News

INDvNZ कसोटी पूर्वावलोकन: तिसऱ्या सलग डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या एक पाऊल जवळ जाण्याची संधी

By Mumbai Indians

आपला मुंबईचा राजा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ विश्व कसोटी अजिंक्यपद २०२४-२५ च्या आगामी असाइनमेंटमध्ये किवी संघाचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे.

शेजारी बांग्लादेश संघाविरूद्ध २-० ने विजय मिळाल्यानंतर टीम इंडियाने सर्वोच्च डब्ल्यूटीसी स्थान प्राप्त केले असून ७४.२४ टक्के गुण मिळवले आहेत.

याशिवाय, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ खेळाच्या सर्वांत दीर्घ स्वरूपात सहा सामने जिंकून आघाडीवर आहे. न्यूझीलंडविरूद्ध आपला हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी ते तयार असतील. किवीजनी नुकतीच श्रीलंकेविरूद्ध २-० ने कसोटी मालिका हरली आहे.

संघाबाबत सांगायचे झाल्यास टीम इंडियाने बांग्लादेश मालिकेतील संघात फारसे बदल केलेले नाहीत. बूम बूम हिटमॅनसाठी उपकर्णधार म्हणून काम करेल.

दरम्यान, लीकडेच झालेल्या मालिकेत श्रीलंकेविरूद्ध २-० ने हरल्यामुळे न्यूझीलंडचे नेतृत्व टिम साऊथीने सोडले आहे. आता टॉम लॅथम हा त्यांचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार असेल.

ख्यातनाम केन विल्यमसनला श्रीलंका दौऱ्यादरम्यान जांघेत झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडावे लागेल. त्याच्या जागी अनकॅप्ड फलंदाज मार्क चॅपमनला घेण्यात आले आहे.

अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल फक्त पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर तो वैयक्तिक कारणांसाठी घरी परतेल. स्पिनर इश सोधी त्याच्याऐवजी उर्वरित मालिकेत खेळेल.

काय: भारत विरूद्ध न्यूझीलंड, तीन सामन्यांची कसोटी मालिका

कधी आणि कुठे:

पहिला कसोटी- बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर (बंगळुरू)

दुसरा कसोटी सामना- गुरूवार दिनांक २४ ऑक्टोबर (पुणे)

तिसरा कसोटी सामना- शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर (मुंबई)

काय अपेक्षा आहे: या दोन संघांमधील मागचा कसोटी सामना भारताने जिंकला. आपण या सामन्यात दणदणीत ३७२ धावांनी विजयी झालो. आगामी मालिकेतही असाच निकाल लागेल अशी अपेक्षा आहे.

याशिवाय, न्यूझीलंडला स्पिन गोलंदाजी खेळताना येणाऱ्या अडचणी अलीकडे खूप चर्चेत आहेत. स्पिनसाठी उपयुक्त परिस्थितीत अश्विन जडेजा या दोघांकडून उत्तम खेळाची अपेक्षा करावी.

भारत विरूद्ध न्यूझीलंडः आकडेवारी

 कसोटीत एकास एक आकडेवारी

भारत

संघ

न्यूझीलंड

62

सामने

62

22

विजयी

13

13

पराभव

22

27

बरोबरीत

27

 

भारत

संघ

न्यूझीलंड

राहुल द्रविड (1659 runs)

सर्वाधिक धावा

ब्रेंडन मॅककुलम (1224 धावा)

रवीचंद्रन अश्विन (66 विकेट्स)

सर्वाधिक विकेट्स

सर रिचर्ड हेडली (65 विकेट्स)