
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फायनल: २०१३ च्या विजयाची पुनरावृत्ती, होऊन जाऊदे!
आता चित्र स्पष्ट झाले आहे…
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असून ते रविवार दिनांक ९ मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. एक्शन दुपारी २.३० वाजता सुरू होईल.
आपल्या रोच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये अजिंक्य राहिली आहे. आपण ग्रुप टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले असून आपल्या आगामी प्रतिस्पर्ध्यांविरूद्धचा सामना ४४ धावांनी जिंकला आहे. त्यामुळे या फायनल सामन्यापूर्वी आपले मनोबल उत्तम आहे.
सेमी फायनलमध्ये ऑसीजशी सामना झाला... तो आपण सर्वांनीच पाहिला??? 🤨 A विराट कोहलीच्या दणदणीत ८४ धावा आणि कुंग फू पांड्याचा जबरदस्त खेळ यांच्यामुळे २०१३ च्या चॅम्पियन्सना चार विकेट्सनी रोमांचक विजय मिळवणे शक्य झाले. २०२३ मध्ये झालेल्या पराभवानंतर फायनल समोर दिसत असताना आपल्याला नक्कीच थोडे तरी समाधान मिळाले असेल.
🎫 𝐓𝐈𝐂𝐊𝐄𝐓 𝐓𝐎 𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐄 ✅🏆#INDvAUS #ChampionsTrophy #MumbaiIndians pic.twitter.com/WUcHm8vw0p
— Mumbai Indians (@mipaltan) March 4, 2025
दरम्यान न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विक्रमी विजय मिळवून अंतिम सामन्यात आला आहे. त्या सामन्यात रचिन रविंद्र आणि केन विल्यम्सच्या शतकांमुळे त्यांच्या पहिल्या इनिंगची धावसंख्या ३६२/६ होती जी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक टीमची धावसंख्या ठरली. 👏
ब्लॅक कॅप्सनी आतापर्यंत या स्पर्धेत पाच शतके नोंदवली असून ती कोणत्याही देशाने नोंदवलेली सर्वाधिक शतके आहेत. भारतीय क्रिकेट टीमला या रेकॉर्डची काळजी वाटू शकते आणि ते हल्ला करायच्या तयारीनेच मैदानात उतरू शकतात.
गंमतीचा भाग म्हणजे भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आयसीसी ओडीआय स्पर्धेत २५ वर्षांनंतर उतरणार आहेत. २००० मधल्या आयसीसी नॉकआऊट सामन्यात किवीजचा संघ चार विकेट्सनी विजयी झाला.
**********
काय अपेक्षा आहे: दोन दिग्गज क्रिकेट संघांमध्ये रविवारचा ब्लॉकबस्टर सामना. त्यापेक्षा कमी नाही. त्यापेक्षा जास्त नाही.
न्यूझीलंडचा संघ मैदानात किती खतरनाक ठरू शकतो हे आपण सर्वांनी पाहिले आहे. ब्लाइंडर्सबद्दल म्हणाये झाल्यास ग्ले फिलिप्स हे महत्त्वाचे नाव ठरते.
काहीही असले तरी, टेंशनचं काही कारण नाही, पलटन. आपले खेळाडूदेखील सर्वोत्तम कौशल्याने सज्ज आहेत आणि गरज पडेल तेव्हा तेदेखील काही ना काही जादू नक्कीच दाखवतील.
आपला ब्लू अँड गोल्डमधला नवीन खेळाडू मिशेल संतनर आयसीसीच्या अंतिम सामन्यात प्रथमच न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. कसली जबरदस्त मॅच होईल ना संतनरभाऊ!
भारत विरूद्ध न्यूझीलंडः आकडेवारी
ओडीआयमध्ये एकास एक आकडेवारी |
||
भारत |
संघ |
न्यूझीलंड |
119 |
सामने |
119 |
61 |
विजयी |
50 |
50 |
पराभव |
61 |
7 |
अनिर्णित |
7 |
1 |
बरोबरीत |
1 |
विराट कोहली (१६५६ धावा) |
*सर्वाधिक धावा |
केन विल्यमसन (१२२८ धावा) |
मो. शामी (३७ विकेट्स) |
*सर्वाधिक विकेट्स |
मॅट हेन्री (२१ विकेट्स) |
*सर्वाधिक धावा आणि विकेट्ससाठी कार्यरत खेळाडूंचा विचार करण्यात आला आहे.