
आयपीएल सामना २ | GTvMI ग्राफिकल पूर्वावलोकन: केम छो, अमदाबाद? एमआयची पोरं येतायत तुमच्याकडे!!
पलटन, #CSKvMI सामना आपल्याला हवा तसा झाला नाही. पण म्हणतात ना, यशाची पहिली पायरी अपयश असते! 💪
चेन्नई सुपर किंग्ससोबत एक दणदणीत सामना झाल्यानंतर आमची पोरं सज्ज आहेत. ती सुधारणा करून मोहिमेतला पहिला विजय नावावर नोंदवायला आतुर आहेत. आणि यासाठी सूर्यमंडळातल्या सर्वांत मोठ्या मैदानाशिवाय दुसरे कुठले मैदान असू शकते?
पहिल्या सामन्यात धडा मिळाला. तो आम्ही शिकलो. आता आयपीएल २०२५ मध्ये खाते उघडण्याची भूक? प्रचंड आहे. आमच्या संघाने जामनगरमध्ये रिसेट बटण दाबले आहे. आमच्या योजना नव्याने बनवल्या आहेत आणि आपला सर्वोत्तम खेळ सादर करण्यासाठी ते सज्ज आहेत. 💥
गुजरात टायटन्सचा सामना करणे सोपे अजिबात नसेल. पण एमआयचा हा संघ आपल्या वाटेत जो कोणी येईल त्याच्याशी भिडायला तयार आहे. आमच्या फलंदाजांकडून फटकेबाजी, गोलंदाजांकडून जाळ अन् धूर संगटच आणि एमआयच्या नावाला जागणारा परफॉर्मन्स आम्हाला अपेक्षित आहे.
एक गोष्ट मात्र नक्की. आमचे खेळाडू सगळे डाव पलटायला आणि सीझनचा पहिला विजय नावावर करायला उत्सुक आहेत. 🤩 सामन्यासाठी तयार होताना ही आकडेवारी लक्षात ठेवा...
GT विरूद्ध MI – आयपीएलमध्ये एकास एक आकडेवारी
आम्ही बरोबरी करायला तयार आहोत!

**********
सूर्या विरूद्ध गिल– त्यांचे वॅगन व्हील्स काय म्हणतात?
• सूर्यकुमार यादव

• शुभमन गिल

**********
अहमदाबादमध्ये आयपीएल इतिहासात सरासरी धावसंख्या

*आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत फक्त एकच सामना खेळवला गेला आहे (GTvPBKS | २५ मार्च)
**********
बोल्ट विरूद्ध रबाडा– बॉलिंग लेंथ मस्त ना?!
१०० पेक्षा जास्त आयपीएल विकेट्स घेणारे दोन जलदगती गोलंदाज. आम्हाला तर आत्ताच गरम व्हायला लागलं रे!

**********
आयपीएलमध्ये अहमदाबादमधल्या सामन्यांत बाद होण्याच्या पद्धती

**********
बरं मग, आपला हेतू स्पष्ट आहे. आपली भूक विजयी झाल्याशिवाय शमणार नाही. जबाबदारी आणि कामे वाटून दिलेली आहे आणि टीम गुणतक्त्यात वर जाण्यासाठी तयार आहे. कमॉन बॉइज. चलो!!!