News

IND vs ENG: रोहितचे शतक, अश्विनच्या ९ विकेट्स यांच्यामुळे मालिकेत भारताचे ४-१ ने वर्चस्व

By Mumbai Indians

विजयाचा ठसा अगदी स्टाइलमध्ये उमटवलाय! भारताने सर्वच सामन्यांत वर्चस्व गाजवून बॉस कोण आहे हे दाखवून दिले- शतके, पाच विकेट्स आणि काही विक्रम मोडीत काढले. इंग्लंडला त्यांनी एक इनिंग आणि ६४ धावांनी पराभवाची धूळ चाखवली.

व्हिजिटर्सनी आधी फलंदाजी केली. परंतु त्यांना फलंदाजीसाठी उत्तम खेळपट्टीवर चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचे कारण कुलदीप यादव (५/७२) आणि रवीचंद्रन अश्विन (४/५१) या दोन्ही स्पिनर्सनी पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्यासाठी दरवाजेच बंद केले. अश्विनने तर आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात ३६ व्या कसोटी पाच विकेट्सची (५/७७) कामगिरी करून इंग्लंडला तिसऱ्या दिवशी डाव गुंडाळायला भाग पाडले.

दरम्यान भारताने उत्तम फलंदाजीदेखील केली. आपल्या रोहित शर्मासह (१०३) पाचही उत्तम फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा नोंदवल्या.

धर्मशाळा येथील एचपीसीए स्टेडियमवरील कसोटी विजयाची काही प्रमुख वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

कुलदीप, अश्विन यांचे स्टॉप साइनबोर्ड्स

झॅक क्राऊलीला १०८ चेंडूंमध्ये ७९ धावांमध्ये गुंडाळल्यामुळे इंग्लिश फलंदाजांचा कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या अचूक गोलंदाजीसमोर निभाव लागू शकला नाही.

कुलदीप तर पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजीचा स्टार ठरला. त्याने एक खास राँग अन चेंडू टाकला आणि त्यावर जॉनी बेरस्टो बाद झाला. तोदेखील आपल्या १०० व्या कसोटीसाठी मैदानात उतरला होता.

भारताकडून दणदणीत खेळ

फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण केले आणि पहिल्या इनिंगमध्ये ४०० पेक्षा जास्त धावसंख्या सहजपणे उभारली. यशस्वी जैस्वाल (५७), रोहित शर्मा (१०३), शुभमन गिल (११०) प्रथमच खेळणारा देवदत्त पडीकल (६५) आणि सरफराज खान (५६) हे अक्षरशः धावांचा पाऊस पाडत होते. त्यामुळे भारताच्या सर्वोच्च पाच फलंदाजांनी कसोटी इनिंगमध्ये ५० पेक्षा जास्त धावा नोंदवण्याची ही चौथी घटना ठरली.

जेम्स अँडरसनची एक नवीन कामगिरी

धर्मशाळामध्ये खेळाडू आणि चाहते या दोघांसाठीही एक सकारात्मक आणि आनंदाची बाब म्हणजे जेम्स अँडरसनला आपल्या विक्रमांमध्ये आणखी एक मुकुटमणी जोडताना पाहणे.

त्याने कुलदीप यादवला बाद केले आणि तो ७०० कसोटी विकेट्स घेणारा पहिलावहिला जलदगती गोलंदाज आणि मुथय्या मुरलीधरन (८००) आणि शेन वॉर्न (७०८) यांच्यानंतरचा तिसराच गोलंदाज ठरला.

अश्विनच्या पाच विकेट्स आणि मालिका समाप्त

इंग्लंडचा संघ तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात खेळायला बाहेर पडला. परंतु त्यांना मैदानात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यांचे पाच फलंदाज फक्त दोनअंकी धावसंख्या करू शकले. जो रूटने लढाऊ बाणा दाखवून अर्धशतक (८४) केले. पण त्याची विकेट पडल्यानंतर कसोटी सामना संपला.

आपल्या १०० व्या कसोटीत दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना रवीचंद्रन अश्विन जराही शांतपणे खेळला नाही. त्याने १४ ओव्हर्समध्ये ७७ धावांमध्ये पाच विकेट्स घेतल्या. त्याला जसप्रीत बुमरा (२/३८), कुलदीप यादव (२/४०) आणि रवींद्र जडेजा (१/२५) यांची साथ मिळाली.

थोडक्यात धावसंख्या: भारत ४७७ (शुभमन गिल ११०, रोहित शर्मा १०३; शोएब बशीर ५/१७०) कडून इंग्लंडचा २१८ धावा- एक इनिंग आणि ६४ धावांनी पराभव (झॅक क्राऊली ७९; कुलदीप यादव ५/७२) आणि १९५ (जो रूट ८४, रवीचंद्रन अश्विन ५/७७)