News

दुलीप ट्रॉफी थ्रोबॅकः तेंडुलकर विरूद्ध गांगुली, ते केपीच्या आक्रमकतेपर्यत आणि पिंक बॉल क्रिकेटपर्यंतचा इतिहास

By Mumbai Indians

देशांतर्गत क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात दुलीप ट्रॉफीला भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात खूप खास स्थान आहे. प्रादेशिक टीम्स आपल्या सर्व शक्तिनिशी लढतात आणि या प्रतिष्ठित ट्रॉफीसाठी प्रयत्न करतात. या स्पर्धांनी आपल्याला सर्वकालीन अविस्मरणीय सामन्यांचा आनंदही दिला आहे.

या वर्षी पारंपरिक प्रादेशिक स्पर्धे चार टीम्स खेळणार आहेत. या निमित्ताने दुलीप ट्रॉफीचे काही अविस्मरणीय क्षण आणि भूतकाळातील काही अविस्मरणीय आठवणी जपूया.

दुलीप ट्रॉफी १९९१: दोन किशोरवयीन खेळाडूंची लयलूट

या दोन्ही खेळाडूंचा हा दुलीप ट्रॉफीमधला पहिलाच सामना होता. त्यांनी नंतरच्या काळात भारतीय क्रिकेटसाठी अनेक अविस्मरणीय भागीदाऱ्या केल्या. बरोबर! सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली दुलीप ट्रॉफीच्या १९९१ साली वेस्ट झोन आणि ईस्ट झोन यांच्यादरम्यान गुवाहाटीत झालेल्या सामन्यात एकमेकांविरूद्ध खेळत होते.

सचिनचे वय तेव्हा फक्त १७ वर्षे होते. त्याच्या नावावर एक आंतरराष्ट्रीय शतक होते. लिटिल मास्टरने याही सामन्यात कोणाला निराश केले नाही. त्याने दणदणीत १५९ धावा केल्या आणि रणजी ट्रॉफी व ईराणी ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात केलेल्या शतकांचे चक्र कायम ठेवले. सौरवनेही या सामन्यात चांगलाच लढा दिला. त्याने आपल्या क्लासी १२४ धावांसह दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना अविस्मरणीय बनवला. परंतु या सामन्यात पहिल्या इनिंगच्या आघाडीने वेस्ट झोनने बाजी मारली.

दुलीप ट्रॉफी २००२ आणि २००३: स्विंगचा पठाण आला

दोन दुलीप ट्रॉफीज, आठ सामने ४१ विकेट्स! त्यानंतर लवकरच डिसेंबर २००३ मध्ये इरफान पठाण भारताच्या टूरसाठी सज्ज झाला. इरफानने २००२ मध्ये २२ विकेट्स घेऊन स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आणि वेस्ट झोनला ट्रॉफी जिंकण्यासाठी मदत केली.

त्याने हाच फॉर्म पुढील वर्षातही कायम ठेवला. तो २००३ मध्ये सर्वोच्च पाच विकेट घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणून जागा मिळवली. त्याने या स्पर्धेत निवड समितीला तो मोठ्या स्टेजसाठी तयार असल्याचे सिद्ध केले. झहीर खानला दुखापत झाल्यामुळे इरफानला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आणि आपला वेग तसेच स्विंगसोबत त्याने तात्काळ प्रभाव टाकला.

दुलीप ट्रॉफी २००४ ते २००८: परदेशी अस्तित्व

दुलीप ट्रॉफीमध्ये या शतकाच्या सुरूवातीला म्हणजे २००४ पासून देशांतर्गत किंवा झोनल टीम्ससोबत एका परदेशी टीमनेही सहभाग घेतला. इंग्लंड, बांग्लादेश, झिम्बाब्वे आणि श्रीलंकेचे अ दर्जाचे संघ विविध वर्षांमध्ये सहभागी झाल्यामुळे खेळाच्या एकूणच दर्जात सुधारणा झाली.

इंग्लंड अ संघाने २००३-०४ साली सहभाग घेतला तेव्हा केविन पीटरसन स्टार आकर्षण ठरला. तो या सामन्यात दोन सामन्यांमध्ये ३४५ धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. परंतु, ही पद्धत फार काळ चालली नाही. इंग्लंड लायन्सनी २००७-०८ मध्ये सहभाग घेतल्यानंतर परदेशी संघांनी सहभाग घेणे बंद झाले.

दुलीप ट्रॉफी २०१६: पिक बॉलसोबत प्रयत्न

दुलीप ट्रॉफी २०१६ हे देशांतर्गत क्रिकेटच्या उत्क्रांतीत एक क्रांतीकारक पाऊल ठरले. या वेळी पिंक बॉल डे-नाइट कसोटी सामने आणण्यात आले. त्याचा फायदा खेळाच्या या सर्वाधिक लांबीच्या स्वरूपात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी झाला.  इंडिया ब्लूने हा चषक जिंकून इंडिया ग्रीन व इंडिया रेडला मागे टाकले. प्रेक्षकांनाही या स्पर्धेत खूप मजा आली.

चेतेश्वर पुजाराने या स्पर्धेनंतर लगेचच असलेल्या न्यूझीलंड मालिकेसाठी उत्तम तयारी केली. तो फक्त तीन इनिंग्समध्ये तब्बल ४५३ धावा करून फलंदाजीमध्ये सर्वोत्तम ठरला. त्यात त्याने एक द्विशतक आणि एक दणदणीत शतकही केले. कुलदीप यादवने फक्त तीन सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेऊन सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले.

दुलीप ट्रॉफी रेकॉर्ड्स आणि मॅरेथॉन मेन

भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू वसीम जाफर आणि नरेंद्र हिरवानी यांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकूणच गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आघाडी घेतली.

रणजी ट्रॉफी, इराणी कप आणि दुलीप ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडून वसीम जाफर हा देशांतर्गत क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू ठरला आहे. मुंबईतल्या या मॅरेथॉन मॅनने आठ शतके आणि १३ अर्धशतकांसह ५५.३२ या अप्रतिम सरासरीने ३० सामन्यांमध्ये २५४५ धावा कुटल्या आहेत.

दरम्यान लेग स्पिनर नरेंद्र हिरवानी २९ सामन्यांमध्ये सलग आठ विकेट्सच्या कामगिरीसह १२६ विकेट्स गोळा करून या ठिकाणी आघाडी घेतली.