News

INDvBAN, दुसरा टी२०आय: गेम, सेट, सीरिज!

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट टीमकडून आणखी एका दिमाखदार खेळाच्या प्रतीक्षेत पलटन होती. आपण सलग दोन विजय मिळवले आणि आता बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजीचा एक सामना शिल्लक होता. 

सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या विद्यमान विश्वविजेत्यांनी सुरूवात अडखळती केली पण नंतर बॅटिंगचा मास्टरक्लास दिला. आपण २० ओव्हर्समध्ये दणदणीत २२१/९ अशी धावसंख्या उभारली. 

भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ आपल्या गोलंदाजांच्या करामतीमुळे फक्त १३५/९ वर सर्वबाद झाला. 

चला तर बघूया दिल्लीतला सामना कसा रंगला तेः

नितीश कुमार रेड्डी = नाटक रे बाबा नाटक!

पॉवर प्ले अपेक्षित झाला नाही. त्यामुळे भारतीय संघाला एका सणसणीत खेळाची गरज होती. नितीश कुमार रेड्डीने आपल्याला तेच दिले.  

या २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजांना इकडेतिकडे भिरकवताना पाहणे ही एक मज्जाच होती. भारतीय संघातला हा त्याचा फक्त दुसराच सामना आहे असे कोणाला सांगूनही खरे वाटले नसते. 

त्याने पहिले १३ चेंडू प्रत्येक चेंडूमागे एक धाव काढली. त्यानंतर नितीशभाऊंनी आपलाय दांडपट्टा सुरू केला. त्याने पुढच्या १४ चेंडूंमध्ये ३७ धावा कुटल्या. त्यात त्याने दोन सणसणीत चौकार आणि भलेमोठे षट्कार फटकावले. अशा रितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पहिले अर्धशतक पूर्ण केले. 

आणि कल्पना करा... तो तिथेच थांबला नाही. मेहदी हसन मिराजच्या १३ व्या ओव्हरमध्ये रेड्डीने २६ धावांचा पाऊस पाडला. पलटनला तर फारच मज्जा आली. ते तर आपल्या या उगवत्या ताऱ्याला चमकताना बघून खूश झाले होते.

तुम बहुत मस्त काम करता है रिंकूभाई!

नितीश कुमार रेड्डीने आघाडी घेतली तर रिंकू सिंगने अगदी अचूकपणे त्याला मदत केली. 

त्याने आमची मुंबईमधल्या फास्ट लोकलची आठवण करून देत धावफलक हलता ठेवला. चौकारांशिवाय तर तो दुसरं काही बोलतच नव्हता. त्याने २९ चेंडूंमध्ये ५३ धावा फटकावल्या आणि त्यात पाच चौकार आणि तीन षटकार मारले. त्यामुळे भारतीय संघ सुरूवातीच्या धक्क्यातून बाहेर आला. 

या दोन फलंदाजांमधली १०८ धावांची भागीदारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला फक्त १३ ओव्हर्समध्ये १४९/९ वर घेऊन गेली. आपल्या नजरेत २००+ धावसंख्या होती. 

 
 
 
View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

हार्दिकचा आक्रमक खेळ

टीम चांगल्या स्थितीत असताने खेळायला उतरलेल्या कुंग फू पांड्याने मोठमोठे फटके मारताना एकही मिनिट विचार केला नाही. त्याने मागच्या सामन्यात जिथून थांबला होता तिथून सुरूवात करून दोन चौकार आणि सहा षटकारांसह १९ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. 

एचपीने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत फलंदाजी केली. आपण २०० चा टप्पा अगदी सहजपणे पार केला. त्याने यात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली.

बचाव मोड सुरूः गोलंदाजांचा धमाका

बांग्लादेशी संघ पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळ सुरू करणार हे अपेक्षित होते. परंतु आपले गोलंदाजही काही कमी नव्हते. 

पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेतल्या गेल्या. अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी बांग्लादेशी हल्ल्याचा सामना केला आणि त्यांना ४२/३ वर रोखले.

विकेट्स येत राहिल्या

भारतीय गोलंदाजांनी कोणत्याही फलंदाजाला सेटल होऊ द्यायचे नाही असे ठरवून ठेवले होते. 

एकाही बांग्लादेशी फलंदाजाची जादू चालली नाही. यजमान संघाने खेळावर वर्चस्व गाजवले. 

याशिवाय हार्दिक पांड्याने आपल्याला या सामन्यात एक अविस्मरणीय क्षण दिला. तो आपल्या डावीकडे २७ मीटर धावत गेला आणि वरूण चक्रवर्तीच्या चेंडूवर रिषद हुसेनला बाद केले. 

 
 
 
View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

पाहुण्या संघाने केलेल्या खराब फलंदाजीमुळे आपल्याला ८६ धावांनी विजय मिळाला. टी२०आयमध्ये त्यांचा शेजारी संघाविरूद्ध सर्वांत मोठा पराभव होता. 

हैदराबादमध्ये मालिका संपणार असून आपल्याला ही मालिका व्हाइटवॉश करण्याची अपेक्षा आहे तर बांग्लादेशी संघ स्वाभिमानासाठी खेळेल. त्यांना दौऱ्यातून विजय न मिळवता वरत जाण्याची इच्छा नाही. 

थोडक्यात धावसंख्या: भारत २० ओव्हर्समध्ये २२१/९ (नितीश कुमार रेड्डी ७४, रिंकू सिंग ५३; रिषाद हुसेन ३/५५) कडून बांग्लादेशचा ८६ धावांनी पराभव २० ओव्हर्समध्ये १३५/९ (महमुदुल्ला ४१; वरूण चक्रवर्ती २/१९, नितीश कुमार रेड्डी २/२३).