन महमूद, नाहीद राणा, तैजुल इस्लाम, महमदुल हसन जॉय, नईम हसन, खालीद अहमद.