
#GTvMI ची आठवण: सूर्यकुमार यादव- हा सामना आठवण्याची १०३ कारणे!
चला तर मग पलटन, रिवाइंड बटण दाबूया जरा! 🎥
१२ मे २०२३. वानखेडे स्टेडियम. भरगच्च मैदान. ब्लू अँड गोल्डचा समुद्र. प्रचंड उत्साह आणि आपल्या मुंबईच्या आकाशाखाली एक माणूस आभाळाइतके फटके मारून लक्ष वेधून घेतोय. आपला एकमेवाद्वितीय सूर्यकुमार यादव!
त्याची ही फक्त नेहमीची कामगिरी नव्हती. तो एक मास्टरक्लास होता. एक अविस्मरणीय सामना. त्याने फक्त ४९ चेंडूंमध्ये १०३ धावा फटकावून गुजरात टायटन्सना घाम फोडला होता. त्यांनी त्याच्या दिशेने प्रत्येक चेंडू टाकला- वेग, स्पिन, संथ, बाऊन्सर्स. पण स्कायला कशाचीही तमा नव्हती. 🌟
360° फलंदाजीची कला!
अगदी पहिल्यापासूनच सूर्या आपल्या तालात होता. त्याचे नेहमीचे सुपला शॉट्स असोत किंवा मिड विकेटवरून जोरदार फ्लिक्स असोत. जीटीच्या गोलंदाजांना त्याला थांबवताच येत नव्हते. प्रत्येक शॉट एक कलाकृती होती आणि प्रत्येक बाऊंड्री म्हणजे टाळ्यांचा कडकडाट. आपला लिटिल मास्टरदेखील चकित झाला होता… 👇
Surya samajh mein nahi aata, dil mein aata hai 💙
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2023
Watching this on loop for the next day, week, month? 🥹#OneFamily #MIvGT #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 @surya_14kumarpic.twitter.com/tIAEpMBX1y
त्याने फक्त ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. पण काहीतरी वेगळे घडणार याची कल्पना एमआयच्या चाहत्यांना होती. लोक उत्साहात होते. त्याच्या प्रत्येक शॉटवर त्यांनी जल्लोष केला आणि मग तो क्षण आला.
अविस्मरणीय फिनिश!
विसावी ओव्हर होती. स्काय ८७* वर खेळत होता. शेवटचे सहा चेंडू अल्झारी जोसेफ टाकणार होता. सूर्या चांगलाच फॉर्ममध्ये होता. आता काय होणार त्याची मनात तीळमात्रही शंका नव्हती! 💥
… आणि आपल्या अत्यंत खास स्टाइलमध्ये त्याने आपले पहिले आयपीएल शतक झळकवले. त्याने इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर एक दिमाखदार सिक्सर मारला!
ज्वालामुखी उसळला होता. अख्खा एमआय कॅम्प अक्षरशः नाचत होता. सूर्यादादावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. त्याने चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले आणि आपली बॅट उंचावून हा क्षण साजरा केला. 💯
त्याच्या या अद्वितीय खेळामुळे आपण हा सामना २७ धावांनी जिंकलो आणि त्याला सामनापटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Iss muskaan ki chamkaan! 🥹🏆#OneFamily #MIvGT #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @surya_14kumar pic.twitter.com/SV8MzsBIL6
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2023
हे आत्ता का महत्त्वाचे आहे?
आयपीएल २०२५ मध्ये आलो आहोत. तोच प्रतिस्पर्धी, तीच भूक आणि कदाचित तोच फटकेबाजी करणारा स्काय!
आपण या मोहिमेच्या दुसऱ्या सामन्यासाठी गुजरात टायटन्सचा सामना करण्यासाठी तयार होत आहोत. मागच्या सामन्यानंतर आपली पोरं कांटे की टक्कर देण्यासाठी सज्ज होत आहेत जगातल्या सर्वांत मोठ्या क्रिकेट स्थानावर हा सामना जिंकण्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग असूच शकत नाही.
आपल्याला एक गोष्ट नक्की माहीत आहे. सूर्या चमकतो तेव्हा एमआय जिंकतो. त्यामुळे पलटन तयार व्हा. सामना जवळ आलाय आणि आम्ही पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न करत आहोत.