
आयपीएल २०२५ मध्ये एमआय: पलटन, तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजेत!
चला तर मग पलटन, आता काय करायचे हे आपल्याला माहीत आहे. आयपीएल फीव्हर चांगलाच तापलाय आणि खूप प्रश्न आहेत सर्वांनाच. आमच्याकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. तुम्हाला इंटरनेटवर इतरत्र कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाहीये.
ठीकेय!!! आयपीएल २०२५ च्या प्रत्येक गोष्टीसाठी वन स्टॉप सोल्यूशन पाहा. आम्ही प्रश्न गोळा केलेत आणि सर्व उत्तरे एकाच ठिकाणी मिळतील याची काळजी घेतलीय.
आता निवांत बसा, स्क्रोल करा आणि आयपीएलसाठी तयार व्हा. कारण एकदा का सीझन सुरू झाला की तुमच्याकडे फक्त एकच प्रश्न असेल. तो म्हणजे एमआयचा पुढचा सामना कधी आहे?! 😉 लेट्स गो!
• एमआय काही संघांविरूद्ध दोनदा खेळणार आहे तर काहींविरूद्ध फक्त एकदा. हे कसे काय?
हे बघा, स्पर्धेचे स्वरूप २०२४ सीझनप्रमाणेच असेल.
यातल्या १० फ्रँचायझींना प्रत्येकी पाच टीम्सच्या दोन ग्रुप्समध्ये विभागण्यात आले आहे. त्या अशा:
ग्रुप ए: सीएसके, केकेआर, आरआर, आरसीबी आणि पीबीकेएस
ग्रुप बी: एमआय, एसआरएच, जीटी, डीसी आणि एलएसजी
प्रत्येक फ्रँचायझी आपापल्या ग्रुपमध्ये चार संघांशी दोन वेळा खेळेल. ते दुसऱ्या ग्रुपमधल्या एका टीमसोबत (आपल्यासाठी सीएसके) दोन वेळा खेळतील आणि इतर चार टीम्ससोबत एकेकदा खेळतील.
एमआयचे आयपीएल २०२५ शेड्यूल हवे आहे का? – TAP HERE!
लीग टप्प्याच्या शेवटी प्रत्येक संघ १४ सामने पूर्ण करेल. त्यातले सात सामने घरच्या मैदानावर आणि सात बाहेरच्या मैदानांवर असतील. त्यातून अव्वल चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. कळले का आता … 😌
**********
• #CSKvMI मध्ये एचपी खेळणार नाही तर नेतृत्व कोण करेल?
आमची सीझनपूर्वीची पत्रकार परिषद तुम्ही पाहिली नाही वाटते pre-season press conference! 🧐
आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यात रन रेट कमी झाल्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. त्यामुळे हार्दिक पांड्याऐवजी या वेळी सूर्यादादा नेतृत्व करणार आहे.
“माझ्यासोबत तीन कर्णधार खेळणार आहेत म्हणून मी सुदैवी आहे. त्यामुळे मला जास्तीत जास्त अनुभव मिळेल. मला मदत कधी हवी आहे हे मला माहीत आहे. तीन वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये भारताचे नेतृत्व केलेले तीन वेगवेगळे लोक आहेत आणि त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. ते माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सोबत असल्याची जाणीव करून देतात,” तो म्हणाला.
**********
• महेला जयवर्धने परतलेत का?
येस्स्सस! श्रीलंकेचा महान खेळाडू. त्याने १७, १९ आणि २० या वर्षांमध्ये आपल्याला विजयी केले. तो आपला प्रमुख प्रशिक्षक म्हणून परतला आहे.
कोच साहेब चला #6 घरी आणूया!
**********
• आपले राखून ठेवलेले स्टार्स कोण आहेत?
अरे भावांनो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. 😬
आपले फेमस फाइव्ह, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनपूर्वी राखण्यात आले.
मेगा ऑक्शनदरम्यान आपण नमन धीरला आरटीएम करून सीझनपूर्वी सहावा राखण्यात आलेला खेळाडू बनवले. मागच्या सीझनमध्ये त्याने केलेल्या धमाल कामगिरीनंतर आपण त्याला सोडणार नव्हतोच.
**********
• आम्हाला कॅम्पमध्ये अनेक नवीन चेहरे दिसतायत…
नव्याने सांगण्याची गरज नाहीच आहे!!! आपल्या निवड समितीने आयपीएल २०२५ मोहिमेसाठी राखलेल्या पाच खेळाडूंसह १८ नवीन चेहरे आणले आहेत.
निवडलेल्या परदेशी खेळाडूंमध्ये विल जॅक्स, रायन रिकेल्टन, ट्रेंट बोल्ट आणि मिशेल संतनर अशी संभाव्य नावे होती तर; भारतीय खेळाडूंमध्ये विघ्नेश पुथूर, व्हीएस राजू, राज अंगद बावा, रॉबिन मिन्झ अशा विविध खेळाडूंची नावे आहेत.
**********
• काही खेळाडू अलीकडेच दुखापतग्रस्त झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाले. नाही का?
हो. अफगाणिस्तानचा सेन्सेशन एएम गझनफर आणि दक्षिण आफ्रिकन जलदगती खेळाडू लिझाद विल्यम्स हे दुखापतग्रस्त झाल्यामुळे यंदा स्पर्धेत खेळू शकणार नाहीत.
आपला जादुई स्पिनर मुजीब उर रहमान आणि अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश हे त्यांच्याऐवजी बदली खेळणार आहेत.
**********
• रोसोबत इनिंग्स कोण सुरू करणार? रिकल्टन की जॅक्स? सांगा बरे?
ते तर वेळ आल्यावर कळेलच… 😉
**********
• वानखेडेवर पहिला सामना आपण कधी खेळणार आहोत?
बॉइज इन ब्लू अँड गोल्ड मिशन ६ साठी आपले पहिले दोन्ही सामने घराबाहेर सीएसकेविरूद्ध (२३ मार्च) आणि जीटीविरूद्ध (२९ मार्च) रोजी खेळणार आहेत.
या सामन्यानंतर आपण ३१ मार्च रोजी यंदाचे विद्यमान चॅम्पियन्स कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध आपल्या वानखेडेवर मैदानात उतरणार आहोत.
पलटन, आमच्या अपेक्षा स्पष्ट आहेत. आम्हाला आशाही आहेत. MI Jersey जर्सी घालून, एमआय फ्लॅग फडकावत आणि मुंबई मुंबईचच्या जल्लोषाची आम्हाला प्रतीक्षा आहे. बस्स एवढेच करायचे आहे … 😊
**********
• आपण दुपारचे काही सामने खेळणार आहोत का? हो असेल तर कधी सुरूवात होईल?
हो, आपण आपल्या १४ लीग सामन्यांपैकी दोन सामने दुपारी खेळणार आहोत. ते दुपारी ३.३० वाजता सुरू होतील.
हे दोन्ही सामने सीझनच्या शेवटी म्हणजे एलएसजीसोबत वानखेडे स्टेडियमवर (२७ एप्रिल) आणि पीबीकेएएससोबत हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम, धरमशाला येथे (११ मे) खेळले जातील.
इतर सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता सुरू होतील.