एसए२० सामनेः एमआय केपटाऊनकडून लीगची घोषणा
कॅलेंडर तयार करा कारण आता १० जानेवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३ या काळात ब्लू आणि गोल्डसाठी आपण तयार व्हायचे आहे. एसए२० लीगची घोषणा झालेली आहे आणि एमआय केपटाऊन ही आपली फ्रँचायझी न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंड या घरच्या खेळपट्टीवर पार्ल रॉयल्सविरूद्ध पहिला सामना खेळणार आहे.
या चार आठवड्यांच्या कालावधीत सहा टीम्स एकमेकांविरूद्ध एकदा घरच्या तर एकदा बाहेरच्या खेळपट्टीवर दोनदा खेळणार आहेत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात हे सामने खेळले जाणार आहेत. आमचे पहिले तीन सामने घरच्या खेळपट्टीवर खेळले जातील. डर्बन सुपर जायंट्स आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्स पहिल्या आठवड्यात आपल्याकडे खेळायला येतील तर त्यानंतर आपण सनरायझर्स ईस्टर्न केपविरूद्ध खेळायला बाहेर जाणार आहेत. त्यानंतर ते लगेचच आपल्याकडे खेळायला येतील.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लीगमध्ये एक आठवड्याची रजा असणार आहे आणि एमआय केपटाऊन त्यानंतर शेवटच्या आठवड्यात तीन बाहेरच्या खेळपट्टीवर सामने खेळेल. त्यानंतर उपांत्य फेरी आणि ११ फेब्रुवारी २०२३ रोजी म्हणजे शनिवारी अंतिम फेरीचा सामना होईल.
आपले सामने:
दिनांक |
वार |
एसएसटी वेळ |
घरच्या |
दूरच्या |
Venue |
१० जानेवारी २३ |
मंगळवार |
सायं ५.३० |
एमआयसीटी |
पीआर |
Cape Town |
१३ जानेवारी २३ |
शुक्रवार |
सायं ५.३० |
एमआयसीटी |
डीएसजी |
Cape Town |
१४ जानेवारी २३ |
शनिवार |
सायं ५.३० |
एमआयसीटी |
जेएसके |
Cape Town |
१६ जानेवारी २३ |
सोमवार |
सायं ५.३० |
एसईसी |
एमआयसीटी |
Gqeberha |
१८ जानेवारी २३ |
बुधवार |
दुपारी १३.३० |
एमआयसीटी |
एसईसी |
Cape Town |
२१ जानेवारी २३ |
शनिवार |
दुपारी १३.३० |
पीआर |
एमआयसीटी |
Paarl |
२३ जानेवारी २३ |
सोमवार |
सायं ५.३० |
एमआयसीटी |
पीसी |
Cape Town |
२ फेब्रुवारी २३ |
गुरूवार |
सायं ५.३० |
डीएसजी |
एमआयसीटी |
Durban |
४ फेब्रुवारी २३ |
शनिवार |
सायं ५.३० |
पीसी |
एमआयसीटी |
Pretoria |
६ फेब्रुवारी २३ |
सोमवार |
सायं ५.३० |
जेएसके |
एमआयसीटी |
Johannesburg |
चला पलटन, आता शांत बसू नका. केपटाऊनसाठी जल्लोष करायची आणि शुभेच्छा पाठवायची वेळ आलीय. आपली #OneFamily आता मोठी होतेय..