News

आयपीएल २०२५ मध्ये लिझाद विल्यम्सऐवजी कॉर्बिन बॉश खेळणार

By Mumbai Indians

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्सच्या संघात खेळण्यासाठी तयारी करत आहे. तो त्याच्या देशातील सहकारी असलेला लिझाद विल्यम्स दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्याऐवजी खेळण्यास येणार आहे.

हा ३० वर्षीय खेळाडू एसए२० स्पर्धेत त्याच्या पुरस्कार विजेत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेऊन एमआय केपटाऊनला आपली पहिली ट्रॉफी मिळवून दिली. 💙

एसए२० २०२५ स्पर्धेपूर्वी या उजव्या हाताने खेळणाऱ्या गोलंदाजाने डिसेंबर २०२४ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. त्यात त्याने पहिल्या इनिंगमध्ये नाबाद ८१ धावा करून दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील दोन विकेट्सनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. एमआयसाठी धावा काढण्यात तो नक्कीच उपयोगी ठरेल.

त्याच्या नावावर विविध स्वरूपांमध्ये २५००+ धावा आणि १५०+ विकेट्स आहेत. त्यामुळे बॉश खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू आहे आणि इंडियन प्रीमियर लीगवर आपला प्रभाव टाकण्यासाठी तो सज्ज आहे.

लिझाद भावा लवकर बरा हो. पलटनला तुला मैदानात लवकर बघायचं आहे.