आपलं घर, आपला अभिमान- सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, वानखेडे स्टेडियम
वानखेडे स्टेडियम- आपलं घर! आज आपण आपल्या घराचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करत आहोत. या घराने आपल्याला अविस्मरणीय क्षण दिले, आनंद, उत्साह, प्रेम, दुःख, यश सगळंच दिलं.
विश्वचषकातले मोठे क्षण, आ वासून बघायला लावणारे आयपीएल सामने, रोमांचक कसोटी सामने आणि ओडीआय व टी२० मध्ये धावांचा पाऊस. वानखेडेने सगळंच अनुभवलं आहे, सोबत आपणही.
चला मग पलटन, आपल्या घरातल्या काही अविस्मरणीय क्षणांना उजाळा देऊया!
१९७५| वानखेडे स्टेडियमवरचा पहिला सामना
१९७४ साली वानखेडे स्टेडियम बांधण्यात आलं. क्वीन्स नेकलेसच्या मध्यभागी बांधलेल्या आपल्या या घरात जानेवारी १९७५ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला. तो होता वेस्ट इंडिज विरूद्ध भारत कसोटी सामना
१९८५ | रवी शास्त्रीच्या ६ वर ६ शॉट्स
जानेवारी १९८५ मध्ये बडोद्याविरूद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या लाडक्या मुंबईकर रवी शास्त्रीने एकामागून एक सहा षटकार फटकावले. तोडफोड लेव्हल = 🔝
१९९६ | मास्टर ब्लास्टरची पहिल्या डे नाइट मॅचमध्ये आतषबाजी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा. त्याने १९९६ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप ग्रुप मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ८४ चेंडूंमध्ये ९० धावा फटकावल्या. वानखेडे स्टेडियमवरचा हा पहिला डे नाइट सामना होता. वॉर्नच्या चेंडूवर लावलेला हा फटका तर नुसता चुम्मा होता 💙
२००४ | भज्जीपाची फिरकी, ऑस्ट्रेलियाची गिरकी
ऑस्ट्रेलियाविरूद्ध १०६ धावांचा बचाव करताना हरभजन सिंगने पाच विकेट्स घेतल्या तर मुरली कार्तिकने तीन घेतल्या. भारताने हा रोमांचक कसोटी सामना जिंकताना रिकी पॉन्टिंग आणि कंपनीला ९३ धावांत गुंडाळले. घुमवून टाकलं की नाही!
२००७| मुंबईचा ‘रत्नजडित’ रणजी ट्रॉफी विजय
मुंबईने सौरव गांगुलीच्या बंगालला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात घरी पाठवलं. सचिन तेंडुलकच्या पहिल्या इनिंगमधल्या शंभर धावा, झहीर खानच्या पाच विकेट्स आणि रोहित शर्माच्या दुसऱ्या इनिंगमधल्या पन्नास धावांनी मुंबईला १३२ धावांनी विजय मिळवता आला.
२००७ | पराभवाच्या खाईतून विजयी!
भारतीय संघ होता ६४/६, ऑस्ट्रेलियाचे १९४ चे लक्ष्य. फारच कठीण!
रॉबिन उत्थप्पा, झहीर खान आणि मुरली कार्तिक आले आणि त्यांनी हवाच काढून टाकली. झॅक आणि कार्तिकच्या १० विकेटसाठीच्या नाबाद ५२ धावांच्या भागीदारीमुळे भारतासाठी हा ऐतिहासिक पाठलाग विजयी ठरला. आजही अंगावर काटा येतो!
२००८ | जयसूर्याचं सीएसकेविरूद्ध शतक
ही आठवण आहे आपल्या पहिल्या आयपीएल शतकवीराची... सनथ जयसूर्याची! त्याने अख्ख्या वानखेडेवर सीएसकेला पळवलं आणि झक्कासपैकी ११४*(४८) धावा केल्या. त्याने मारलेले ११ षटकार सीएसकेच्या वर्मावर लागले आणि आमच्या काळजात बसले.
२०११ |धोनीचा विश्वचषक विजयी षट्कार, शास्त्रीची कॉमेंट्री- नॉस्टेल्जिया जागा झाला!
एमएस धोनीने नुवान कुलशेखरच्या चेंडूवर षट्कार मारला. तो वानखेडे स्टेडियमवरचा सुवर्णाक्षरांनी कोरण्याचा क्षण ठरेल इतका सुंदर होता. भारताने २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला. तरूण खेळाडूंनी भावनिक होऊन सचिन तेंडुलकरला उचलून घेतले आणि अवघा देश डोळ्यांत अश्रू आणून हा क्षण साठवून घेत होता!
अजून काय सांगायला हवं का? 😉
२०१३ | मास्टर ब्लास्टरचा निरोप, हिटमॅन युगाची सुरूवात
सचिन तेंडुलकरने वानखेडेवर, म्हणजे आपल्या घरी २०० वा कसोटी सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निरोप घेतला. त्याने ३४३५७ धावा, १०० शतके आणि तरूणांना बालपणीसाठी असंख्य आठवणी दिल्या.
त्याचवेळी एक नवीन कसोटी युगाची सुरूवात झाली. आपला नवीन कसोटी स्टार रोहित शर्माने सलग दोन शतके फटकावून वेस्ट इंडिजविरूद्ध मालिकावीर हा किताब पटकावला.
