News

आपला स्काय३६० आता ३४ वर्षांचा! वाढदिवसाच्या शुभेच्छा सूर्यादादा

By Mumbai Indians

आपला दादा सूर्या अत्यंत लीलया टोलवू शकेल असा एकही शॉट नाही. विकेटच्या समोरून, विकेटच्या मागून, स्कूप, नो लुक शॉट... तुम्ही म्हणाल तो. स्काय शॉट मारून दाखवेल. स्काय क्रीझवर असतो तेव्हा पलटनला मनोरंजनाची कमतरता नसते.

आपल्याला माहित्ये की त्याच्या वाढदिवसाची पार्टी तेवढीच मनोरंजक असेल. स्कायचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास परीकथेपेक्षा कमी नाही. ब्लू अँड गोल्ड परिधान करून त्याने सात सीझन खेळले आहेत. या सात सीझन्समध्ये आपला दादा सूर्याने दोन किताबांसह एमआय पलटनची लाखो हृदयं जिंकली आहेत.

स्कायच्या ३४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागच्या सात वर्षांमध्ये ब्लू अँड गोल्डमध्ये केलेल्या अविस्मरणीय खेळांची उजळणी करूया.

५१ चेंडूंमध्ये १०२*, एमआय विरूद्ध एसआरएच, आयपीएल २०२४

सूर्याने आयपीएलमध्ये आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवताना गगनचुंबी कामगिरी केली. त्याच्या नाबाद शतकामुळे एमआयला सनरायझर्स हैदराबादविरूद्ध १६ चेंडू शिल्लक ठेवून सात विकेट्सनी विजय मिळवणे शक्य झाले. त्यामुळे त्याला सामनापटूचा पुरस्कार मिळाला.

आपला संघ ७४ धावांचा पाठलाग करताना ३१/३ वर होता. पण सूर्यादादा क्रीझवर असताना काळजी करायचे काहीच कारण नाही. निकालः स्कायने चेंडूला मैदानात यथेच्छ बुकलून काढले आणि आपली एकही विकेट पडली नाही. स्काय १२ चौकार आणि सहा षटकार मारून दणदणीत खेळला. त्याने आयपीएलमधले दुसरे शतक केले आणि आपल्याला प्रचंड मनोरंजनाचा आनंद दिला. 

४९ चेंडूंमध्ये १०३* एमआय विरूद्ध जीटी, आयपीएल २०२३

आयपीएलमधले पहिले शतक! या वेळी त्याने प्रथम फलंदाजी केली. स्कायने फक्त गॅप्स शोधले. त्याने फील्डर्सची दखलही घेतली नाही. आपल्या आवडत्या वानखेडे स्टेडियमच्या मैदानात त्याने आपल्याला गुजरात टायटन्सविरूद्ध २७ धावांनी विजय मिळवून दिला.

स्कायने या दिवशी फील्डर्सना चेंडू फक्त सीमारेषेपासून आत आणण्याचे काम शिल्लक ठेवले होते. त्याने ११ चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी केली. या अस्सल मुंबईकर खेळाडूसाठी हा सीझन खूपच चांगला गेला कारण त्याने या सीझनमध्ये ६०५ धावा केल्या. एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा त्याने याच वेळी केल्या.

आयपीएल २०२२ एमआय विरूद्ध आरसीबी ३७ चेंडूंमध्ये ६८* धावा

स्कायने एमआयला कोसळत्या फलंदाजीमधून सावरले. त्याने या पुण्यात झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध एक चांगली धावसंख्या उभारून दिली. आपण चांगली सुरूवात केली. पण ५०/० पासून लवकरच ७९/६ वर गेलो.

आपण हा सामना सात विकेट्सनी हरलो. पण स्कायने ३७ चेंडूंमध्ये ६८ धावा करून आपल्याला सावरले. या सामन्यात आपला दादा सूर्याने चार चौकार आणि सहा षटकार ठोकले. लढा न देता हार मानायची नाही हा त्याचा स्वभाव पुन्हा एकदा या सामन्यात झळाळून उठला.

