News

एसीसी इमर्जिंग एशिया कपमध्ये तिलक वर्मा भारताचे नेतृत्व करणार

By Mumbai Indians

आपला पॉवर हिटर तिलक भाऊ एसीसी टी२० इमर्जिंग टीम्स एशिया कप २०२४ मध्ये तरूण भारतीय टीमचे नेतृत्व करणार आहे. या टीममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थोडा अनुभव असलेले काही खेळाडू आणि उगवत्या ताऱ्यांचा समावेश आहे.

तिलकसोबतच नेहल वढेरा आणि अंशुल कंबोज या ब्लू अँड गोल्डमधल्या पोरांचीही निवड करण्यात आलेली आहे. ते दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक असतील.

आपला डायनॅमिक अष्टपैलू खेळाडू कंबोजची दुलीप ट्रॉफी २०२४ मोहीम उत्तम झाली होती. त्याने १७.१२ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्यामुळे त्याला मालिकापटू म्हणून गौरवण्यात आले होते.

दरम्यान फलंदाज वढेरा आयपीएल २०२४ नंतर प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार आहे. या २४ वर्षीय खेळाडूला आपल्या क्षमता व्यवस्थित माहीत आहेत. त्यामुळे तो लय गाठायला आणि आपली कामगिरी सुरू करायला फारसा वेळ लावणार नाही.

इंडिया ए हा संघ २०२३ मध्ये रनर अप ठरला होता. आपण शेवटच्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध १२८ धावांनी पराभूव झालो होतो. या वेळी तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एक पाऊल पुढे जाऊन चषक आपल्या घरी घेऊन येईल.

पलटन, आगामी स्पर्धेसाठी आपल्या टीमच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ओमानमध्ये सुरू होईल. चला तर मग जोरदार चिअर अप करूया.

एसीसी टी२० इमर्जिंग टीम्स एशिया कप २०२४ साठी इंडिया एक संघ: तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, आयुष बदोनी, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, अनुज रावत, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, हृतिक शौकीन, अकीब खान, वैभव अरोरा, रसिक सलाम, साई किशोर, राहुल चहर.

एसीसी टी२० इमर्जिंग टीम्स एशिया कप २०२४ साठी इंडिया ए चे वेळापत्रक

१९ ऑक्टोबर – पाकिस्तान ए विरूद्ध (सायं. ७ वाजता)

२१ ऑक्टोबर – संयुक्त अरब अमिरातीविरूद्ध (सायं. ७ वाजता)

२३ ऑक्टोबर – ओमानविरूद्ध (सायं. ७ वाजता)

२५ ऑक्टोबर – उपांत्य सामना (पात्र ठरल्यास)

२७ ऑक्टोबर- अंतिम सामना (पात्र ठरल्यास)