
आयपीएल २००८-२०२४ मध्ये एमआय: पाच ट्रॉफीज आणि बरेच काही
मुंबई इंडियन्सचा आयपीएलचा प्रवास रोलर कोस्टरसारखा होता. सुरूवातीला काही वेळा डळमळलो, मग दणक्यात पुनरागमन आणि फक्त वर्चस्व! 🔥
२०१३—येस्स! ट्रॉफी#१, आपला महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा निरोप समारंभ आणि काहीतरी नवीन सुरूवात. २०१५? देजा वू! आणखी एक फायनल. आणखी एक अद्वितीय विजय आणि आणखी एक चषक.
त्यानंतर २०१७ आणि २०१९ मध्ये आणखी दोन सुंदर क्षण आपल्याला अनुभवता आले. एमआय या दोन्हींमध्ये टॉपला होती आणि त्यात शेवटच्या चेंडूवर रोमांच आणि काळीज काढून घेणारे क्षणही होते. पण २०२० मध्ये गोष्टी बदलल्या. एकामागून एक चॅम्प्स ठरलेल्या संघाने यूएईला आपल्या घराचे अंगण समजून तिथेही वर्चस्व गाजवले.
काही सीझन्सनी आपल्या संयमाची परीक्षा पाहिली. पण तुम्हाला माहित्ये काय आहे ते. एमआय कधीच बाहेर पडत नाही. इंडिया का त्योहारमध्ये मागच्या काही वर्षांत केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा.
मुंबई इंडियन्स- आयपीएलचे निकाल
वर्ष |
निकाल |
२००8 |
पाचवा |
२००९ |
सातवा |
२०१० |
उपांत्य |
२०११ |
प्लेऑफ्स |
२०१२ |
प्लेऑफ्स |
२०१३ |
विजयी |
२०१४ |
प्लेऑफ्स |
२०१५ |
विजयी |
२०१६ |
पाचवा |
२०१७ |
विजयी |
२०१८ |
पाचवा |
२०१९ |
विजयी |
२०२० |
विजयी |
२०२१ |
पाचवा |
२०२२ |
दहावा |
२०२३ |
प्लेऑफ्स |
२०२४ |
दहावा |