News

तुमच्या आयपीएल हिरोजना फॉलो करा: चिरतरूण पोलार्ड ते ८ विकेट्स घेणाऱ्या कंबोजपर्यंत

By Mumbai Indians

मुंबॉईजनी पलटनचे मैदानावरील अप्रतिम कामगिरीद्वारे मनोरंजन केले. त्यामुळे हा आठवडा आपल्यासाठी अविस्मरणीय ठरला. सीपीएल २०२४ मध्ये एका ओव्हरमध्ये चार षटकार मारणाऱ्या पॉली तात्यांपासून ते दुलीप ट्रॉफीमध्ये अंशुल कंबोजच्या आठ विकेट्सच्या कामगिरीपर्यंत. ब्लू अँड गोल्डमध्ये आपल्या बॉइजचे हे बॉक्स ऑफिस हिट होते. चला पाहूया...

सदाहरित पोलार्ड शो

आपण कायरन पोलार्डला एमआयसाठी अनेक सामने एकहाती जिंकताना पाहिले आहेत आणि तो अजूनही हे करतो आहे. त्याने वय फक्त संख्या असल्याचे सिद्ध केले आहे. एमएलसीमध्ये त्याने केलेली लूट आणि शतक यातून पॉलीने आपण हार मानत नसल्याचे सिद्ध केले आहे. तो आपल्या टीमसाठी सामने जिंकायला सज्ज आहे.

त्याने त्रिंबागो नाइट रायडर्ससाठी १९ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. त्यात पेनल्टीटाइम ओव्हरमध्ये चार सणसणीत षटकारांचाही समावेश होता. त्यामुळे त्याच्या संघाला सेंट लुसिया किंग्सविरूद्ध चार विकेट्सनी विजय मिळवता आला. तो नुसता पोलार्ड नाही तर विंटेज पोलार्ड आहे!

**********

ई-शानदार कमबॅक

अनंतपूरमध्ये ईशानने जबरदस्त कामगिरी केली (१२६ चेंडूंमध्ये १११ धावा.) त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया सी टीमला इंडिया बी टीमविरूद्ध एक मजबूत धावसंख्या उभारून दिली. दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात खेळता आले नाही. पण आपल्या पॉकेट डायनॅमोने गोलंदाजांचा हल्ला परतवून लावत १४ चौकार आणि तीन षटकारांची लयलूट केली.

मागच्या महिन्यात बुची बाबू स्पर्धेत झारखंडसाठी शतक पूर्ण केल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या आपल्या या लाडक्या खेळाडूला व्हाइट बॉल असो वा रेड बॉल, त्याचा काहीही फरक पडत नाही.

**********

शम्स जबरदस्तमुलाणी

ईशान गोलंदाजांचा हल्ला परतवत होता त्याच दिवशी शम्स मुलाणी अनंतपूरमधल्या एका मैदानात वेगळ्या पद्धतीने स्वतःची जागा बनवत होता. शम्सने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी इंडिया एच्या इनिंगला इंडिया डीविरूद्ध टिकवून ठेवताना मुंबईकर स्टाइल दाखवली.

त्याने इंडिया डीच्या गोलंदाजांना अत्यंत संयमी खेळी करून दणकवून टाकले (१८७ चेंडूंमध्ये ८९ धावा) आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारून दिली. त्याने खेळताना सावधगिरी आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ घातला. बॅटिंगचा मास्टरक्लास देताना त्याने आठ चौकार आणि तीन षटकार मारले.

शेवटच्या इनिंगमध्ये अप्रतिम गोलंदाजीमुळे (३/११७) त्याला अष्टपैलू खेळासाठी सामनापटूचा पुरस्कार देण्यात आला.

**********

तिलकच्या स्टाइलमध्ये नवीन सीझनची सुरूवात

तिलक वर्माने यंदाच्या दुलीप ट्रॉफीमध्ये अगदी स्टाइलमध्ये आपल्या आगमनाची घोषणा केली. इंडिया डी विरूद्ध पहिली इनिंग तो खेळू शकला नाही. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये अत्यंत संयमी, फटक्यांनी परिपूर्ण नाबाद शतक त्याने केले. त्याची धावसंख्या (१११ नाबाद धावा १९३ चेंडू) सर्वोत्तम दर्जाची होती आणि त्यामुळे इंडिया डीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

त्याच्या इनिंगमध्ये नऊ चौकार समाविष्ट होते. त्यामुळे तिलक फक्त जोरात फटकेबाजी करत नाही तर संयमीही खेळतो हे सिद्ध झाले. त्याने खेळाची गरज समजून घेतली आणि त्याला जबाबदारी घेण्याची आवश्यकता असलेल्या परिस्थितीत अत्यंत अचूकपणे खेळ केला.

**********

आठव्या आश्चर्याचा राजा अंशुल

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आपला पहिला पाच विकेट्सचा खेळ कसा करायचा हे त्याच्याकडून शिकावे. अंशुल कंबोज या वेळी दुसराच दुलीप ट्रॉफी सामना खेळत होता. त्याने खेळाच्या इतिहासातली सर्वोत्तम पाचवी गोलंदाजी करत एखाद्या अनुभवी गोलंदाजी केली (८/ ६९). पहिल्या इनिंगमध्ये ३८ धावाही केल्या आणि त्यामुळे त्याला सामनापटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

इंडिया बी टीम १२९/० मध्ये आरामदायी स्थितीत असताना आपल्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला १९४/५ वर आणून ठेवले. त्यांनी पाच विकेट्स घेतल्या इंडिया सी टीमला खेळात परत आणले. त्याच्या काही बळींमध्ये फॉर्ममधला फलंदाज एन. जगदीशन आणि मुशीर खान, भारतीय आंतरराष्ट्रीय सरफराज खान आणि रिंकू सिंग तसेच आयपीएलमधला उगवता स्टार नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश होता.

**********

बहुप्रतीक्षित होम सीझन सुरू होतोय

दरम्यान हिटमॅन आणि बूम बूम चेन्नईत आलेत आणि त्यांनी १९ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या भारत विरूद्ध बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. पलटनला आपली लाडकी जोडी टीम इंडियासाठी खेळताना पाहण्याची उत्सुकता आहे. या वेळी ते पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळणार आहेत. चला तर रेड बॉलमधली एक्शन पाहूया...