कायरन पोलार्डची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा मुंबई इंडियन्ससाठी बॅटिंग कोच या पदावर नेमणूक
~ #MIForever – त्याच्याच भाषेत ‘एकदा एमआयसोबत तर कायम एमआयसोबत’. पोलार्ड #Onefamily चा भागच राहणार. तो मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक आणि एमआय एमिरेट्ससाठी खेळाडू म्हणून कार्यरत राहील~
मुंबई इंडियन्सचा एक महत्त्वाचा भाग असलेला कायरन पोलार्ड आता खेळण्यातून निवृत्त होत आहे. तो एमआयसाठी आतापर्यंत १३ सीझन्समध्ये खेळला. पण आता तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून एमआय कुटुंबात असेल. अत्यंत सुंदर खेळणारा पोलार्ड २०१० पासून मुंबई इंडियन्सच्या निळ्या आणि गोल्ड रंगात रंगला आणि त्यानंतर त्याने वळून पाहिले नाही. तो या पिढीतला सर्वांत महान खेळाडूंपैकी एक ठरला. त्याने मुंबई इंडियन्ससोबत ५ आयपीएल चषक आणि दोन चॅम्पियन्स लीग चषक जिंकले. पोलार्ड कायम #MIForever चा भाग होता आणि राहील. तो आता आपल्या अनेक दशकांचा अनुभव आणि कौशल्यांचा वापर फलंदाजी प्रशिक्षक आणि एमआय एमिरेट्ससोबत खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सला आणखी मजबूत करण्यासाठी करेल.
सौ. नीता एम. अंबानी म्हणाल्या, “पोलार्ड कायमच मुंबई इंडियन्सचे ब्रीदवाक्य- खेलेंगे दिल खोल के! साठी वाहून घेतले आहे. अगदी तिसऱ्या सीझनपासून आम्ही आनंद, अश्रू, वेदना हे सगळेच सोबत वाटून घेतले आहे. त्यामुळे मैदानात आणि मैदानाबाहेरही आमच्याशी त्याचे अतूट नाते आहे. त्याने एमआयच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला आहे आणि आमच्या चॅम्पियन्स लीग चषक आणि ५ आयपीएल विजयांमध्येही तो महत्त्वाचा भाग राहिला आहे. एमआयसाठी त्याच्या खेळाची जादू आपल्याला मैदानात पाहायला मिळणार नाही. परंतु तो एमआय एमिरेट्ससाठी खेळणार असल्याचा मला खूप आनंद वाटतो. तो एमआयसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तरूण खेळाडूंना मार्गदर्शनही करेल. एमआय आणि एमआय एमिरेट्ससोबतचा हा त्याचा नवीन प्रवास त्याच्यासाठी आणखी यश, प्रतिष्ठा आणि मानसन्मान घेऊन येवो. माझ्याकडून त्याला खूप शुभेच्छा!”
श्री. आकाश अंबानी म्हणाले की, “पॉलीने मुंबई इंडियन्ससाठी एक खेळाडू म्हणून आपला ठसा उमटवला आहे. तो मैदानात जेव्हा जेव्हा उतरला तेव्हा चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. एमआय कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक आणि एक चांगला मित्र म्हणून त्याने आमच्यासोबतच्या त्याच्या आयपीएल करियरमध्ये क्रिकेटचा हा सुंदर खेळ अत्यंत कटिबद्धतेने आणि उत्साहाने खेळला आहे. मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणि एमआय एमिरेट्ससाठी खेळाडू म्हणून पॉली पुन्हा एमआय कुटुंबात येणार असल्याचा मला खूप आनंद वाटतो. आम्हाला विश्वास आहे की पॉली एक खेळाडू म्हणून जितका उत्कृष्ट आणि प्रभावी होता तितकाच तो प्रशिक्षक म्हणून आपली कामगिरी बजावेल. त्याचे ज्ञान टीमसाठी अत्यंत अमूल्य ठरेल. मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम आणि पलटनला त्याची मैदानात खूप आठवण येईल.
श्री. कायरन पोलार्ड म्हणाले की, “मी पुढची आणखी काही वर्षे खेळत राहणार असल्यामुळे हा निर्णय माझ्यासाठी सोपा निश्चितच नव्हता. परंतु या अत्यंत अद्भुत फ्रँचायझीमध्ये बदलाची प्रचंड गरज आहे हे मला जाणवते आणि मी एमआयसाठी खेळलो नाही तर एमआयविरूद्धही कधीच खेळणार नाही. मी कायम एमआयचा होतो आणि एमआयचा असेन. मागील १३ सीझन्समध्ये सर्वांत मोठ्या आणि सर्वांत यशस्वी टीमचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केल्याबद्दल खूप अभिमान, गौरव आणि आनंद वाटतो आहे. मी मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचा, पाठिंब्याचा आणि आदराचा वर्षाव यांच्यासाठी खूप आभार मानतो कारण त्यामुळेच माझा आत्मविश्वास दुणावला आहे. मी पहिल्यांदा आलो तेव्हा त्यांनी माझे अत्यंत प्रेमाने स्वागत करताना “आपण एक कुटुंब आहोत” असे म्हटले होते, हे मला आठवते. ते फक्त शब्द नव्हते. त्यांनी मुंबई इंडियन्ससोबतच्या माझ्या कारकीर्दीत आपल्या कृतीतून त्याचा अनुभव मला दिला आहे.”
