व्हीएचटी २०२४-२५ मध्ये एमआयः केएल श्रीजीतच्या मदतीने कर्नाटकला विजयाचा शिरपेच
जवळपास महिनाभराचे रोमांचक सामने आणि प्रेरणादायी परफॉर्मन्सनंतर विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मध्ये कर्नाटकचा विजय झाला.
यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला लढाऊ बाण्याचा विकेट कीपर फलंदाज केएल श्रीजीतने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्याने मुंबईविरूद्ध १५० नाबाद धावा करून सुरूवात केली. त्यानंतर अंतिम सामन्यात सामना जिंकून देणारे अर्धशतक फटकावले. पलटनला जाम आनंद झालाय.
हार्दिक पांड्या (बडोदा), दीपक चहर (राजस्थान), नमन धीर (पंजाब) आणि अश्विनी कुमार (पंजाब) यांनीही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. व्हीएचटी २०२४-२५ चा समारोप कसा झाला ते पाहूया.
अंतिम सामना| १८ जानेवारी
सुंदर खेळ आणि सुंदर विजय. केएल श्रीजीतने अंतिम सामन्यात दर्जेदार खेळ दाखवताना ७४ चेंडूंमध्ये ७८ धावा फटकावल्या. कर्नाटकने या सामन्यात ३४८ धावा केल्या. या भल्यामोठ्या धावसंख्येने करूण नायरच्या उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या विदर्भालाही दमवले. आपल्या श्रीजीतने ट्रॉफी हातात घेतली ना.
A 🔝 knock to win the Vijay Hazare Trophy 🏏💯
— Mumbai Indians (@mipaltan) January 18, 2025
Congratulations, KL Shrijith & Karnataka 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/hGF5rORVJM
उपांत्य सामना | १५ जानेवारी
केएल श्रीजीतला स्पर्धेतला आपला आधीचा फॉर्म टिकवणे शक्य झाले नाही. परंतु त्याच्या टीमने म्हणजे कर्नाटकने सेमी फायनल्समध्ये हरयाणावर विजय प्राप्त केला.
उपउपांत्य सामना | ११ आणि १२ जानेवारी- केएल श्रीजीतच्या कर्नाटकने उपांत्य फेरीत जागा मिळवली
कर्नाटकने बडोद्याविरूद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात आघाडी घेऊन सेमी फायनल्समध्ये जागा मिळवली. आपल्या खेळाडूंनी कर्नाटकच्या २८१ धावांमध्ये २८ कडक धावांचे योगदान दिले. या सामन्यात बडोद्याचा पाच धावांनी पराभव झाला.
दीपक चहरने विदर्भाविरूद्ध खेळताना दोन चौकार आणि तीन षट्कार मारत १४ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. राजस्थानची गोलंदाजी उत्तम होती. परंतु तरीही त्यांना करूण नायरच्या व्हीएचटी २०२४-२५ मधील अश्वमेधाला रोखण्यात अपयश आले.
त्याचवेळी नमन धीर आणि अश्वनी कुमारचा पंजाबचा संघ महाराष्ट्राविरूद्ध पराभूत झाला. पण आपल्या नमनने मात्र ४.१४ च्या सुंदर इकॉनॉमीने २/२९ अशा विकेट्स घेतल्या! 👏