News

मुंबईचा राजा, रोहित शर्मा आला रे!!!

By Mumbai Indians

पलटन, बोरिवलीपासून चर्चगेटपर्यंत चौकाचौकात दवंडी पिटवा!!!!! 🥁

… आता कारण तुम्हाला माहीतच आहे ना भावांनो. आपल्या रो ने आयपीएल २०२५ पूर्वी एमआय कॅम्पमध्ये हिरोसारखी एंट्री मारली आहे आणि उत्साहात आणखीच भर पडलीय. मनोरंजन में कोई कमी नहीं होनी चाहिये

आपला लाडका, आपल्या काळजाचा तुकडा आपला हिटमॅन- त्याचा स्वॅग आणि सामना जिंकण्याची ताकद दोन्ही अद्वितीय आहेत. आपण मिशन ६ वर रवाना होत असातना रोहित पुन्हा एकदा आपल्या खास ब्लू अँड गोल्डमध्ये धमाल करायला सज्ज आहे. 🤩

आपण मागच्या अनेक वर्षांपासून रोहित नावाची वीज वानखेडेवर सळसळताना पाहिली आहे. त्याचे खास पुल शॉट्स आणि इनिंग्सची सुरूवात करताना निस्ता राडा... आणि आता तर आणखी एक आकर्षक सीझन समोर असताना काहीतरी खास सुरू होणार हे आपल्याला माहीतच आहे.

नेटमधला सराव, त्याचे सणसणीत ड्राइव्ह्ज आणि ड्रेसिंग रूममधली धमाल. हे सर्व खास हिटमॅनच्या पॅकेजमध्ये पाहायला मिळेल. मज्जा आहे की नाही 😎

आपला संघ मस्त तयार होतोय. सराव कठोर होत चाललाय आणि आता रोहित सोबत असल्यामुळे काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे नक्की. हा सामना जिंकून देणारा खेळाडू एमआया खरा लीजंड आहे. त्याच्यासाठी स्टेजही तयार आहे. तुम्ही सर्वांनी तुमच्या MI jerseys, झेंडे आणि मुंबईईई मुंबईईई च्या जयघोषांसाठी तयारी केली आहे ना... मुलांना काहीही झालं तरी पाठिंबा द्यायचाच आहे!

रो, चल भावा होऊ दे राडा! 🔥