News

भारताचा यशस्वी होण्याचा प्रवास- सीटी२५ आणि इंग्लंड ओडीआय मालिकेच्या संघांची घोषणा!

By Mumbai Indians

पलटन, भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी संघाची घोषणा झाली आहे. तर सज्ज व्हा आणि आपल्या “इंडियाss… इंडियाss!” जल्लोषाची तयारी करा.

येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत विरूद्ध इंग्लंड ओडीआय मालिकेसाठी आपला हिटमॅन मेन इन ब्लूचा लीडर असेल तर शुभमन गिल उपकर्णधार असेल.

जवळपास आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधील लाहोर, रावळपिंडी आणि कराची या शहरांमध्ये होईल. परंतु, ग्रुप एचा भाग असलेला भारतीय पुरूषांचा क्रिकेट संघ संयुक्त अरब अमिरातीतल्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळेल.

रोहित आणि कंपनी २० फेब्रुवारी रोजी आपला पहिला सामना बांग्लादेशविरूद्ध खेळतीर. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी भारत विरूद्ध पाकिस्तानचा पारंपरिक लढा २३ फेब्रुवारी रोजी होईल. आयसीसी मेन्स ओडीआय वर्ल्ड कप २०२३ च्या उपांत्य सामन्याची पुनरावृत्ती- भारत विरूद्ध न्यूझीलंड हा सामनाही ग्रुप स्टेजमध्ये होईल.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वेळापत्रकाबद्दल अधिक येथे जाणून घेता येईल- here!

… या सर्वांची सुरूवात होण्यापूर्वी टीम इंडिया नागपूर, कटक आणि अहमदाबादमध्ये ६ फेब्रुवारीपासून माजी वर्ल्ड चॅम्पियन्स इंग्लंडचा सामना करतील.

रोहित, हार्दिक आणि संघातील इतर सदस्यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून ते आणखी एका आयसीसी ट्रॉफीसाठी लढण्यास सज्ज आहेत.

२०१३ मधली आठवण…

अर्थातच तुम्हाला २०१३ चे सामने आठवत असतीलच.

चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल ऐकल्यावर आपल्या मनात येणारी ही पहिली गोष्ट आहे. पांढऱ्या कोटांमध्ये हातात ट्रॉफी घेऊन आनंदाने नाचणारे आपले भारतीय स्टार्स. त्यांनी आपल्याला अनेक सुंदर आठवणींचा खजिना दिला आहे.

अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केल्यानंतर भारताने आपली दुसरी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. दुर्दैवाने आपल्याला २०१७ मध्ये या विजयाची पुनरावृत्ती करता आली नाही. परंतु टीम इंडियाने या वेळी तिसऱ्या ट्रॉफीसाठी खूप प्रयत्न केले.

त्यामुळे आता स्टेज तयार आहे. तुमचे कॅलेंडर्स मार्क करून ठेवा. सुट्टी घेऊन ठेवा. तुमच्या श्रद्धा कायम ठेवा आणि क्रिकेटच्या महोत्सवासाठी सज्ज व्हा.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि इंग्लंड ओडीआय मालिकेसाठी भारताचे संघ

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेट कीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (विकेट कीपर), रवींद्र जडेजा.

इंग्लंडविरूद्ध ओडीआय मालिकेसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेट कीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा*, हर्षित राणा, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (विकेट कीपर), रवींद्र जडेजा.