News

दुलीप राऊंड २ मध्ये ईशानस्टॅटिक शतक, शम्सचा लढा

By Mumbai Indians

आपला पॉकेट डायनॅमो परतलाय! ईशान किशनने आपल्या दुलीप ट्रॉफी २०२४ च्या कॅम्पेनला दणदणीत सुरूवात केली. पहिला सामना तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पण आपल्या या स्टार खेळाडूने इंडिया सी साठी इंडिया बी विरूद्ध अनंतपूर येथे फक्त १२६ चेंडूंमध्ये १११ धावा करून आपल्या गेलेल्या वेळेची पुरेपूर भरपाई केली.

एकामागून एक विकेट्स पडल्यानंतर ९२/२ वर आलेल्या किशनने गोलंदाजांना चांगलेच घुमवले. त्याने दणदणीत १४ चौकार आणि तीन षटकारांची मेजवानी दिली. त्याने बाबा इंद्रजितसोबत तिसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भर घातली. तो बाद झाल्यानंतर गोलंदाजांना आनंदापेक्षा जास्त सुटका मिळाल्यासारखे वाटले.

दरम्यान शम्स मुलाणीदेखील अनंतपूरमध्ये एका वेगळ्या मैदानात उत्तम खेळत होता. त्याने थोडी वेगळी कामगिरी केली. पण त्याचा प्रभाव तेवढाच होता. इंडिया ए चा संघ ९३/५ वर अडचणीत असताना तो खेळायला आला. शम्सने तग धरून ठेवण्याची क्षमता आणि आपले कष्ट यांची ओळख करून दिली. त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवले. मागच्या अनेक वर्षांमध्ये त्याने ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.

शम्सने पुन्हा एकदा अत्यंत संयमाने अर्धशतकी खेळ करून (नाबाद ८८) गोलंदाजांचा सुपडा साफ केला. त्याने आपल्या संघाला पहिल्या दिवसाच्या शेवटी २८८/८ अशा चांगल्या स्थितीत आणून सोडले. सर्वप्रथम या डावखुऱ्या खेळाडूने कुमार कुशाग्रसोबत सहाव्या विकेटसाठी ५१ धावा केल्या आणि नंतर आपल्या मुंबईचा सहकारी तनुष कोटियनसोबत ९१ धावाही केल्या.

शम्स, एक शतक तो बनता है!