News

INDvBAN टी२०आय पूर्वावलोकन: स्काय आणि कंपनी आपला फॉर्म कायम ठेवण्यासाठी सज्ज

By Mumbai Indians

पांढऱ्यापासून ब्लूपर्यंतचा प्रवास आपल्यासोबत भरपूर धावा घेऊन येतो. पण टीम इंडियाने अलीकडेच झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात “त्या” इनिंगमध्ये हे साध्य केले होते.

या वर्षाच्या सुरूवातीला जूनमध्ये टी२० विश्वचषक विजयानंतर झालेल्या टी२०आय मालिकेत भारतीय संघ ४-१ ने (झिम्बाब्वेविरूद्ध) आणि ३-० ने (श्रीलंकेविरूद्ध) विजयी झाला. त्यामुळे रोहित- विराट युगानंतर भविष्य सुरक्षित हातांत असल्याची ग्वाही दिली गेली.

आपल्या आगामी असाइनमेंटमध्ये भारत तीन टी२०आयमध्ये बांग्लादेशचा सामना करेल.

कर्णधार सूर्यकुमार यादवची श्रीलंकेमधल्या यशस्वी दौऱ्यानंतरची टी२०आय मधली पूर्णवेळ कर्णधार म्हणून दुसरी असाइनमेंट आहे. श्रीलंकेत त्याने ३-० ने मालिका जिंकण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मानलं रे सूर्यादादा!

आपल्या संघाबाबत सांगायचे झाल्यास आपला कुंग फू पांड्यादेखील अष्टपैलू खेळाडूंचे नेतृत्व करायला तयार आहे. त्याबरोबर मयंक यादव, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी हे त्रिदेव आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतात.

याशिवाय दुखापतग्रस्त शिवम दुबेच्या जागी तिलक वर्माचा संघात समावेश केल्यामुळे आणखी धमाल येणार आहे. तिलक आपली रेड बॉलसोबतची कामगिरी खेळाच्या लहान स्वरूपात दाखवण्यासाठी सज्ज आहे.

बांग्ला टायगर्सबद्दल सांगायचे झाल्यास नजमुल हुसेन शांतो १५ खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व करणार असून एक वर्षापेक्षा जास्त काळ बाहेर राहिल्यानंतर अष्टपैलू मेहिदी हसन मिराजदेखील खेळाच्या सर्वांत लहान स्वरूपात पुनरागमन करणार आहे.

काय: भारत विरूद्ध बांग्लादेश, ३ सामन्यांची टी२०आय मालिका.

कधी आणि कुठे:
पहिला टी२०आय - रविवार, ६ ऑक्टोबर (ग्वालियर)

दुसरा टी२०आय – बुधवार, ९ ऑक्टोबर (दिल्ली)

तिसरा टी२०आय – शनिवार, १२ ऑक्टोबर (हैदराबाद)

काय अपेक्षा आहे: मागील काही वर्षांत भारत विरूद्ध बांग्लादेश टी२०आय मालिकांनी आपल्यासाठी काही अविस्मरणीय सामने आणले आहेत आणि आगामी मालिकाही काही कमी नसेल.

मि. ३६०° पूर्णपणे सज्ज आहे, एचपी अष्टपैलू कामगिरीसाठी तयार, तरूण खेळाडू प्रभाव टाकण्यासाठी उत्सुक आहेत... चला तर मग ऑक्टोबर हीटसाठी तयारी करा!

भारत विरूद्ध बांग्लादेशः आकडेवारी  

 टी२०आय मध्ये एकास एक आकडेवारी

भारत

संघ

बांग्लादेश

14

सामने

14

13

विजयी

1

1

पराभव

13

भारत

संघ

बांग्लादेश

रोहित शर्मा (477 धावा)

सर्वाधिक धावा

सब्बीर रहमान (236 धावा)

युजवेंद्र चहल (9 विकेट्स)

सर्वाधिक विकेट्स

अल- अमीन हुसेन (8 विकेट्स)

संघ

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅम्सन (विकेट कीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, वरूण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेट कीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव. 

बांग्लादेश: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तान्जिद हसन, परवेझ हुसेन इमॉन (विकेट कीपर), तौहित हृदोय, महमूदुल्ला, लिट्टन दास (विकेट कीपर), झाकर अली (विकेट कीपर), मेहिदी हसन मिराज, महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजूर रहमान, तास्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, तान्झिम हसन साकीब, रकीबुल हसन.