टीममधील सदस्य आणि चाहत्यांकडून प्रेमाने “पॉली” असे नामकरण झालेल्या कायरनने मुंबई इंडियन्समध्ये २०१० मध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून तो ड्रेसिंग रूम आणि मैदानावरही अत्यंत महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक ठरला आहे. त्याने २११ सामने खेळले आहेत (आयपीएल + सीएलटी२०), १४७ च्या स्ट्राइक रेटने ३९१५ धावा केल्या आणि मधल्या फळीत खेळत असतानाही तो ३४१२ धावा करून आयपीएलच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत १८ व्या स्थानावर आहे. त्याच्या गोलंदाजीला कधीही तोड नव्हती. त्याला कायम सामना नियंत्रणाखाली आणण्यासाठी बोलावले जात होते. त्याने ७९ विकेट्स घेतल्या असून त्यातील ६९ आयपीएलमध्ये आहेत. त्यामुळे तो नवीन खेळाडूंना प्रेरणा ठरणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये १०३ कॅच घेतले आहेत. त्यामुळे तो सामना जिंकून देणारा, सामना पालटणारा, मोठी खेळी करणारा, सक्षम उपकर्णधार आणि वेळ पडल्यावर कर्णधार झालेला, त्याचे बिनचूक क्षेत्ररक्षण आणि मधल्या फळीतील धुवांधार फलंदाज ठरला आहे.
कायरन पोलार्डच्या दिमाखदार आयपीएल करियरची प्रमुख वैशिष्टे
- मुंबई इंडियन्ससाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज- ३९१५
- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार- २२३
- विकेट कीपर नसलेल्या खेळाडूने आयपीएलमध्ये घेतलेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक कॅचेस- १०३
- परदेशी खेळाडूसाठी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्यासाठी पाचवा क्रमांक- १४
- मुंबई इंडियन्ससाठी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेगवान संयुक्त अर्धशतक- १७ चेंडू
- मुंबई इंडियन्ससाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च बॅटिंग स्ट्रिक रेट (किमान ३०० धावा)- १४७.३२
- सहा आयपीएल अंतिम सामन्यात १९५.६५ च्या स्ट्राइक रेटने १८० धावा
मुंबई इंडियन्सच्या आणि एकूणच क्रिकेटच्या चाहत्यांसाठी अत्यंत लाडका असलेला पोलार्ड खेळाचा जागतिक आदर्श आहे. तो ब्लू आणि गोल्ड परिधान करणारा सर्वाधिक पुरस्कारप्राप्त आणि आदरणीय क्रिकेटपटू आहे आणि तो #MIForever देखील आहे.
मुंबई इंडियन्सबाबत
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीची मुंबई इंडियन्स ही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सची फ्रॅंचायझी चालवते. #OneFamily चा अलीकडेच जागतिक स्तरावर विस्तार झाल्यामुळे एमआयकडे आता तीन देशांमध्ये तीन टी२० टीम्स आहेत- एसए२० मध्ये एमआय केपटाऊन आणि इंटरनॅशनल लीग टी२०मध्ये एमआय एमिरेट्स.
मागील १५ वर्षांत मुंबई इंडियन्स ही सर्वाधिक सातत्यपूर्ण क्रिकेट फ्रँचायझी ठरली आहे. तिने सात चषकांसोबत पहिला क्रमांक राखला आहे. त्यात आयपीएलचे ५ चषक आणि दोन चॅम्पियन्स लीग टी२० चषक आहेत. ब्रँड फायनान्स या जागतिक ब्रँड मूल्यमापन एजन्सीने अलीकडेच मुंबई इंडियन्सला AA+ ब्रँड रेटिंग दिले आहे. मुंबई इंडियन्सचे डिजिटल माध्यमावरही वर्चस्व आहे. त्यांचे ३१ दशलक्ष चाहते जगभरात आहेत आणि ते आमचे प्रिय #MIPaltan आहेत. भागधारकांचा प्रचंड विश्वास, ब्रँडमधील गुंतवणूक, चाहत्यांचा सहभाग आणि कामगिरी यांच्यामुळे एमआय हा एक असा ब्रँड झाला आहे जो जागतिक क्रिकेट वातावरणाचे प्रचंड मूल्यवर्धन करतो.