News

आपल्या राष्ट्रीय खजिन्याचा टॉपचा बूमदार प्रवास!

By Mumbai Indians

जसप्रीत बुमराला साध्य करता येणार नाही असं काही आहे का या जगात!?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या बॉक्सिंग डेच्या स्पर्धेत ९/१५६ असा दणदणीत खेळ केल्यानंतर आपल्या जलदगती खेळाडूने पुरूषांसाठीच्या नवीन आयसीसी मेन्स टेस्ट रँकिंगमध्ये ९०७ रेटिंग पॉइंट्स मिळवले आहेत. कोणत्याही भारतीयाने केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

अर्थात, खेळाच्या सर्वांत दीर्घ प्रकारात या ३१ वर्षीय खेळाडूसाठी २०२४ हे वर्ष अद्वितीय ठरले. त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये ७१ विकेट्स घेतल्या. २०१८ मध्ये पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कॅलेंडर वर्षातली ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

जस्सीभाईने केपटाऊनमध्ये २०२४ ची सुरूवात २/२५ आणि ६/६१ ने केली. त्याने इंडिया टूर ऑफ साऊथ आफ्रिकाची दुसरी कसोटी जिंकण्यास मदत केली आणि तीन इनिंग्समध्ये १२ विकेट्स घेऊन विकेट घेणारा आघाडीचा गोलंदाज म्हणून स्वतःचे नाव कोरले.

… तेव्हापासून या शो स्टॉपरला कुणीही रोखू शकलेले नाही! 💪

२०२४ मध्ये त्याने कसोटीमध्ये केलेल्या कामगिरीची आकडेवारी ही आहे. बघा तर खरे त्याने किती आणि काय काय केलेय ते. 🤯

प्रतिस्पर्धी

खेळलेले सामने

विकेट्स

दक्षिण आफ्रिका *

1

8

इंग्लंड

4

19

बांग्लादेश

2

11

न्यूझीलंड

2

3

ऑस्ट्रेलिया ^

4

30

एकूण

13

71

* २०२३-२४ मधील भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळवला गेला. ही आकडेवारी जानेवारी २०२४ मध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातील आहे.

^ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा पाचवा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये खेळवला गेला. या आकडेवारीत पहिल्या चार सामन्यांचा समावेश आहे. हे सामने नोव्हेंबर- डिसेंबर २०२४ मध्ये खेळवले गेले.

आपल्या या लाडक्या उजव्या हाताने खेळणाऱ्या जलदगती गोलंदाजाने वर्ष उत्तमरित्या संपवताना आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. त्याने तब्बल १९.४२ च्या सरासरीने २०० कसोटी विकेट्स घेतल्या. किमान २०० विकेट्ससह या स्वरूपातील खेळाडूंसाठी ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. जबरा रे बुमरा! 👏

आपला हा राष्ट्रीय खजिना खऱ्या अर्थाने उत्तम दर्जाच्या वाइनसारखा ज्येष्ठ होत चाललाय!!!

या अद्भुत खेळाडूला खूप खूप शुभेच्छा. आपल्या घातक गोलंदाजीच्या आगळ्यावेगळ्या स्टाइलने प्रतिस्पर्धी फलंदाजांचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज आहे!