२०१३ | जॉन्सन, ओझाचं सीएसकेला चांगलंच ओझं झालं
सीएसकेविरूद्ध बचाव करायला फक्त १३९ धावा हातात असतान मिशेल जॉन्सनने पाहुण्या संघाला दुसऱ्या ओव्हरमध्ये तीन विकेट्ससह चांगलंच सतावलं. नंतर प्रज्ञान ओझाने मधल्या ओव्हरला गुंडाळून टाकलं. आपण सीएसकेला १५.२ ओव्हर्समध्ये ७९ धावांवर बाद केलं. त्यांची ती सर्वांत कमी धावसंख्या होती!
२०१४ | कोरी आणि तारे यांनी ढगात लायटिंग केली!
आपल्याला आयपीएल २०१४ प्लेऑफ्समध्ये पात्र ठरण्यासाठी १४.३ ओव्हर्समध्ये १९० धावांची गरज होती. सुरूवातीला थोडा धक्का बसल्यानंतर कोरी अँडरसनने आपला सर्वोत्तम खेळ केला. त्याने ४४ चेंडूंत नाबाद ९५ धावा कुटल्या.
तरीही पात्र ठरण्यासाठी शेवटच्या चेंडूवर चौकार मारणं गरजेचं होतं. पहिल्याच चेंडूवर आदित्य तारेने जेम्स फॉकनरला डीप स्क्वेअर लेगवर षटकार मारून वानखेडेचं छप्पर खाली आणलं.
२०१६ | जो रूट्सने प्रोटीआजना दमवलं तेव्हा
दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लंड टी२० विश्वचषक २०१६ सामन्यात टी२०आयमधला तेव्हाचा सर्वाधिक स्कोअर करण्यात आला. हशीम आमला, जेपी दुमिने आणि क्विंटन डे कॉक यांनी अर्धशतके फटकावून प्रोटीआजना २२९ वर आणले. पण जो रूटने ८३ (४४) धावा करून जो जलवा दाखवला त्याने त्याची टीम सहजपणे विजयी झाली.
२०१९ | पॉलीचा सीएसकेविरूद्ध वन हँडचा फटका
सीएसकेपेक्षा एक पाऊल पुढे जायचं असतं तेव्हा आपला पॉली एका पायावर तयार असतो. पण या वेळी तो लाँग ऑफकडे मागच्या बाजूला पळत गेला आणि एकाच हाताने कॅच घेऊन सुरेश रैनाला बाद केलं. खालचा फोटो बघितला की कळेल आम्ही काय सांगतोय ते! 😉
२०२१ | एझाजची मुंबईत घरवापसी
न्यूझीलंडचा स्पिनर एझाज पटेल एकेकाळी मुंबईचा होता. त्याने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये १०/११९ विकेट्स घेऊन आपण मुंबईचंच पाणी आहोत हे दाखवून दिलं. अद्भुत!
अर्थात भारताने हा सामना ३७२ धावांनी जिंकला हे वेगळं सांगायला हवं का. 😜
२०२३ | श्रीलंकेविरूद्ध “व्हिक्टरी कोड: ३०२ धावा”
वानखेडेवर भारताने आणखी एक अविस्मरणीय क्रिकेट वर्ल्ड कप सामना श्रीलंकेविरूद्ध खेळला. शुभमन गिल (९२), विराट कोहली (८८) आणि श्रेयस अय्यर (८२) यांनी धमाकेदार फलंदाजी करून भारतीय संघाला ३५७ पर्यंत पोहोचवलं. त्यानंतर मोहम्मद शामीने पाच विकेट्स घेऊन शेजारी संघाला (सख्खे शेजारी बरं का) ५७ धावांवर बाद केलं.
थोडक्यात सांगायचं तर विजय आपलाच होता!
२०२३| मॅक्सवेल, २०१* आणि एक परफेक्ट सुटका अभियान
अफगाणिस्तानच्या आक्रमक खेळामुळे २०१ धावांचा पाठलाग बाकी असलेला ऑस्ट्रेलियन संघ ९१/७ वर थांबला होता. पॅट कमिन्स क्रीझवर लंगडणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलच्या मदतीला आला.
त्यानंतर जे काही घडले ते आपल्या लक्षात आहे? दणादण फटकेबाजी. मॅक्सवेलने २१ चौकार आणि १० षटकार मारून १२८ चेंडूंमध्ये २०१ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियन संघ थेट नॉकआऊट्समध्ये गेला. ही सर्वोत्तम एकदिवसीय खेळांपैकी एक खेळी मानली जाते.
२०२३ | उपांत्य फेरीतलं महत्त्वाचं यश
विराट कोहलीने ओडीआयमध्ये ५० वं शतक केलं. तेही सचिन तेंडुलकरच्या समोर. मोहम्मद शामीने केलेल्या जादूमुळे न्यूझीलंडचा संघ ७/५७ वर गेला. त्यामुळे आपल्याला न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवून २०२३ च्या क्रिकेट वर्ल्ड फायनलमध्ये जाता आलं. पलटन, आठवलं की नाही?
२०२४ | मुंबईचा रणजी ट्रॉफीतला ४२ वा विजय
मुंबईने आठ वर्षांच्या गॅपने रणजी ट्रॉफी जिंकताना शेवटच्या सामन्यात विदर्भाला १६९ धावांनी पराभूत केलं. मुंबईच्या पोरांनी ४२ व्या वेळी हा चषक जिंकला!
२०२४ | टी२० विश्वचषक जिंकण्याचा जल्लोष
वानखेडेवरची आपली अगदी ताजी, नवीन आणि अप्रतिम आठवण म्हणजे २०२४ टी२० विश्वचषक जिंकल्यानंतरची विजयी परेड. आपल्या रोहित शर्माने या यशाचा जल्लोष केला. सोबत संपूर्ण टीम होती आणि टीम इंडियाचे चाहतेही होते. आपण सगळेच त्या दिवशी आनंदाश्रूंनी न्हालो!