News

१९ डिसेंबर २०२३: आयपीएल लिलाव २०२४ ची तारीख जाहीर

By Mumbai Indians

आपल्या फॅ-एमआय-ली साठी विचार करून नवीन खेळाडूंची शक्ती आणण्याची वेळ आता आली आहे. पलटन, १९ डिसेंबर २०२३ ही तारीख मोकळी ठेवा कारण टाटा आयपीएल २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.

हा एक दिवसभर चालणारा मिनी ऑक्शन कार्यक्रम आहे. तो दुबईतील कोका कोला अरेनामध्ये आयोजित केला जाईल. टी२० च्या महाउत्सवातली लिलाव परदेशात आयोजित केला जाणारी ही पहिलीच घटना आहे.

मुंबई इंडियन्सबरोबरच इतर नऊ फ्रँचायझी टीम्सनादेखील २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंतची वेळ देण्यात आली होती जेणेकरून त्यांच्याकडे कायम राखल्या जाणाऱ्या किंवा मुक्त केल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादी ते ठरवून सादर करतील. या कार्यक्रमाचा एक प्रारंभीचा भाग म्हणून रोमारिओ शेफर्डला आपण लिलावापूर्वीच्या व्यवहारात लखनौ सुपर जायंट्सकडून खरेदी केले आहे.

प्रत्येक टीमकडे २०२४ सीझनसाठी आपला संघ परिपूर्ण करण्यासाठी १०० कोटी रूपयांचा निधी असेल. मागील वर्षी हाच निधी ९५ कोटी रूपये होता. प्रत्येक टीमकडे असलेला अंतिम निधी त्यांनी मुक्त केलेल्या खेळाडूंमुळे आलेले पैसे आणि २०२३ च्या लिलावात राहिलेली शिल्लक यांच्यानुसार ठरेल.

गंमतीचा दुसरा भाग काय? आयपीएल २०२४ लिलाव भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याच्या दिवशीच असेल. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी केनबेरामध्ये होणार आहे.

पलटन, तुम्ही लिलावासाठी किती उत्साही आहात आणि आगामी सीझनसाठी एमआयने कोणाला साइन करावे असे तुम्हाला वाटते हे आम्हाला नक्की सांगा. पटापट सांगा. कारण आम्ही नोट्स काढतोय!