आयपीएल २०२१, एमआय विरूद्ध एसआरएच ४० चेंडूंमध्ये ८२ धावा

अबूधाबीत झालेल्या सामन्यात स्कायने १३ चौकार आणि तीन षटकार मारून ७० चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या. या सामन्यात एमआयने एसआरएचला ४२ धावांनी विजयी होऊन बाहेर पाठवले. जलदगती गोलंदाज असो, मध्यम गती असो किंवा स्पिनर असो, सूर्याला त्याने काहीच फरक पडला नाही. त्याने या सर्वांचा धुव्वा उडवला.

स्काय पाचव्या नंबरवर खेळायला आला. त्याने फक्त ४० चेंडूंमध्ये ८२ धावा करत आक्रमक खेळ केला. एमआयने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासातील २३५/९ ची कामगिरी केली. मग हाच विक्रम त्यांनी २०२४ मध्ये मोडीत काढला. ईशान किशननेही या सामन्यात दणदणीत कामगिरी (३२ चेंडूंमध्ये ८४ धावा) केली.

आयपीएल २०२० एमआय विरूद्ध आरसीबी ४३ चेंडूंमध्ये ७९* धावा

मैं हूँ ना कामगिरी!

आणखी एक दिवस, आणखी एक यशस्वी पाठलाग पूर्ण. स्कायने पाठलागासाठी मास्टर असलेल्या संघासमोर आपला मास्टरक्लास दिला. अबुधाबीत झालेल्या या सामन्यात एमआयने आरसीबीचा पाच विकेट्सनी पराभव केला. स्काय नाबाद राहिला. त्याने ४३ चेंडूंमध्ये ७९ अशा सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे तो सामनापटू ठरला.

त्याने डेन स्थिन आणि युजवेंद्र चहल या दोघांचाही सामना करून १० चौकार आणि तीन षटकारांसह त्यांचा धुव्वा उडवला. प्रचंड फॉर्ममध्ये असलेल्या या माणसाला थांबवायचे कसे हेच प्रतिस्पर्धी संघाला कळत नव्हते. स्कायने या सीझनमध्ये ४८० धावा करून एमआयला पाचवा आयपीएल चषक जिंकण्यासाठी मदत केली.

आयपीएल २०१९, सीएसके विरूद्ध एमआय ५४ चेंडूंमध्ये ७१* धावा

प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या खेळपट्टीवर त्यांच्याच संघातल्या खेळाडूंचे तोंड बंद करणे याच्याइतकी जबरदस्त गोष्ट दुसरी कुठली नसेल. आपला दादा सूर्याने चेपॉकमध्ये झालेल्या चेन्नई सुपर किंग्स या आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरूद्धच्या क्वालिफायर १ सामन्यात हेच केले. स्काय या सामन्यात ५४ चेंडूंमध्ये ७१ धावांवर नाबाद राहिला आणि सहा विकेट्सनी विजय मिळवून एमआयने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 

आपण या सामन्यात सुरूवातीला २१/२ वर होतो. पिच कठीण होती आणि सामना अत्यंत महत्त्वाचा होता. तरीही त्याने १० चौकारांसह एक विश्वसनीय खेळ करत आपल्याला पराभवाच्या खाईतून खेचून बाहेर आणले. या सामन्यात स्कायने ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आणि २०१९ मध्ये आपल्यासोबत पहिला आयपीएल चषक जिंकला.

आयपीएल २०१८, आरआर विरूद्ध एमआय ४७ चेंडूंमध्ये ७२ धावा

सलामीचा फलंदाज म्हणून स्कायने एमआय विरूद्ध राजस्थान रॉयल्सच्या पाचव्याच सामन्यात दुसरे अर्धशतक झळकवले. आपल्या इनिंगमध्ये त्याने सहा चौकार आणि तीन षटकार फटकावून ईशान किशनच्या मदतीने दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावा केल्या. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियम अक्षरशः चिडीचूप झाला होता.

स्कायने ४७ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या. पण दुर्दैवाने एमआयचा या सामन्यात तीन विकेट्सनी पराभव झाला. त्याने आपल्या करियरमध्ये प्रथमच एका आयपीएल सीझनमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा केल्या. हेही त्याने आपल्यासोबतच्या पहिल्याच सीझनमध्ये साध्य केले.