INDvENG टी२०आय पूर्वावलोकन: मिशन टी२० वर्ल्ड कप २०२६ ला सुरूवात!
पलटन, आपल्या सर्वांना २९ जून २०२४ ही तारीख लक्षात आहे. अगदी कालच घडल्यासारखे वाटते.
आता आपण पुन्हा सज्ज आहोत. २०२६ टी२० वर्ल्ड कपचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत होणार असून फक्त १३ महिने बाकी आहेत. तिसऱ्या विजयासाठी आपण पुन्हा एकदा तयारीला लागलो आहोत.
आपल्या सूर्यादादाने नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत मालिका ३-१ ने जिंकण्यात टीम इंडियाचे उत्तम नेतृत्व केले. तिलकने अक्षरशः धुमाकूळ घालून एकामागून एक शतके फटकावली होती. दोन दिवसांत सेंच्युरी डबल धमाका ऑफर!
संजू सॅम्सननेही आपल्या नावावर आणखी एक शतक केले तर वरूण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांनी प्रोटीआजना घुमव घुमव घुमवले.
आता मेन इन ब्लू आपल्या पूर्ण फॉर्ममध्ये असताना जो बटलरचा इंग्लंडचा संघदेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि या दोन्ही संघांमध्ये भारतात चांगलीच जुंपणार आहे.
या संघाने वेस्ट इंडिजला त्यांच्याच मैदानात मालिकेत ३-१ ने विजय मिळवून धूळ चारली. ओपनर फिल सॉल्ट आणि जलदगती गोलंदाज साकीब महमूद हे दोघेही भारतात खेळायला येणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी इंग्लंडच्या संघावर वर्चस्व गाजवले आहे.
आता २०२२ टी२० वर्ल्ड कप विजेत्यांना विद्यमान चॅम्पियन्सचा सामना त्यांच्या घरच्या खेळपट्टीवर करावा लागणार आहे. त्यांच्यासाठी हे जरा कठीण काम ठरू शकते.
काय: भारत विरूद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची टी२०आय मालिका
कधी आणि कुठे:
पहिला टी२०आय - बुधवार २२ जानेवारी (कोलकाता)
दुसरा टी२०आय - शनिवार दिनांक २५ जानेवारी (चेन्नई)
तिसरा टी२०आय - मंगळवार दिनांक २८ जानेवारी (राजकोट)
चौथा टी२०आय - शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी (पुणे)
पाचवा टी२०आय - रविवार दिनांक २ फेब्रुवारी (मुंबई)
काय अपेक्षित आहे: अगदी अटीतटीचे सामने, फलंदाजांकडून धुंवाधार फलंदाजी आणि काही सुंदर क्षण!
इंग्लंडचा संघ घरापासून दूर असला तरी भारतात टी२०आयमध्ये भारताविरूद्ध त्यांनी कडवी झुंज दिली आहे. त्यांनी ११ पैकी पाच स्पर्धा जिंकल्या आहेत.
… आता २०२६ चा पुरूषांचा टी२० वर्ल्ड कप भारत व श्रीलंकेत होणार असल्यामुळे दोन्ही संघांसाठी या मोठ्या स्पर्धेपूर्वी स्वतःचा ठसा उमटवण्याची ही उत्तम संधी आहे.
भारत विरूद्ध इंग्लंडः आकडेवारी
टी२०आय मध्ये एकास एक आकडेवारी |
||
भारत |
संघ |
इंग्लंड |
२४ |
सामने |
२४ |
१३ |
विजयी |
११ |
११ |
पराभव |
१३ |
विराट कोहली (६४८ धावा) |
सर्वाधिक धावा |
जो बटलर (४९८ धावा) |
युजवेंद्र चहल (१६ विकेट्स) |
सर्वाधिक विकेट्स |
ख्रिस जॉर्डन (२४ विकेट्स) |
इंग्लंडचा भारताचा दौरा २०२५ टी२०आय संघ
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल (विकेट कीपर), मोहम्मद शामी, नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रवी बिष्णोई, संजू सॅम्सन (विकेट कीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, वरूण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.
इंग्लंड: जो बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, लियाम लिव्हिंग्स्टन, साकीब महमूद, जेमी ओव्हर्टन, अदिल राशीद, रेहान अहमद, फिल सॉल्ट (विकेट कीपर), जेमी स्मिथ (विकेट कीपर), मार्क वूड.