News

भारत विरूद्ध पाकिस्तानः नाट्यमयता, रोमांच, बदला आणि पावसाची भीती

By Mumbai Indians

आता गंमत बघा. भारतीय क्रिकेट चाहत्यांची सगळ्यात मोठी भीती पाकिस्तानकडून हरण्याची नाहीये तर आधीच दुर्मिळ असलेला भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द होतो की काय याची भीती आहे. वाईट गोष्ट म्हणजे मेलबर्नचं हवामान सध्या आपल्या भावनांशी खेळतंय. या सीझनमध्ये करण्यात आलेल्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता ८० टक्के आहे. 

हरकत नाही. आपण सकारात्मक विचार करू. 

भारतीय चाहते सध्या वसुलीच्या मूडमध्ये आहोत. १९९२ सालापासूनचा आपला पाकिस्तानविरूद्ध एकही सामना न हरण्याचा विक्रम मागील वर्षी हिसकावून घेतला गेला. भारताचे १२ तर पाकिस्तानचा १ सामना.आता आपला भारतीय संघ ३६४ दिवसांनी जास्त तयारीने, जास्त आक्रमकपणे आणि नवीन धोरण घेऊन मागील वर्षाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्याला दिवाळीची भेट देण्यासाठी तयार आहे. फलंदाजी हा भारतीय संघाचा मजबूत भाग आहे आणि गोलंदाजी पाकिस्तानचा. त्यामुळेच शाहीन शाह आफ्रीदीने २०२१ मध्ये भारताच्या भरवशाच्या फलंदाजांना बाद केले तेव्हा हा सामना हरणार हे निश्चित झाले आणि २०२२ मध्येही अशाच प्रकारे सामना निश्चित होईल.

मागच्या दहा वर्षांत खेळवल्या गेलेल्या अनेक आयसीसी ग्लोबल सामन्यांमध्ये भारताने अनेकदा खूप अटीतटीचा खेळ केला आहे. पण त्यांना चषक घरी आणणे जमलेले नाही. त्यांच्याकडे खेळाडू आहे, आक्रमकता आहे, आपल्यासारखे चाहते आहेत. आपला कठोर मुत्सद्दी आणि हिटमॅनचा भारतीय अवतार रोहित शर्मा मैदानात उतरतो, कोहलीच्या बॅटमधून मशीनगनसारख्या धडाधड धावा निघतात, आपला दादा सूर्या, दादा या नावाला साजेसा खेळ करतो आणि हार्दिक पंड्या भारताला विजय मिळून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. 

काय: आपल्यासाठी सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी सामना भारत विरूद्ध पाकिस्तान आणि तेही वर्ल्डकपमध्ये. 

कुठे: एमसीजी, मेलबर्न 

कधी: रविवार, २३ ऑक्टोबर २०२२ 

काय पाहायला मिळेल: एक बॉक्सऑफिस हाऊसफुल मारधाड शो. नाट्यमयतेने भरगच्च, मैदानावर आणणि बाहेरही प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आणि कदाचित आपल्या सर्वांसाठी दिवाळीची एक मोठ्ठी भेट. 

आकडेवारी पाहा: 

तपशील

भारत

पाकिस्तान

एकास एक (टी२०आय)

८ विजय

३ विजय

सध्याच्या टीममधला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

रोहित शर्मा (३७३७ धावा)

बाबर आझम (३२३१ धावा)

सध्याच्या टीममधला सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू

भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल (८५ विकेट्स)

शादाब खान (८७ विकेट्स)

टी २० वर्ल्ड कपमध्ये एकास एक विजय

५ विजय

१ विजय

ऑस्ट्रेलियामध्ये एकास एक विजय (सर्व स्वरूपांमध्ये)

४ विजय

३ विजय

आपण काय करायचे आहे: फार काही नाही. तुमचा ऑक्सिमीटर जवळ ठेवून हार्ट रेट मोजत राहा आणि भरपूर पॉपकॉर्न जवळ ठेवा. आणि हो, भारतासाठी जोरात चिअर अप करायला विसरू नका. चला पलटन, आता शांत बसू नका! मेलबर्नमध्ये फक्त निळा रंगच दिसला पाहिजे.